Saturday, July 21, 2012

गणित

भौतिक सुखाचं  गणित
करावं ठेवून वृत्ती सात्विक
आनंद लाभला जरी त्वरित
समाधान राहील फक्त क्षणिक

समाजतली उगार

सात्विक विचार उत्तम आचार
म्हणून मनाला करतो फक्त लाचार
कामाशिवाय देतं का कुणी पगार
सगळाच असतो निव्वळ व्यापार

Thursday, July 12, 2012

माणुस

आयुष्य म्हणजे दिवसांमागून दिवस
मनाला सतत असते अनुभवांची हवस
लागतो सद्सद्विवेकाचा कस
स्वतःच धरतो स्वता:वर आकस  
प्रत्येकातच असतो का असा एक वेगळा माणुस ?