Tuesday, June 26, 2012

उसाची मळी

अचानक एका संध्याकाळी
नजरभेट होताच दिली तिने स्मित खळी 
तत्क्षणी दिलं माझं हुर्दय बळी
कस्तुरीपरी सुवासिक आता भासते उसाची मळी

Saturday, June 23, 2012

प्रेम - डोक्याला shot !


शब्दाने होते सुरुवात प्रेमाची
  स्पर्शातून जाणवते गोडी प्रेमाची
   सहवासातून होते अभिव्यक्ती प्रेमाची
      दुराव्यातूनच होते खरी प्रचीती प्रेमाची  

Friday, June 22, 2012

Seattle सकाळ

स्फूर्तीने उठलो होताच सकाळ
बघून वातावरण ढगाळ
झाला उत्साह घायाळ
गळून पडली काल्पनिक आयाळ
चहा पिऊनसुद्धा राहिला माझा सिंह मवाळ

Monday, June 18, 2012

सप्तर्षी :)

सहवासाला झाली वर्षे सात
रुजली ती काळजाच्या आत
आता असला जरी साधंवरण भात
राहुं आम्ही सतत सुखात

Saturday, June 16, 2012

कुची कुची


उत्कटतेने वाट बघितली तिची
येताच तिने दिली कामांची सूची
मी म्हंटला थांब कि जरा, करू थोडं कुची कुची
ती म्हणली मला नाही त्यात रुची

अशी चालते गम्मत आमची
होते वाचून करमणूक तुमची 

Tuesday, June 12, 2012

पाऊस

आला पाऊस, भिजली माती
दरवळला सुगंध
झाले विचार क्षणिक बंद
मनापासून झाला आनंद 

Sunday, June 10, 2012

निवांत

काळ आहे जरी अनंत
                वेळेला असतो अंत
काढा थोडी उसंत
              जगा आयुष्य निवांत
बहरुद्या मनीचा वसंत
         तरच व्हाल खरोखरीचे संत
नाही तर राहील मनी खंत 
         जरी असाल तुम्ही लाकापरीत्वे महंत

Saturday, June 09, 2012

स्पर्श

भावनारीक्त स्पर्श
जणू जिवंतपणीचा नर्क
प्रेमळ स्पर्श
जणू मृत्युविना स्वर्ग

Friday, June 08, 2012

विलक्षण क्षण


अचानक आयुष्य बदलतो, फक्त एक क्षणं
विचारच आहे, हा विलक्षणं
करा सतत असे तुम्ही परीक्षणं
तरच राखाल स्वाभिमानाचे रक्षणं

म्हण : स्वपरिक्षणांविना आयुष्य म्हणजे अनुभवांचे निरर्थक भक्षण

Tuesday, June 05, 2012

देव देते नी कर्म नेते

रात्रीच्या जागरणाने
दिवसाचा सूर्य उगवण्या आधीच मावळला
कर्माच्या चुकीने
भाग्ग्याचा उष:काळ देखील काळवंडला 

Sunday, June 03, 2012

नियतीच्या नानाची टांग

परीस्तीथी जरी कितीही बिकट
नियतीनेच मांडला आहे पट
चला खेळूया झटपट
कशाला करायची उगाच कटकट


काम कर सटासट
सतत कर काहीतरी खटपट
विश्वास ठेव होईल सगळं बिन-भोबाट
नियतीच म्हणेल चल झाली आता फिट्टम-फाट

लबाड गम्मत ;)

कालची रात्र भारीच लबाड
दरवाजा होता उघडा सताड
हाती लगले मोठ्ठे घबाड
आजचा दिवस भारीच उनाड 

आळस

सुट्टीचे चार दिवस
अंगात भरला आळस
बेशिस्तपणाचा गाठला कळस
एरवी मी असतो अगदिच साळस

भेळ

माज्या कड़े झाली रात्र
तुमच्या कड़े झाली पहाट
माझ्यातल्या हौशी कवीने मात्र
चालू केले फालातुक चर्हाट


सकाळी सकाळी वाचाल तुम्ही असला ईमेल
जाला मज़ा जीवा या विचरने घालमेल
जोडू लागलो परत शब्दाला शब्द
तुम्हीच सांगा मी पास की फेल?

लवकर सांगा नहीं तेर विचारांची होइल भेळ
राहिल मग फ़क्त शब्दंचाच खेळ
अणि काव्यवाचनाची संपताच वेळ
राहिल तुमच्या हातात फ़क्त केळ



भेळ, खेळ , वेळ अणि केळ
चांगलाच जमला आहे हा मेळ

भूक

"पोटात लागली भुकेमुळे आग
त्यामुळे डोक्यात शिरला नुसता राग
ती म्हणाली अरे जरा नीट वाग
मी म्हणालो, आधी वाढ सरसो का साग"

गले मे खिचकीच

"धरला माझा घसा
आता ओरडू कसा
TheraFlu ढोसा
आणि गप्पं बसा"

चिंता कामाची

"डोकं झालाय जाम
काहीच होत नाहीये काम
आता चिंतने फुटलाय घाम
आता फक्त घ्या हरीचे नाम"
 

Parking ticket

"गालात हसु आणि डोळ्यात आसु
असंच काहीसं झाला मला आज
सापडला राजा राणीचा आज ताज
पण जाणवला seattle पार्किंग चा जाच"

जंत

औषधे अनेक निर्मिले हस्ते संत महंत
घ्या ती रोज उरणारच नाही मग खंत
मारताच पोटातील हे जंत
तू देखील चालवशील भिंत

मोरोपंत

विचार आहेत अनंत
पण नसते फार उसंत
कधी कधी जमते यमक तंतोतंत
अंगात येताच मोरोपंत

दर्दी ला झाली सर्दी

अरे आपने तो हद कर दि
पियो दुध डाल के हल्दी
भाग जायेगी आपकी सर्दी
सच बताये तो आप हि है असली दर्दी ;)

अर्धी कविता

"बर्फ वर्षावाने जरी झाली मला सर्दी
तरी श्रोत्यांनी केली माझ्या भोवती गर्दी
खरोखरच असाल दर्दी
तर सध्या फक्त एका हि कविता अर्धी"

बर्फाचे पांघरुन

"थंडीने घेतले सगळ्यांना गोंजारून
निसर्गाने अंथरले बर्फाचे पांघरुन
गाडीला घेतले tire - chains ने सावरून
अवर्णीय असा अनुभव घ्या आवर्जून"

अतिरेकी

घडतं काही तरी अचानक
जातात लाखो बळी हकनाक
घ्यावे लागते फुंकून,जरी असेल थंडगार ताक

बाळगू नका त्यांचा धाक
ते आहेत बेशिस्त काक
लवकरच त्यांना बेडीत टाक

खंत

मला हवा होता फक्त एकांत
पण जुन्या आठवणीनी अनंत
माझ्यातल्याच मीपणाचा झाला अंत
तिच्याविना आयुष्य्चात एवढीच एक खंत


Facebook चारोळ्या

नुसते updates; पण आहेत कुढे चारोळ्या
ऐकून मित्राच्या असल्या आरोळ्या
थंडीत देखील, heater -च्या कृपेने आल्या मला घामोळ्या
येतो आहे लवकरच वसंत घेऊन बकुळेच्या  कळ्या

मग अजूनच वळवळतील मेंदुतील्या अळ्या
ऐकताच असल्या शब्दरचना घुसवाल कानात सळ्या
मग हळू हळू होतील ह्या देखील शिळ्या
मग मागाल 
पुन्हा नवीन चारोळ्या


सागर नी सरिता

सागर म्हणाला, अगं राणी, रागावतेस का अशी? तू म्हणजे मीच नाही का..
उन्हा तान्हा मध्ये, माझीच वाफ करतो...
माझ्यातला सगळा खारट पण बाष्प रूपाने घालवून
मेघ रूपाने मीच येतो कि तुझ्या बरोबर दर्या खोर्यातून मजा बघायला.
सारिते, तू म्हणजे मीच, आणि मी म्हणजे तूच...फक्त गोड, मिठाव्यातीरिक्त,
तुझ्या नि माझ्यात नाही काही मी आणि तू, कारण, तुझ्यात आणि माझ्यात असंच मुळी नाही काही.. 
तू म्हणजे मीच, फक्त मीठ व्यतिरिक्त

Facebook मैत्री

Facebook वर वाचतोय नुसते update,
तू घुसतेय माझ्या काळजात थेट
करशील का माझ्याशी गाढ-भेट
होऊ आपण एकदम मस्त mate

Internet ची किमया

Facebook ची बात आहे एकदम खास
मित्राशी गप्पा होतात जरी नसले ते जवळपास
Updates ची सतत लागलेली असते एकच आस
झालेच चुकून-माकून जर मन उदास
login करताच नव्याने जाणवतो उल्हास
जागा होतो माझ्यातला सूरदास
यमक जळवून जळवून मग मस्त hoto time -pass
फुकट publication ची थरून कास
Internet ची किमया खरोखरच आहे झकास

आसक्तीपूर्ण स्वप्नं

घडेल असे काही अवचित
वाटून गेले स्वप्नात

वाणीवर येवूनी ओठातून फुटेना
हृदयाचे मनोगत बुद्धीस कळेना
शरीराची आसक्ती आवरेना विवेका
विचारांनीच घोटला गळा मनाचा
अन पहुडले हे शरीर निपचित
अन घडले खरच हे अवचित

पडलेल्या त्या रात्रीच्या स्वप्नात  

हृदयाच घर

राित्रचा उलटला प्रहर
िवचाररुपी मुंग्यािन केला कहर
आठवणींची आिल पुन्हा लहर
ह्रदयातच िदलं ितला घर

विश्रांतीविना वेडा

 
अरे वेड्या 
परवा आज उद्या
म्हणत् सततं मारतोस उड्या
कधी तरी तर िवश्रांती घे की गडया
Dedicated to ....

चांदण्यातलं नक्षत्रं

विशेषच होती आजची रात्र
पसरल हेातं चांदणं सर्वत्र
पारणं िफटलं पाहुन ते नक्षत्र
आता मन रमेचना अन्यत्र

मुंग्याची रात्र

आज पुन्हा झाली रात्र
िवचाररुपी मुंग्या पसरल्या सर्वत्र
वर्षानु वर्ष चाललं असचं हे सत्र
अनावर होऊन िलहलं मग ितला पत्र