Friday, June 24, 2011

डब्यातल्या भावना

मनातल्या भावनांना सारासार विचारांचे झाकण
कितीही घट्ट असले तरी कधी ना कधी उघडेलच
दाटलेल्या भावनांना मग राहणार नाही बांध
जातील क्षणात वाहून, करतील मनाला रिक्त
सजग असाल तर राहाल तसेच विरक्त
नसाल तर पुन्ह:पुन्हा जाळूनी रक्त
गोळा कराल निरर्थक भावना फक्त

No comments: