Sunday, June 03, 2012

सागर नी सरिता

सागर म्हणाला, अगं राणी, रागावतेस का अशी? तू म्हणजे मीच नाही का..
उन्हा तान्हा मध्ये, माझीच वाफ करतो...
माझ्यातला सगळा खारट पण बाष्प रूपाने घालवून
मेघ रूपाने मीच येतो कि तुझ्या बरोबर दर्या खोर्यातून मजा बघायला.
सारिते, तू म्हणजे मीच, आणि मी म्हणजे तूच...फक्त गोड, मिठाव्यातीरिक्त,
तुझ्या नि माझ्यात नाही काही मी आणि तू, कारण, तुझ्यात आणि माझ्यात असंच मुळी नाही काही.. 
तू म्हणजे मीच, फक्त मीठ व्यतिरिक्त

No comments: