Sunday, June 03, 2012

आसक्तीपूर्ण स्वप्नं

घडेल असे काही अवचित
वाटून गेले स्वप्नात

वाणीवर येवूनी ओठातून फुटेना
हृदयाचे मनोगत बुद्धीस कळेना
शरीराची आसक्ती आवरेना विवेका
विचारांनीच घोटला गळा मनाचा
अन पहुडले हे शरीर निपचित
अन घडले खरच हे अवचित

पडलेल्या त्या रात्रीच्या स्वप्नात  

No comments: