Friday, June 24, 2011

समूहातला एकांत

कितीही लोकांबरोबर असलो तरी, कधी कधी खूप एकता वाटतं
कोणाला सांगावं म्हंटलं तरी, तर माझंच मन मला खटकतं
ठरवलं सांगेन नंतर कधी तरी, पण मनात ठेवलं तर सतत बोचतं
चुकून सांगितलंच जर कोणाला तरी, सरळ म्हणतात हे काय भलतंच
असंच चालू असतं माझा काहीतरी, शेवटी सांगाय काहीच उरत नसतं

सुख

सुख म्हणजे काय असतं
showar मधलं गरम पानी असतं
त्रागा म्हणजे काय असतं
टबमध्ये घसरून पडणं असतं

सुख म्हणजे काय असतं
काही ना घेता कोठा साफ होणा असतं
त्रागा म्हणजे काय असतं
toilet paper च्या जागी रिकामा पुठ्ठा असतं

सुख म्हणजे काय असतं
बायकोच्या हाताचा उत्कृष्ट चहा असतं
त्रागा म्हणजे काय असतं
त्याच चहाचा डाग नुकत्याच आणलेल्या शहरावर पडणं असतं

सुख म्हणजे काय असतं
sketchersche सुरेख जोडे असतं
त्रागा म्हणजे काय असतं
त्याच जोड्यांमध्ये गतालेले विजोड मोजे असतं

सुख म्हणजे काय असतं
officela जायला स्वतःची गाडी असते
त्रागा म्हणजे काय असतं
garage चा दरवाजा ना उघडणं असतं


सुख म्हणजे काय असतं
बायकोच्या हाताचा चटकदार जेवण असतं
त्रागा म्हणजे काय असतं
सुटलेल्या पोटाकडे बघून तिने तक्रार करणं असतं

सुख म्हणजे काय असतं
अश्या त्राग्या मधली गम्मत बघणं असतं
त्रागा म्हणजे काय असतं
असली कविता वाचून नं हसणं असतं

--
-Prasanna.
------
Its all an illusion!

डब्यातल्या भावना

मनातल्या भावनांना सारासार विचारांचे झाकण
कितीही घट्ट असले तरी कधी ना कधी उघडेलच
दाटलेल्या भावनांना मग राहणार नाही बांध
जातील क्षणात वाहून, करतील मनाला रिक्त
सजग असाल तर राहाल तसेच विरक्त
नसाल तर पुन्ह:पुन्हा जाळूनी रक्त
गोळा कराल निरर्थक भावना फक्त