Friday, November 12, 2010

मुग्धाचा पती


तिला बघून मुग्ध झाली मती
जरी चालू होती साडेसाती
खूप केल्या तिने उचापती
आणि मीच झालो तिचा पती

प्राणी


कोकिला घेते छान तान
कार्कोच्याची बारीक मान
हत्तीचे सुपासारखे कान
जिराफाची उंच मान
डुकराची फारच घान
माकडाचे हरपले भान
गेंड्याची शेपटी फारच लहान
उंटाला लागतच नाही तहान
सिंहाची असते भारीच शान
आमची गाय सगळ्यात महान

यमक

शब्दाला शब्द जोडून उगाचच जुळवलेले यमक
म्हणजे शेपूची भाजी वजा नमक
कवीला उगाचच वाटते, आपण दाखतो बुद्धीची कुमक
पण खरं, तर अशी कविता ऐकणाऱ्या शोर्त्यांचीच आहे खरी धमक
आता आवरतो नाही तर, लिहून लिहून येईल हाताला चमक
बघा बरं, परत एकदा जुळवले कि नाही यमक

लग्नाची बेडी

"लग्नाची बेडी, जमली आमची जोडी"

जोडीने आम्ही जेवतो, जोडीने आम्ही फिरतो,
जोडीने आम्ही झोपतो, आणि खरं सांगायचं म्हणजे
जोडीनेच आम्ही एकांत देखील भोगतो

आमची छबी

दिवस आला, रात्र आली
बघता बघता रात्र गेली
आणि मग काय, दिवस गेले
आता रात्रीबरोबर दिवसाचीहि झोप गेली
पण सांगायची गोष्ट म्हणजे,
निरंतर आनंद देणारी आमचीच छबी
पृथ्वितालावारा अवतरली

कातर मन

कारणाविना आज मी हिरमुसलो
भावनांचा उद्वेग आवरला नाही म्हणून
मी माझाच माझ्यावरच रागावलो
विचार करून करून मी आता पकलो
शेवटी शब्दान्मार्गे भावनेचा निचरा करून
मी गालात्यागालात हसलो

विचारांचे थैमान


काही तरी लिहावे छान
विचारानेच झालो मी बेभान
डोक्यात मांडले विचारांनी थैमान
विसरून भूक तहान
रचली हि शब्दांची कमान

Thursday, November 11, 2010

सामान्य नौकर-दार

सामान्य नौकर-दारासारखा मी
रविवारीच करू लागलो विचार
सोमवार नंतर कधी येईल शुक्रवार
ती म्हणाली, मंगळवार, बुधवार , गुरुवार
आणि नंतर....शुक्रवार.
जर खरोकारच हवा असेल तुला फक्त
शुक्रवार, शनिवार आणि रविवार
कर स्वत:वरच उपकार,
अजूनही आहेस तू दमदार,
विचार कर जोरदार आणि
चालू कर तू एक मस्त व्यापार
आणि हो तूच  तुझ्या जीवनाचा शिल्पकार
आणि मगच खर्या अर्थाने होईल तुझे या पृथ्वीतलावर घरदार!

Sunday, November 07, 2010

पाडवा


आज पहिला पाडवा
जीवनात आला खूपच गोडवा
आता कोणीच येणार नाही आमच्या दोखात आडवा
१०० वर्षान नंतर देखील
देव म्हणेल यांना कशाला सोडवा

यदा कदाचित

======================

यदा कदाचित घडेल काही अवचित
असं वाटला नसेल तुम्हाला कदाचित
ज्याचे व्यासानीही केले नव्हते भाकीत
असे पाहताच आमचे "यदा कदाचित"
कळेल तुम्हाला कलियुगाचे गुपित
...आणि तुम्ही नक्कीच व्हाल आश्चर्य चकित

http://www.youtube.com/watch?v=wA-AFeMKBj8

दशकं आयुष्याची

वय वर्ष दहा
तिच्याकडे फक्त पहा
वय वर्ष वीस
तिच्या विना जीव कासावीस
वय वर्ष तीस
घेतला तिचा रोज किस
वय वर्ष चाळीस
दिला तिला माझा काळीज
वय वर्ष पन्नास
तिच्या मूळे जीवनात राहिला उल्हास
वय वर्ष साठ
खारच पक्की होती लग्नाची गाठ
वय वर्ष सत्तर
सापडले सगळ्या प्रश्नांचे उत्तर
वय वर्ष ऐंशी
तरी आम्ही हौशी
वय वर्ष नव्वद
तरीही घेतो तिला कुशीत अलगद
वय वर्ष शंभर
आता मेलो तेरी बेहत्तर