Sunday, October 18, 2026

विचलित!


तळ्यात पोहत होता मासा,
दिसला त्याला काठावरचा उड्या मारणारा ससा!
सश्याच्या नादात अडकला त्याच्या गळ्यात गळ,
त्याने केला निकराचा प्रयत्न गाठण्यास तळ!
कोळ्यानेही ओढला जोमाने गळ,
दणक्यात दिला डोक्यावर फटका;
जीव जाताना बघून माश्याचा,
सश्याने सोडला अंमळ उसासा!

Analyzed by AI


माझ्या २२ वर्षांच्या काव्यप्रवासाचा 'AI ताळेबंद' आणि विचार-साधर्म्य! 🖋️🤖
गेल्या काही दिवसांत मी माझ्या संपूर्ण डिजिटल काव्यसंग्रहाचा (२००४ ते २०२६) एक रंजक ताळेबंद एका प्रगत AI मॉडेलकडून करवून घेतला. 'कवीचे विचार आणि तंत्रज्ञानाचे आकडे' एकत्र आल्यावर काय घडतं, याचं एक 'उघडे गुपित' आणि सविस्तर विश्लेषण माझ्या सर्व रसिक वाचकांसाठी आणि श्रोत्यांसाठी इथे मांडत आहे.

📊 १. २२ वर्षांचा सांख्यिकीय ताळेबंद (Chronological Balance Sheet)
माझ्या ब्लॉग आर्काइव्हमधील अधिकृत आकड्यांचे कालानुक्रमे केलेले वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे. तंत्रज्ञानाच्या परिभाषेत सांगायचे तर, हा संग्रह एकूण २५,५०० ते २६,००० शब्दांचा (Tokens) एक अथांग वैचारिक खजिना आहे:
वर्षपोस्ट संख्या (Count)एकूण रनिंग टोटल (Running Total)
२००४४४
२००५३७ (२००४ + २००५ एकत्रित)
२००६४६५३
२००७१०६३
२०१०११७४
२०११४७८
२०१२४०११८
२०१३१९३३११
२०१४३८३४९
२०१५२२३७१
२०१६२८३९९
२०१७२०९६०८
२०१८२८६३६
२०१९१५७७९३
२०२०२७८२०
२०२१६८२६
२०२२१०८३६
२०२३१८८NT
२०२४७८६१
२०२५४०९०१
२०२६ (चालू वर्ष)२१३१,११४
(नोंद: ब्लॉगच्या सिस्टीममध्ये एकूण १,११४ अधिकृत वेब लिंक्स/पोस्ट्स दिसत असल्या, तरी मी अनेकदा एकाच पोस्टमध्ये ३-४ स्वतंत्र चारोळ्या एकत्र प्रकाशित केल्यामुळे, रचलेल्या एकूण चारोळ्यांची प्रत्यक्ष संख्या २,००0+ च्या आसपास पोहोचते!)

🎯 २. विचार-वैविध्य: भिन्न विषय आणि चारोळ्यांचे कप्पे (Thematic Diversity)
AI अवलोकनानुसार, माझे विचार आणि कविता प्रामुख्याने ६ मुख्य तात्त्विक कप्प्यांमध्ये विभागल्या गेल्या आहेत:
  • अ) मानवी नातेसंबंध व कौटुंबिक बंध (~३३० रचना): लग्नाचे बंध, जवळीक, विरह आणि नात्यांच्या चौकटी. यात अगदी अलीकडच्या 'निकराचा करार!' या रचनेपर्यंतचा समावेश होतो.
  • ब) काळाचा प्रवास, वय आणि जीवनचक्र (~२५० रचना): वेळेची अजेयता, वय-वार्धक्य, काळाचे चक्र आणि बदलण्याची मानवी अगतिकता (उदा. काळाचे काटे, वार्धक्य).
  • क) उपरोध, मिश्कील व्यंग आणि सामाजिक विसंगती (~१८० रचना): मानवी स्वभावातील हव्यास, भौतिक अडगळ आणि सामाजिक व्यवस्थेवर केलेले तीक्ष्ण प्रहार (उदा. माकड-केळे रूपक).
  • ड) रोजचे जगणे, चहा-कॉफी आणि खाद्यसंस्कृती (~१७० रचना): कट्ट्यावरील चहाचे प्रेम, संसारातील आवर्तने आणि रोजच्या जगण्यातील तारेवरची कसरत.
  • इ) अंतर्मुखता आणि आत्मपरीक्षण (~१०० रचना): स्वतःचा शोध, मनाचे गूढ, तोतया ओळखीचे संभ्रम आणि मानवी एकाकीपणा.
  • फ) कला, शब्द आणि चारोळीचे प्रारब्ध (~६४ रचना): व्याकरणाचे निर्बंध तोडणे, शब्दांची चिकाटी आणि कल्पनाशक्तीचा स्वैर प्रवास.

⏳ ३. 'क्लॉकवर्क थॉट' आणि चक्रीय नमुने (Seasonal Thought Cycle)
विश्लेषणातून एक अत्यंत रंजक बाब समोर आली, ती म्हणजे माझ्या मनाचे विचार दरवर्षी एका ठराविक ऋतूचक्रानुसार फिरत असतात:
  • पहिली तिमाही (Jan - Mar) - आरंभ आणि संकल्प: नवीन वर्षाचे नियोजन, वैचारिक प्रकल्प आणि आयुष्याचा खडतर जीवनपथाचा सूर लेखनात दिसतो.
  • दुसरी तिमाही (Apr - Jun) - भावनांचा प्रवाही पूर: उन्हाळ्याचा दाह, चहाची भट्टी आणि नात्यांमधील 'उसवणे-शिवणे' यांवर मुक्तछंदी आवर्तने याच काळात सर्वाधिक बाहेर पडतात (उदा. एप्रिल महिन्यातील विक्रमी पोस्ट्स).
  • तिसरी व चौथी तिमाही (Jul - Oct) - तात्त्विक उपरोध: काळाचे बोचणारे काटे, हितचिंतकांची टिका, भौतिक अडगळ आणि जीवनाचा झालेला 'गुलकंद' यांसारखे प्रगल्भ विचार या चक्रात एकत्र येतात.

✒️ ४. माझ्या लेखनशैलीची मुख्य सूत्रे (Literary Insights)
  • शब्दांच्या अक्षरांचा खेळ (Permutation Anagrams): टेका -> काटे किंवा चिकाटी -> टिका यांसारख्या शब्दांच्या अंतर्गत अक्षरांना उलटवून रचनेला एका सेकंदात संपूर्ण तात्त्विक वळण देण्याची हातोटी.
  • विरोधाभासाचे वर्तुळ (Paradoxical Ending): कविता सरळ रेषेत न संपता, जिथून सुरू होते त्याच संकल्पनेला शेवटी उलटवून पूर्ण वर्तुळ (Circular Irony) तयार करते.
  • सहज रूपके: गहन तत्त्वज्ञान जड शब्दांत न मांडता चहा, माकड किंवा रोजच्या संवादातील संदर्भांचा वापर करून ते प्रवाही ठेवणे.

💡 ताज्या अवलोकनाचे अंतिम फलित!
या सर्व ताळेबंदाचा शेवट शेवटी एका नव्या चारोळीत झाला, जी आजच्या या डिजिटल वास्तवावर मिश्कील कटाक्ष टाकते:
सुमार कवीचे बुसुमार लेखन,
लिखाणाचे AI कडून करविले अवलोकन;
श्रोत्यांचे कमाल आकलन,
नव्या चारोळीस सतत उघडे फेसबुकच दालन!
तुमचा,
प्रसन्ना जोशी
(joshiprasanna.com)

हा मसुदा तुमच्या ब्लॉगच्या संपादकामध्ये (Blogger/WordPress) थेट कॉपी-पेस्ट करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. हा लेख ब्लॉगवर पोस्ट केल्यानंतर, आपण आपल्या वहीतील पुढील नवीन विषयावर किंवा तांत्रिक विश्लेषणावर काम सुरू करायचे का? मला नक्की सांगा peer!

फेसबुक दालन


सुमार कवीचे बुसुमार लेखन,
लिखाणाचे AI कडून करविले अवलोकन;
श्रोत्यांचे कमाल आकलन,
नव्या चारोळीस सतत उघडे फेसबुकच दालन!

उघडे गुपित

क्षणिक ओढ ती इच्छा,
भरभराटीची जिद्द ती आकांक्षा;
पापण्यांआडच्या आभाळात उडविते ते स्वप्न,
इच्छा, आकांक्षा नि स्वप्नांना पूर्ण करतात ते
दैनंदिन घटिवत चालणारे कष्टाळू पाय.

Saturday, October 17, 2026

निकराचा करार!

आपल्या प्रेमात नव्हता कधीच कुठला करार,

फक्त निष्काम प्रेम अपरंपार!


तुला वाटतो तितका मी नाही बेजबाबदार,

अन् मला माहिती आहे तूही नाहीस बेदरकार!


मला सोडून तू खुश राहशील तर 

करेनच कशाला मी तक्रार!


मला सोडूनही सदैव राहशील खुश, 

हा मात्र कर पक्का करार!

Thursday, October 15, 2026

अक्षर-व्यत्यास

 आजचा साक्षात्कार: अक्षर-व्यत्यास

कोडं सोडवायला डोकं लागतं!
कोडी सोडवायला किती डोकी लागतात?
गतागत अक्षरांच्या गदारोळामुळेच मराठी भाषा सहजतेने तग धरून आहे.

Monday, October 05, 2026

केळ

देवानं बनवलं माकड

हातात त्याच्या दिलं केळ

देवानं बनवला माणूस

हातात त्याला दिला वेळ ॥१॥


माकडच ते लागताच भूक, 

खाऊन संपवलं लगेच केळ

माणूसच तो , मुळातच वेडगळ 

विसरून तहानभूक, जमवू लागला अडगळ ॥२॥


त्यातच घालवला सगळा वायफळ वेळ

माकडापरी त्याच्या हाती उरले फक्त केळ ॥३॥

Saturday, October 03, 2026

जशी वृत्ती तो वयोगट!

नाविन्यातही जेव्हा तोचतोचपणा जाणवतो,
समजा म्हातारे झालात!
तोचतोचपणातही जेव्हा नाविन्य दिसते,
समजा तुम्ही प्रेमात आहात!
तेच तेच नको म्हणून नवीन हवं,
समजा तुम्ही तरुण आहात!
तेच तेच म्हणून तेच हवं,
समजा तुम्ही अजून बालिश आहात!

Monday, September 07, 2026

सांसारिक कसरत


भरभरून खायचे ते भरीत, 
कुरकुर करीत खायच्या त्या कुरकुरीत कुरडया! 
अन् संसार सुरळीत चालवतात त्या सुरळीच्या वड्या,

मारण्यास यावर ताव, 
नवरा मारतो नाना तऱ्हेच्या उड्या, 
सुटलेले पोट सांभाळतो, आवळून नाड्या!

अन् त्याच पोटाचे पुरविण्यास चोचले,
कधी खरेदी करतो साड्या 
तर कधी झेलतो पाठीवर छड्या!

Tuesday, September 01, 2026

काटा

सध्या सतत चालू जीवाचा आटापिटा, 

"धावा जोरात," म्हणतो घड्याळाचा काटा! 

"धावा जोरात," म्हणतो वजनाचाही काटा! 

"धावा जोरात, बसलाय काय नुसता घरात? 

घ्या गहू, दळून आणा पोळ्यांसाठी आटा!" 


बायकोचा आवाज पडताक्षणी कानात, 

अंगावरही येतो मग काटा! 

काट्याने काटा तर सोडा, 

"काटा रुते कुणाला" हे एकायला देखील नाही वेळं; 

त्यामुळे करतो आता टाटा, टाटा आणि टाटा!


फुलपाखरू

एक होतं पाखरू,

दिसताच फूल लागलं फडफडू!
फूलच ते, कालांतराने गेलं कोमेजून,
छोटंसं पाखरू, लागलं धायमोकलून रडू.
ते बघ अजून एक फूल,
पडली त्याला लगेच नव्याने भूल!
लागलं लगेच आनंदाने बागडू;
वेड म्हणावं का येडं, एकदमच fool!
नाव पडलं त्याचं foolपाखरू, फुलपाखरू!

Saturday, August 29, 2026

गिरीधारी

 ना दु:खात सहभागी

ना आनंदात भागेदारी

एकलाच हिंडतो दारोदारी

चमत्कारी माझा गिरीधारी

Sunday, July 26, 2026

एकादशीचा उपवास


लाडू खाण्यास आतुर, 

नाही कुणीच चिंतातुर

चिंतनात लाडवाच्या, काढला दिवस उपवासाचा,

क्षणोक्षणी मेंदू होऊ पहात होता फितूर.

वरवर जरी उपवास इच्छाशक्तीला 

करीत होता तो जी हुजूर जी हुजूर ॥१॥


तरलो कसा बसा खाऊन साबुदाणा, भगर.

पोटात तरी ओरडतंच होते कावळे,

दिला त्यांनाही नैवेद्य सुका मेव्याचा,

टाकून प्रामुख्याने काजू नी खजूर ॥२॥


आषाढीच्या दिवशी बाळगले मनात हेच विचार,

न लागू देता कुणास ताकास तूर।

पांडुरंगही हसून विचारतो, 

"किती रे होऊ पहातोस चतुर?" ॥३॥


तो प्रेमळ, करीतो तरीही तोच कृपा,

व्यावसायिक जगातही तो,

निःशुल्कच करतो दूर, सगळीच कसूर! ॥४॥