Wednesday, October 10, 2012

मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारणं

उपाशी पोट
डोकं  सुन्नं
पोटभर अन्नं
मन  प्रसन्न 

Tuesday, October 09, 2012

पिंजरा


शरीराला बांधले मर्यादांच्या पिंजऱ्यात 
मनाला कोंडले विचारांच्या पिंजऱ्यात 
अभिव्यक्ती जखडली शब्दांच्या पिंजऱ्यात 
अस्तित्व विरजले जगरहाटिच्या पिंजऱ्यात  

Wednesday, October 03, 2012

पोहे

बायकोच्या हातचे पोहे
मनी फारच भावे
उपाशीपोटीच नव्हे
भराल्यापोटीदेखील आनंदाने खावे