Wednesday, December 25, 2013

निसर्गरम्य

स्थितप्रज्ञ डोंगरावरची घनदाट वनराई
त्यावर अंथरली अंबराची निळाई 
नितळ पाण्याची अवखळ खळखळ
संथावून गेली संतत विचारांची खळबळ
चला करु या आता निवांत गाईगाई


 

Monday, November 25, 2013

साद


कंटाळून घालतो आता शेवटचा वाद,
नको पुनःपुन्हा तेच संवाद
तुझ्या मिठीनेच,  झाले जीवन माझे  बरबाद
पर्वा नाही जरी समाजास वाटला हा घोर प्रमाद  
निघालो मी, निघ तू, राहू दोघेही आबाद
नव्याने जगण्यास, जीवनच घालतेय आपल्याला  साद

साद

कळवळून घालतोय प्रिये तुला साद
विसरून सगळे वाद
चल, नव्याने करूया संवाद
पाठीशी घाल सगळे प्रमाद
होण्याआधीच सगळं बरबाद
तुझ्या मिठीतच आहे,
माझं जीवन आबाद

Sunday, November 24, 2013

नेत्र वैद्यास (to all eye doctors & teachers)


नेत्र वैद्यास (to all eye doctors & teachers)
==============
दिलीस तू नवी दृष्टी
नव्याने भासवली तू हि शृष्टी
कल्पना विश्वापरी भासते
खरे विश्वहि  माझे
कळेचना फेडू  कसे काय,
ऋण हे  तुझे?

साद

साद
=====================
शब्दातून राहिल्या भावना अव्यक्त
संवादासाठी काढले मग हे चित्र
अबोल चित्रदेखील ठरलेच मुके
साकारण्यास विश्व हे माझे
(कल्पना) विश्वात या, तू येशील का?



======================
साद 
======================
शब्दातून राहिल्या भावना अव्यक्त 
संवादासाठी काढले मग हे चित्र 
अबोल चित्रहि पडले इतुके मुके 
तुझ्याविना भासते खरे विश्वही फिके  
आता तरी,  तू येशील का?
=======================

Friday, November 22, 2013

निशब्द

शब्द गेले सगळे सुट्टीवर,
नुसते विचार, करतील तरी काय काम
पहाटेच्या चहाचे आता, चुकवू कसे मी दाम ?

Saturday, November 09, 2013

कोड्यातली क्लृप्ती

शरीराची आसक्ती,
त्यांतून नियमांची सक्ती,
त्याहून वरताण, मनातली भक्ती,
करण्यास यावर मात, ज्यासी माहिती युक्ती
त्यासी कळेल हि उक्ती

बळी

एकाच्या आनंदासाठी, दुसऱ्याचा का जावा बळी?
बचैन करे मज असल्या विचारांची साखळी
दमलो विनवून निर्दयी समाजास वेळोवेळी
पोटतिडकीने शेवटीची फोडली मी किंचाळी

Thursday, October 31, 2013

मुलभुत गरजा

मुलभुत गरजा - अन्न, वस्त्र िनवारा
वाढतात, वाढवाव्या तेवढ्या गरजा
उगाच, वाढतो निवाऱ्यात मग पसारा 
पसाऱ्याऐवजी  गरजांनाच थोडं आवारा 
अन घराला वस्तुंऐवजी सौजंन्याने सजवा 

Saturday, October 19, 2013

जबाबदारी

थंडगार कॉफी किंवा वाफाळणारा चहा
कल्पनेनेच जीव माझा गलबले
सुटले चवीचे सगळेच चोचले
जबाबदारीत नव्या जीवन आता गुंतले

डोईजड

नसत्या आठवणींचं ओझं
करतं डोक्याचं भजं
मत हेच माझं
काय म्हणणं आहे तुझं 

कोजागिरीची भेट

दुध उकळता भांडे जसे करपले
प्रेमात तुझ्या तसे मन माझे खरचटले
जसे जसे आयुष्य भविष्यात भरकटले
सहवासाविना तुझ्या,
तुझ्या आठवणींची झाली शुल्लक टरफले
तरी सुद्धा तुझ्याविना माझ्या जीवनात,
माझे मन पुन्हा कधीच नाही करमले

बदल

होऊद्या नव्याची सवय सावकाश
लागला जरी प्रदीर्घ अवकाश
तोडा जुनकट पाश
होण्याआधीच सर्वनाश 

Wednesday, October 16, 2013

यादृच्छिक प्रश्न

शेर ने जब से चखा गरम खून, हो गया हे वो बेकरार
संस्कृती कि दिवार क्यो करती है उसको बेकार?
तोडेके दिखावे कि ये दिवार,
क्या उभरेगा उसका असली किरदार?

Saturday, October 05, 2013

गांडूळाची गम्मत

शब्दांची करून रचना विचित्र
रंगवी डोळ्यासमोर काल्पनिक चित्र
विचारांच्या गांडूळाचे अजीबच आहे तंत्र
मेंदूवरच्या वळ्यांमध्ये वळवळून 
लिहवी माझ्याकडून facebook वर पत्र

Thursday, October 03, 2013

निराशा


होत्या अनेक अपेक्षा
केली अफाट प्रतीक्षा
पदरी पडली फक्त उपेक्षा
हे आयुष्या, का एवढी परीक्षा?

Monday, September 23, 2013

गोची

जीवन म्हणजे निव्वळ रस्सीखेच
माणसं नवीन डावपेच तेच
सगळेच करती खेचाखेच
सुटेलच कसा हा पेच
 

Saturday, August 10, 2013

विरह

लिहायचं असलं तुझ्यासाठी
फिरतात गरागरा चक्रं बुद्धीची
बंद झाकण हृदयाचे उघडते खाडकन, भावनांच्या उद्रेकाने
विचारांच्या बांधानेहि थांबत नाही, प्रेमाचा पाऊस
भर उन्हाळ्यातही मग गडगडतात विजा
अन क्षणिक विरहहि भासतो जणू निरंतर सजा
तुझ्याविना खरोखरच नाही कशातच मजा

हो कि नाही ?

नाही म्हणणं  सोपं नसतं
कधी कधी नाही म्हणता येत नाही
म्हणून हो म्हणणं  देखील अवघड असतं
हो हो म्हणता म्हणता,
नाही म्हणणं अधिक अवघड होऊन बसतं
नाही नाही म्हणता म्हणता,
हो म्हणणं  मात्र सोपं असतं
हो नाहीच्या द्वंद्वात,
मनाची कुचंबणा होऊ द्यायची नाही
काय करावं, कळतंय पण वळत नाही

Plan A किंवा Affair?


आयुष्यभराचा  असावा असा एकतरी मित्र 
रंगवलेली स्वप्नातली ती चित्र 
सहज साकारेल तो न होता गलीगात्र 
शोधते मी त्याला सर्वत्र 

Friday, August 09, 2013

वास्तव

ऐके दिवशी, म्हटलं घ्यावा जरा खऱ्या आनंदाचा शोध
Google केलं लगेच, Facebook status हि  केलं update
Bing करून सुद्धा सापडलं नाही, म्हणून वाढला अजूनच क्रोध
Baidu, Yahoo नंतर कंटाळून विचारलं Quora ला,
तरी उत्तराच्या नावाखाली page लोड झालं तेही कोरंच
लगेच बंद केला मग मी tablet computer अन smartphone
तळ्याकाठी मारला फेरफटका, घेऊन हातात  IceCream cone
अचानक झाला मला बोध, उगाचच चालु होता online  शोध

Wednesday, August 07, 2013

संवेदनशीलता

चुंबकाचा प्रभाव फक्त लोखंडावरच
विचारांचा प्रभाव फक्त संवेदनशील मनावरच
म्हटलं तर लोखंड सोन्याहून स्वस्त
पण उभ्या करतं वास्तु भारदस्त
संवेदनशील मन, म्हटलं तर कमकुवत
पण खऱ्या अर्थाने तेच घडवतं कमालीचं परिवर्तन
विचार करा, अन कठोरपणा एवजी संवेदनशीलतेला जपा

अनुभूती

अनुभूती
============================
निळं पाणी, काळे ढग, हिरवीगार वनराई,
तर  कधी बर्फाच्छादित पर्वत
दिसतं दृश्य सगळ्यांना एकच
तरी प्रत्येकाची अनुभूती मात्र भिन्न
कुणी होतं  खिन्न तर कुणी प्रसन्न

निर्धार

आपल्याच कल्पनांना आपणच गोंजारायचं
शब्दांना खेळवून, त्यांना कागदावर उतरवायचं
असंख्य कागदांच्या बोळ्यानंतर -
एखादं कागदी विमान उडवायचं
हे नाही तर ते, पण काही तेरी का होईना घडवायचं हे नक्की 

नवनिर्मिती

पेरतांना वाटलं हे प्रयत्न जाणार फोल
उगवलं तेव्हाच कळलं त्याचं मोल
प्रश्न पडायचा, जमीन चांगली का बीज?
दोघांच्या संगमाने, फळ मिळालं मात्र अनमोल

निवडुंग

निवडुंगच पेरला मी मनात 
काटे तर टोचणारच 
काट्यांच कर्तव्य ते 
त्यात निवडूंगाचा काय दोष
उमजता हे,
तत्क्षणी मावळला सगळा रोष

ओळख

अनोळखी व्यक्तींशी करावी ओळख, सोपं  असत
ओळखीच्या व्यक्तींची जपावी ओळख, अवघड असत

बायकोचा धाक

मेंदूला संरक्षण कवटीचं
हृदयाला संरक्षण बरगड्यांचं 
मनाला संरक्षण कशाचं? - प्रेमाचं! ।।१।।

कमळाला संरक्षण जाळ्याचं
गुलाबाला संरक्षण काट्याचं
प्रेमाला संरक्षण कशाचं? - धाकाचं! ।।२।।


संरक्षण - १

कमळाला संरक्षण जाळ्याचं
गुलाबाला संरक्षण काट्याचं   
मनाला संरक्षण कशाचं? - प्रेमाचं!

सुपीक मन

मनात पेरलं गेलं जरी दुःख
घाला प्रेमानं काळाचं खत 
आत्ता नाही तर नंतर,
सुखच उगवणार हेच माझं मत


affair की Plan B?

आयुष्यभराची असावि अशी सखी
दिसत:क्षणी पटावी ओळख जन्मांतरीची
विश्वास असावा मनी,
जरी झाहाला न सहवास या जन्मी
भेटू नक्कीच पुढच्या जन्मी 

प्रेम

मी ठरवलं  एकदा
लिहावं असं काहीतरी  प्रेमाबद्दल
कि वाचणारे वाचतील दोनदोनदा
अन अनुभवातील जे, ते हसतील खदाखदा

लिहिता लिहिता, माझंच मला समाजलं
अरे त्यात लिहायचं काय नि वाचायचं  काय
ह्या तर करायच्या गोष्टी

तेव्हापासून सोडला लिखाण-वाचनाचा नाद
करतो आता फक्त प्रेम मनमुराद




वर्तुळ

त्रीज्येला केले दुप्पट, मिळाला व्यास
त्रीज्येला जोडले दोन पाय,मिळाला परीघ
त्रिज्येच्या वर्गाला जोडला पाय, मिळालं  क्षेत्रफळ
समजलं तर वर्तुळ, नाही गेलंच बघा केरात मुसळ

एहम का एहसास

जब तक चलेगी  सास
होते रहेंगे अनेक एहसास
एहससो के परे भी है जिंदगी
महसूस करोगे वो जिंदगी
निकालातेही एहसासोसे "एहम"




ओळख

ओळख ठेवणं, सहज शक्य
ओळख पटणं शक्यतो शक्य
ओळख पटवणं शक्यतो अशक्य
फरक समजतासमजता  - येई वार्धक्य

संबंध

मनं जुळली तर,
निरंतर दुराव्याने देखील उरत नाही अंतर
मनंच जुळली नसतील तर
निरंतर सहवासात देखील, असतं एक निराळच अंतर 

मूढाचे गूढ

एक होता मूढ, त्याचे विचार फारच गूढ
त्याचे विचार फारच गूढ, म्हणून का होता तो मूढ
फारच विचार करण्यासाराखे आहे हे गूढ
विचार करा, नाही तर आपणही ठरू मूढ 

तेहतीस

तीस वर्षांच्या वाटचालीनंतर
एकदाचा गाठला टप्पा तीन वर्षांचा
तीस वर्षांपूर्वी इतर घ्यायचे  माझा गालगुच्चा
तीस वर्षांनंतर घेतो मी इतरांचा गालगुच्चा
थोडासा जरी असलो मी लुच्चा
मनाचा मी आहे सच्चा

परीवर्तन

शांत मनाच्या तळ्यात,
नकळतच टाकला ितनं दगड पाण्यात,
त्यातुन िनर्मील्या लहरी, 
क्षणात परीवर्तल्या लाटांत,
शंात तळ्या़चा अचानकच
झाला महासागर प्रशांत

Saturday, August 03, 2013

वार्धक्य

वार्धक्याचा तसा वयाशी फारसा सबंध नसतो
तेच विचार, त्याच कल्पना
शब्द तेच, शब्दरचना देखील तीच
तोच तोचपणालातलं नाविन्यदेखील तेच
नाविण्यापणातलं नाविन्यहि नाहीसं होऊ लागलं
त्याचक्षणी वार्धक्याला सुरुवात होते

भान

कधी येणार्ऱ्या क्षणांची वाट बघुन
तर कधी गेलेल्या क्षणांचा वीट येऊन
वर्तमानातला क्षण तेवढा जातो निसटून
 

Wednesday, July 03, 2013

चिंता

डोकं झालाय जाम
काहीच होत नाहीये काम
आता चिंतने फुटलाय घाम
आता फक्त घ्या हरीचे नाम

प्राण्यांच्या गप्पागोष्टी

एक होती चिमणी
करितसे ती चिऊ चिऊ
तिला भेटला कावळा
म्हणाला  तिला काव काव
तितक्यात ओरडला बेडूक, डराव डराव
घाबरून रेकू लागलं गाढव "ढेन्चू , ढेन्चू".
कटकटीला या वैतागून गाईने फोडला हम्मा हम्मा चा हंबरडा
सिंहाने फोडली डरकाळी - म्हणाला बंद करा हा आरडा ओरडा
मांजर हळूच म्हणाली - म्याऊ, म्याऊ
 

सात कलमी दिनक्रम

गोष्टी सांगतो युक्तीच्या सात
उठा सकाळी सातच्या आत
गुंतवा रोज एक तास पहिला व्यायामात
अन दुसरा, करताना न्याहारी, वृत्तपत्र वाचनात
न करता घाई, रोज जा कामास आरामात
हजेरी लावा घरात, संध्याकाळी सातच्या आत
नाही तर, बायकोची मर्जी राखण्यास , गजरा मोगऱ्याचा आहेच सराईत
स्वप्न रंजन करत, झोपा निवांत दहाच्या आत 


Saturday, June 29, 2013

बाळ्याची गोष्टं

एक होता वाघोबा
फोडीतसे तो नुसत्या डरकाळ्या
डरत नसे त्यासी म्हशी काळ्या
उदरनिर्वाह करीतसे तो खाऊन आळ्या
काल्पनिक गोष्टी असल्या,
सांगतो आमचा बाळ्या

चारा पाचोळ्या

उमजलच असं आहे कि कुणाला समजू नये
भाभडेपणाला या भोळसटपण समजू नये
भोळसटपणाला या बावळटपण समजू नये
बावळटपणाला या वेडसरपण समजू नये
अन  पाच ओळ्यांना, चारोळ्या समजू नये

कोमजलेल्या इच्छा

स्वखुशीने अवहेरली ईच्छापुर्तीच्या संधी
तेव्हापासून विसकटतच गेली जीवनाची घडी
तडजोडींची गळ्यात अडकवली बेडी
मर्यादांच्या खोल खंदकापलीकडे
मारता येइल का कधीतरी उडी?

Saturday, June 22, 2013

कश्मकश

मन म्हणतं हि तर छोटिशी ईच्छा
बुद्धि म्हणते हि तर हवस
मन म्हणतं करून टाक एखादा नवस
लवकरच येईल तो इच्छापूर्तिचा िदवस
बुद्धि म्हणते त्यापेक्षा आयुष्यभर तरस

Friday, June 21, 2013

अर्धवट

माझ्या आयुष्यात आता नाही माझीच वट
सगळ्याचीच मला वाटते आता कटकट
कधी कधी तर मीच रचतो माझ्या विरुद्ध कट
आणि करतो देखील तह, करून मान्य माझीच अट 

आयुष्यात माझ्या आता सगळच अर्धवट
वाटलं होता जगून संपवेन झटपट
खेळ मांडला जरी कुणीही 
पूर्ण केल्या शिवाय सोडणार नाही हा पट 
बिनबुडाच्या विचारांच असल्या
 करणार आहे मी कडेलोट 

Tuesday, June 18, 2013

प्रसंग अनुभवा, आठवणी टाळा

आहार नेहमीच असावा ताजा
तसेच प्रसंगही अनुभवावे तेव्हाचे तेव्हाच
शिळ्या अन्नाने जसे होते अजीर्ण
जुन्या आठवणी चाखुन
मनं होतं विदीर्ण आणि मेंदू अवकाळी जीर्ण

जुने प्रसंग, नवे अनुभव


गुलाबाचं फुल देताना
टोचला होता मला एक काटा
कळवळून रडता, घेतले तिने कवेत
स्पर्शास त्या मी काय वर्णावे
तरंगूच जणू मी लागलो हवेत  


आठवणींच्या असल्या जंगलात फिरताना
पुन्हा टोचला तोच काटा
स्मितहास्याने सहज सोसल्या त्याच वेदना
आवडत्या फुलांवर तिच्या, पडताच दृष्टी
पापण्यांचा बांध अश्रूंना आडवेना 

स्वच्छंदी स्वार्थी

आयुष्य जगावं असेल जशी मर्जी 
समजु नये त्यास खुदगर्जी 
फाटलं तर गाठावा उत्तम दर्जी 
लगेच शिवून राखावी मर्जी

Monday, June 17, 2013

वाटचाल

तुम्हाला काय करायला आवडतं?
आकांक्षांच्या पंखांनी उडणं
अपेक्क्षांच्या ओझ्याने बुडणं
कर्तव्याच्या पायाने जमिनीवर चालणं
तुम्हाला काय करायला आवडतं?


Sunday, June 16, 2013

फटकळ

परखड असावं पण परवडेल इतकच
समोरच्याला परसाखडल लागेल
इतक पण परखड असणं परवडणारं  नव्हे

Thursday, June 13, 2013

जागरणाचं जष्टिफीकेशन (Justification)

आयुष्य उरकण्यासाठी नसतं
ते उपभोगायचं असतं
नुसतच जगुन संपवा़़चं नसतं
आस्वद घेत घेत
कधी जागुन, तर कधी जागवुन
चवीने जगायचं असतं

हुंदका

अपरंपार दुःख माझे
खंदकात खोल पुरले
हुंदका अचानक एक नकळत निसटला  
थेट ढगात जाऊन पाऊसापरी कोसळला
चिंब भिजवून माझ्यासवे मातीला
सुगंध मोहक दरवळवु लागला
नव्याने मोहरून मनास माझ्या
पुरलेल्या दु:खात पुन्हा मिसळला

Tuesday, June 11, 2013

च ची (मनाच्या श्लोकांची) चारोळी

निष्क्रीयेतेला अपयशच येणार
प्रयत्नांना यशच येणार
लिहायला लागलं कि सुचाणारच
वाचायला लागलं कि समजणारच
करायला लागलं कि घडणारच
श्रमांना फळ हे मिळणारच


समिकरण

अन्न असलं जरी कितीही उत्कृष्ट
तरी पचनानंतर निचरा हा आवश्यकच
नातं  कितीहि जरी अतूट
निचऱ्याची शिवाय फारच बिकट
कुठच्याही उपभोगानंतर, भोग हे अटळच 

Monday, June 10, 2013

कवी ला बस्ती

एकदा केला मी पण
रोज करणार जबरदस्त कविता दोन
प्रयत्नांना आले नाही फारसे यश
शोधले मी मग कारण
संकल्पात झाली होती थोडी चूक
करू लागलो जबरदस्ती कविता दोन
करण्याएवजी जबरदस्त कविता दोन 

नाती गोती

नाती गोती
नाती कधी रक्ताची
तर नाती कधी मनाची 
नातीच नेतात गोत्यात 
तर कधी गोत्यातूनच जुळतात नाती
नाती करतात गुंता 
तर कधी सोडवतात तंटा 
गमती जमतीची असतात हि -
नाती गोती, नाती गोती 

नाती

उसवलं तर शिवता येतं
फाटलं तर ठिगळच लागतं
म्हणूनच फाटू द्यायचं नसतं
अन उसवणार नाही
असच शिवायचं असतं

ठिगळ

उसवलं म्हणजे फाटणं नव्हे
फाटणं म्हणजे उसवलं नव्हे
उसवलं तर शिवता येतं
फाटलं  तर ठिगळच लागतं 

अनुभूती : केल्याने होत आहे रे ….

आनंद टिकवावा लागतो
दुःखं भोगावं लागतं
ऎश्वर्य कमवावं लागतं
दारिद्र्य सहज कवटाळतं
कृतीनेच हव्याहाव्याश्या गोष्टी घडतात
निश्क्रीयतेनेच नकोश्या गोष्टी चिकटतात

Saturday, June 08, 2013

जीवनंमरणाचा प्रश्न

आता आठवुन सारं हसू येतं
कधी काळी याच गोष्टी साठी मी गदगदून रडलो होतो
साफ खोटं आहे हे,
आत्ता जरी आठवलं तरी गदगदून रडतो मी
अन माझंच माझ्यासमोर हसू होतं

Friday, June 07, 2013

प्रश्न

माझ्या आयुष्याची गोष्ट
मी पाहतोय की
मी सांगतोय कि
मी लिहितोय

गोष्टच ती
कधी गमतीदार आनंदी तर
कधी रटाळ, भयानक
गोष्टच ती … 

Thursday, June 06, 2013

अळणी आयुष्य

जगताना पाळाले अनेक नियम
मरताना शेवटी कळवला यम
म्हणाला अरे मारू  तरी मी कसा तुला
तू तर जगालाच नाहीस, मरणार तरी कसा
तोडतो आता मी माझाच नियम
जा जगून ये पुन्हा एकदा सोडून जरासा संयम 

स्वार्थी आत्महत्या

जगताना थोडं थोडं मरण्यापेक्षा
मरताना थोडंसं जगलेले काय वाईट?
वर्षानुवर्षे जगलो, जगणाऱ्याचे हाल वाईट
मेल्याने झाले का कधी मरणाऱ्याचे वाईट?

मृत्यु

मेंदू मंदावला
शरीर थंडावलं
मृत्युचं सुख
सावकाश उपभोगलं

Communication Gap

माझ्या मनातलं तिला कळेना
तिच्या ओठातलं मला कळेना
कळवळून विचारलं मग एकमेकांना
बहिरा मी कि मुकी तू?

स्वच्छंदी कवी

होता एक स्वयंघोषित कवी
करीतसे रोज एक कविता नवी
कधी शब्दरुपाने कल्पना फुलवी
तर कधी धुसमुसता त्रागा शमवी
कधी गमतीदार  परीक्षण ऐकवी
तर कधी उगाच यमकं जुळवुन फसवी

Wednesday, June 05, 2013

सल

मनातलं दुःख जितकं खोल
चेहऱ्यावरच हसु तितकंच  फोल
विचारांचा सांभाळायचा किती तोल
अरे मुक्या मना, तु मोकळ्या मनाने बोल

Sunday, June 02, 2013

आडमाप योगा

सकाळी उठताच जबरदस्त केला योगा
आता कंबरर्दुखीची फळं भोगा

Wednesday, May 29, 2013

चहाच्या कपातली वादळं

नवऱ्या बायकोचा स्वभाव लग्नातच मिळतो आंदण
घातले जरी मग कितीही विचारांचे कुंपण
अधूनमधून होणारच कि हो भांडण
तेच निरंतर संसाराचं वंगण

साठी बुद्धी नाठी

जगावं  फक्त स्वत:साठी
मरावं फक्त दुसऱ्यासाठी
कळेपर्यंत उलटून जाते साठी
म्हणूनच बुद्धी फारच नाठी

illusion

पत्त्याचा महाल, रचिला स्वप्नात
डोक्यात भरला राग, विसकटून टाकला क्षणात
इतके वर्ष जगलो फक्त भ्रमात
खरतर मी मरतच होतो रोज आरामात 

कपातली वादळ

सतत भांडण तंटा, डोक्याला कटकट
सगळेच असतात थोडेफार हेकट
मीच मांडलाय हा पट
तरी का होते उगाच - आदळआपट
परिस्तिथी होतेय फारच बिकट

 

Tuesday, May 28, 2013

(वेड्याचे) मनोगत

निशब्द: शांतता
बोलू लागली माझ्याशी अचानक
सगळ्यांचेच किस्से
मुकेपणीच ऐकवू लागली मला नाहक

तेव्हा पासून माझं छान चालु लागलं
आयुष्याच गुपितच जणू मला कळू लागलं
तर लोकं म्हणू लागले -
अरेरे! याला तर वेडच लागलं

सध्या मी गडबड गोंधळातही, शांत असतो
कारण मुकाटपणे मी फक्त ऐकत असतो


Thursday, May 23, 2013

असंबद्ध संबंध

मी चहा केला,  तर तिला हवी कॉफी
मी पोळ्या केल्या, तर तिला हवा भात
मी कविता केली, तर तिला हवा निबंध
अरे काही आहे का नाही धरबंध
कलात्मकतेचा नाही काहीच गंध

Wednesday, May 22, 2013

घराची आकांक्षा

अनेक आकाशगंगा
त्यातली एक सूर्यमाला
त्यात सुर्य अनेक

त्यातल्यातला एक सुर्य
त्याभोवती फिरती ग्रह अनेक

त्यातली एक पृथ्वी
त्यात देश अनेक

त्यातल्यात एक भारत
त्यात राज्य अनेक

त्यातल्यात एक महाराष्ट्र
त्यात  जिल्हे अनेक

त्यातल्यात एक पुणे
त्यात घरे अनेक

त्यातल्यात एक घर
एकच माझं घर, छोटंसं घर
त्यातच भरलं माझं उदर


प्राण्यांची ओळख

विंचवाची ऎट भारी
नांगी वर करतो घालून धाक चाव्याचा विषारी
सापाची ऎट भारी
पायाविना पोहचतो घरोघरी, असते दुधाची न्याहारी
खेकड्याची ऎट भारी
तिरप्या चाली ने चढतो कड्या कपारी
पालीची ऎट भारीभिंतीवर निपचित चिकटते, दिसताच आणते किळस भारी
मांजरीची ऎट भारी
आडवी येताच, अडले काम- करा नारायण हरी

जोडीदार

कुत्रीला आवडतो कुत्राच
मिळूनच फुंकतात उकिरडा

म्हशीला आवडतो रेडा
असला जरी तो काळा

तसच, तुला फक्त मीच
अन मलाही मला फक्त तूच




Junglee

सोडून जंगलाचे दुकान
निघालो मी Amazon च्या ढगात
गिऱ्हाइकांच्या थेट खिशात घालून हात
तपशील दाखवणार वेगवेगळ्या पावत्यात

Junglee.com  तात्पुरता टाटा!

बायकोची विनवणी

प्रिये, तुच माझी खरी गरज
सतत करेन तुझ्या नावाचा गजर
दिमतीला तुझ्या नेहमीच हजर
सेवेस राहीन अतिशय तत्पर



Saturday, May 18, 2013

कौटुंबिक पिसारा

एकट्याला एकटेपणाची सोबत असते
तरी तुझ्याच सहवासाची गरज भासते
आपल्या दोघात जरी तिसऱ्याची  होते फारच गर्दी
दोघांचेच तरी करू चारचौघे अन फुलवु पिसारे आनंदाचे

 

व्याभीचार कि कुटुंबवत्सलता

एकट्याला एकटेपणाची सोबत असते
तरी तुझ्याच सहवासाची गरज भासते 
आपल्या दोघात तिसऱ्याची  होईल फारच गर्दी
तसल्या तिसऱ्यापेक्षा, करू दोघांचेच चारचौघे
फुलवु आनंदाचे पिसारे

चले चलो

आयुष्यात सातत्य फक्त एकच
जन्मापासुन मृत्युकडे वाटचाल सतत
जरी तुम्ही रंगवली उज्ज्वल भविष्याची स्वप्ने अमाप
किंवा घुटमळलात दुखा:ने आठवणींच्या  चिखलात
ती वाटचाल ना घेते वेग ना मंदावत
का बघा मग वळून मागे?
वा करावी घाई जाण्याची पुढे? 

Friday, May 17, 2013

आनंदाची पोळी

तिच्याकडे बघताच डोळ्याचं फिटलं पारणं
तिच्यामुळेच आता मिळालं जगण्याचं कारण
प्रेमापोटी तिच्या माझं चालतं सतत जागरण
कधी देईल ती मला पोळी भरून आनंदाचं सारण



 

Sunday, May 12, 2013

रविवारची वामकुक्षी

मुग्धा माझी खरोखरच अन्नपूर्णातिच्याहाताचं जेवून मी बनतोय कुंभकर्णा

दुपारची झोप रात्रीचा त्रास

दुपारच्या झोपेने केले रात्रीच्या झोपेचे खोबरे
दुपारी काम करून रात्री झोपलेलेच बरे 

Saturday, May 11, 2013

स्वच्छंदि

जगात खरे नियम असतात फारच थोडे
अपेक्षांच्याच ओझ्याने दमतात सगळे घोडे
अपेक्षांच्या या साखळदंडास तोडावे कसे
न होता निर्दयी, निर्ढावलेला, बेदरकार

Friday, May 10, 2013

चाकोरी

विचारात तोचतोच पणा
कृतीतही  तोचतोच पणा
परीणामत: फलश्रुतीतही तोच तोच पणा

फुकट सल्ला क्र. ३

कल्पना असतात अनेक
विकल्प साकारण्याचे त्याहुनी अनेक
संकल्प करा फक्त एक
गुपित हेच यशाचे प्रत्येक

फुकटचा सल्ला क्र. २

अमर्याद विचारांना
मर्यादित कृतीची जोड देण्यापेक्षा 
मर्यादित विचारांना
अमर्याद कृतीची जोड जास्त फलदायी


 

ऋतूचक्र

अंगणातला गुलमोहर
वसंत येताच बहरतो
निसर्गाचे नियम
न चुकता पाळतो



सुखी नवरा


भेटताच तुला झालो मी संतुष्ट
उरलंच नाही, करण्यासारखं काही आता
उगाच करवतेस का काबाड कष्ट
प्रेमानेच होतो आहे मी धष्टपुष्ट

Bad apple

कधी कधी कळपात असतो एखादा घाणेरडा
वृत्ती कुत्सित, तर कधी संस्काराने तोकडा
ओळखावा पटकन स्वभाव भिकारडा
जाण्या आधीच विश्वासाला तडा

कलियुग

रंग बदलणारा, एकटाच नाही सरडा
सगळेच करू बघतात झेपेल तेवढा राडा
भरेल तेव्हा भरेल पापाचा भरला घडा
विश्वासालाच मारताय तडा

उंबरठा

               उरला नं आता कुठचाच उंबरठा
               सगळीच कडे पसलाय उकिरडा
 (प्रेमाचा) ओलावाच पडलाय आता कोरडा
               कळवून फोडला हंबरडा
 

निरीक्षण


कोणाच्या मनात काय
ते कधीच कुणाला कळत नाय
कधी कुणी वरून दिसत गरीब गाय 
तर कुणी असतं आतुनच भित्री गाय




Thursday, May 09, 2013

मुक्ती

जगताना केला इतका भांडणतंटा 
मेल्यावर तेरी सुटेल का हा गुंता
चितेवर देखील करितो हिच चिंता
मेल्या, पिंडास शिवेलच कसा कावळा

मेलेले उंदीर

कवीमन  झाले बेचैन, सैरभैर
क्षणात उतरविले शब्द गंभीर
मन आता कोलमडेल कधीही
नाही ते आता तितकेसे खंबीर
सगळेच मेले, पिपातले मेलेले उंदीर 

अर्धवट

माझी बेचैनी तिला समजेना
तिची चैन मला परवडेना
तिच्याविना आयुष्य गेले
काही केल्या पिंडास कावळा शिवेना

Wednesday, May 08, 2013

फुकट सल्ला क्र. १

शुल्लक कामे अनंत
काढा त्यातूनच उसंत
जगा आयुष्य निवांत
तरच खरे तुम्ही श्रीमंत 

Weekly special

Monday la मटकीची उसळ 
Tuesday ला तोंडल्याची भाजी 
Wednesday ला वडे 
Thursday ला थालीपीठ 
Friday ला फणसाचे गरे
Saturday ला सात्विक साधवरण भात
Sunday ला  सांजा 

Monday, May 06, 2013

मुक्त

मनाला सोडलं मोकळं
तर गेलं भरकन उडून
बांधून ठेवलं स्वतःजवळ
तर बसलं एकदमच रुसून

गुंता

तिच्या आठवणीत गुरफटत गेलो 
गुरफटता गुरफटत  आतल्याआतच फाटत गेलो
ठिगळाच्या कापडात आता पदरचच हरवून बसलो

Return to innocence

निरागसपणा सोडून म्होठं होणं म्हणजे मागासणच नव्हे का?
---------------------------------------------------------------------------------
जरी लहानपणी म्होठं व्हावं वाटायचं 
तरी म्होठेपणी लहान का व्हावं वाटतं ?

जितकं जितकं आयुष्य पुढे जात जातं
आठवणी तितक्या तितक्या मागे का जातात?



Saturday, May 04, 2013

चहा प्रेमी

दे दे मुझको एक कप चाय
प्रिये, धरतो मी तुझे पाय
पण please म्हणु  नकोस नाय
चहा सोडून मी पिणार तरी काय?

अभिव्यक्ती

जाणवलं म्हणून सुचलं
सुचलं म्हणून लिहिलं
लिहिलं म्हणून वाचलं
वाचलं म्हणून समजलं
समजलं  म्हणून जाणवलं
जाणवलं म्हणून जपलं
जपलं म्हणून आयुष्य संपलं तरी  प्रेम उरलं

Tuesday, April 30, 2013

माकडाची श्रद्धा

एक होते माकड
देवालाच घातलं  त्याने साकड
म्हणाला तूच बंद कर अंधश्रद्धेचे भाकड
का लपतोस सारखा मूर्तीत बनून दगड ? 

Sunday, April 28, 2013

रविवारची धुणीभांडी


आजूबाजूला पडलीयेत दगड्धोंडी

सगळीकडूनच झालीये कोंडी
उत्तर सापडेना कुणाच्याच तोंडी
जीव येऊ लागलाय आता रडकुंडी

असावी अशी एक जादुचीच कांडी
अदृश्यच होऊन कामाला मारता येईल दांडी
कधीच घासावी लागू नयेत  न कुणाला भांडी
आनंदाने खाऊ फक्त उकडलेली उंडी

Sunday, April 21, 2013

शेणाचा सडा

ओलावाच पडला कोरडा
कळवून भोडला हंबरडा 

विश्वासाला गेला तडा
पापाचा भरला घडा 

Saturday, April 20, 2013

कधी कधी

कधी कधी एकटेपणाचा देखील एक आगळाच सहवास असतो
अन कधी कधी सहवासात पण वेगळाच एकटेपणा असतो
         कधी कधी दुराव्यातून सहवास वाढतो
         अन  कधी कधी सहवासामुळेच दुरावा  वाढतो
कधी कधी गप्पामध्ये एक उघड अबोला असतो
अन कधी कधी तर अबोला देखील खूप काही बोलून जातो
        कधी कधी भावना व्यक्त करण्यास महाकाव्यदेखील अपुर पडतं
       अन कधी कधी अपुरी कविता देखील पुरून उरेल इतकं देऊन जाते 


Saturday, April 13, 2013

टुमदार घर

असावं  असं एखादं  टुमदार घर
त्याभोवती रम्य परिसर
आल्हाददायी एखादी हवेची झुळूक
तर कधी  टिपटिप पावसाची सर

असावं  असं एखादं  टुमदार घर
क्लेशदायी आठवणींना पडावा विसर
क्षणोक्षणी देऊन नव्या अनुभवांना अवसर
भुतकाळाला देऊन नेहमी साक्ष,
वर्तमानात राहो सतत हजर

असावं  असं एखादं  टुमदार घर
रहावं खुशाल न करता काटकसर
न वाटावा कुणास मत्सर
प्रत्येकाच्याच जीवनात यावा असा बहार

 असावं  असं एखादं  टुमदार घर
वातावरण बाहेर कितीही सैरभैर
गर्दी वादळ अशक्य गोंगाट
झोप लागावी घेताच अंगावर चादर

असावं  असं एखादं  टुमदार घर
…. 

Monday, April 08, 2013

लपंडाव

मनात दडून बसलेल्या भावनांना
शब्द कधी कधी देतात अचानक धप्पा
छान रंगतात मग मस्त गप्पा
असतील ऐकणारे जरी अण्णा  किंवा अप्पा 

Empty Vase

रिकाम्या मनात रंगतो
निरोद्योगी भातुकलीचा किस्सा
रिकाम्या भांड्यातच करता येतो कि
चहा, बासुंदी, आणि मस्त मासोळीचा रस्सा

गोंधळ

मनात नव्हतं तर ओठांवर आलाच कसं
ओठांवर येण्याआथीच तिने ओळखलंच कसं
तिने ओळाखलं म्हणून, ते भिनू लागलं मनात
मनात आता ती , म्हणून तिचं  नाव सतत ओठात 

चर्चा

निरर्थक बडबडी मध्ये असतो का काही अर्थ
विचार असा करून संपर्क तोडल्यास होतो अनर्थ
बोलत रहावं , ऐकत  रहावं , जरी वाटलं  ते व्यर्थ
कधी अचानक मुद्दा महत्वाचा एकून चर्चा होते सार्थ 

Saturday, March 30, 2013

संपर्काचे माध्यम

पत्रापेक्षा फोन बरा फोन पेक्षा "ई-मेल" बरा
"ई-मेल" पेक्षा "SMS" बरा
"SMS" पेक्षा "FB Updatech" बरा
पूर्वी  कळावे लोभ असावा
आता आवडलं तर "Like" करा
नाही तर  इग्नोर करा
 

देशांतर

अंतराचा काय इतका प्रभाव असतो
विरहाने काय रक्ताची नातीदेखील  विरत जातात
मीच माझा बाबा होतोय
मीच माझं  बाळ  होतोय
इतर व्यक्तींशी नाती सुटत जाताय माझ्यातच मी प्रेमाचा अलोवा शोधतोय
कुटुंबात राहून देखील कुणी कसं इतकं  परकं होतोय
संदर्भ बदलले कि सगळचं  कस बदलत जातंय
कोण आप्त कोण परके कळेनास होतंय

Break

चहाची जमत नाहीये भट्टी
शब्दांनी देखील केली कट्टी
कवितांना सध्या आहे  सुट्टी
FBवर सध्या फक्त जमवणार मित्रांशी गट्टी 

Sunday, March 24, 2013

अव्यक्त


मत हेतु शंका कुशंका
शब्दरुप िमळताच वाजवतात डंका
मनातल्या दरीतच त्यंाना कोंडा
या चारोळीला ना बुडखा ना शेंडा
तुम्हीच ठरवा!

Saturday, March 23, 2013

शोध

शोधता शोधता काय हरवलं हेच विसरलोय
असलेलं  देखील आता हरवत चाललंय
हरवलं तरी चालेले अश्याच गोष्टी आता जमवतोय 
शोधण्याची आता गरज नाही, हरवण्याची आता चिंताच नाही
फक्त गोळा करत जातोय
हाच माझाच मला लागलेला शोध लोकांसमोर बरळत जातोय 

Friday, March 22, 2013

Weekend cleanup

आला आला शुक्रवार 
ऑफिस मधून लवकर पसार
वीकेंडला आणणार आहे मी मस्त बहार
करून घरघुती साफसफाईच्या जबाबदारीचा स्वीकार

कॉफी & टि

कॉफी ची किमया भारी
एकच कॉफी तिच्याबरोबर
आयुष्यभरासाठी वसवली घरदारी
चुकवत  चहाच्या कपातली वादळ
आता पितो फक्त टि

Thursday, March 21, 2013

परीकथा

उद्वेगाने मारली नदीत उडी 
बुडता बुडता
पैलतीरी दिसली ती सुंदर परी
नवा आवेश संचारला उरी  
जगतो मी आता होऊन एकदम निर्धास्त
ठेवतांना तिची उत्तम बडदास्त  

जीवन बरखास्त

जपून, राखून, अर्धवट
जगतो मी करून काटकसर
ना भिडत भीती ला बेधडक
ना कवटाळत प्रेमाला बिनधास्त
धास्ती घेऊन, मोजून मापून जगण्यापारी
करुनच टाकावे का हे जीवन बरखास्त


बेजबाबदार

पूर्वी होती हिरवीगार  वनराई
त्यातच होऊ लागली  मानवाची भरभराट 
सिमेंटच्या जंगलात आता झालाय वाहनांचा सुळसुळाट
दूरदृष्टी न बाळगून त्यानेच लावलीय  सृष्टीची वाट

निसर्गानेच म्हणे केली कुचराई
इंधनाची टंचाई म्हणूनच वाढते महागाई
व्यग्र असतोस फक्त साधण्यात सुख सोई
मानवा, आता तरी  घे जबाबदारी
का करतोस अजून दिरंगाई?

नवलाई

महागाईने जाणवते धनाची टंचाई
धनाची टंचाई लावते नोकरीस आई 
बाळ  एकटे घरी करते गाई गाई
हिच म्हणे आधुनिक कुटुंबाची नवलाई

Wednesday, March 20, 2013

अनपेक्षित - डोक्याला Shot!

अनपेक्षित असं काही घडतं अचानक
उपेक्षित राहतो काही समाज हकनाक
जगरहाटिचे नियम खरोखरच खतरनाक
कोण कापेल भामट्या शूर्पणखेचे नाक 

Monday, March 18, 2013

केलंच नाही तर घडणारच कसं?

पेरलच नाही तर उगवणारच कसं
उगवलं नाही तर उपभोगणारच कसं
उपभोगलं नाही तर भोगणारच कसं
भोगलंच नाही तर जगलातच कसं
जगालाच नाही तर मरणार तरी कसं 
मेलाच नाही  तर स्वर्गात जाणार तरी कसं

जीवनगाडे

रूळ असतात समांतर
म्हणूनच तर चालते गाडी जोरात
पडले दोघात थोडेसे जरी अंतर
कोलमडते गाडी क्षणात 

अनोळखी ओळख

अनोळखी
================
ओळख होण्यापूर्वी
प्रत्येकच व्यक्ती अनोळखी असते
त्यात विशेष काय?
पण ओळखीची व्यक्ती
अचानक अनोळखी वाटू लागणं
अश्चर्यकारक नाही का?
नुसतं ओळख होऊन चालत नसत
ओळख पटणं आवश्यक असत


गुपचिळी


श्रोत्यांनीच करावी अशी चारोळी
बसेल आमची दातखिळी
लाऊन घट्ट बचळी 

बसेन मी गुपचिळी
 

Friday, March 15, 2013

असही -- तसही

म्हटलं  तर असं , नाही तर तसं
हेही खरं, तेही खरं
हे बरोबर, तर म्हणे तेही बरोबरच
निव्वळ एका तापाच्या वनवासानंतर,
नंदी  बैलापारी डोलावत मान
युधिष्ठीरहि  म्हणतो मग  "नरोवा कुंजरोवा"

Thursday, March 14, 2013

आज काल च उद्या

उद्याची गोष्टं आज नको
आजची गोष्टं उद्या नको
आत्ताच्या आत्ता ईथल्या ईथे
ना थोडं मागे ना थोडं पुढे

निसर्गाचे नियम

फुल कोमेजलं
             त्यात रोपट्याचा काय दोष?
रोपटं निःप्राण धरणार तरी किती तग
            जेव्हा पावसाविना जमिनालाच पडतो तोष
निसर्गाचेच हे नियम सारे
            का धरावा माळ्यावर रोष
या सगळ्यात खरं  तर देवाचाच दोष 

Wednesday, March 13, 2013

चारोळ्यांना द्या ब्रेंक

चारोळ्यांना मिळेनाशी झाली दाद
सोडवा म्हणतो कवितांचा नाद
कराव्यातरी कितीतरी फेसबुक्च्या पोस्ट बरबाद
अती मनोरंजनाने  होतं  अजीर्ण हे सत्य निर्विवाद  


जित्याची खोड

सापाने कितीही जरी टाकली जुनी कात
यमदूत दडूनच रहातात त्याच्या विषात
टवळीने जन्म:ताच कोरलंय भाकीत कपाळात
मरेपर्यंत आता खोड काही नाही जात

कॉम्पुटर मध्ये वसते लक्ष्मी

सध्या:
 कॉम्पुटरे मध्ये वसते लक्ष्मी,  क्रोम मध्ये सरस्वती ।
किबोर्ड स्थिता गौरी, मंगलम कॉम्पुटरदर्शनम् ॥१ ॥
====================
पूर्वी:
कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती ।
करमूले स्थिता गौरी, मंगलं करदर्शनम् ॥

Tuesday, March 12, 2013

पतंग

यशाच्या  पतंगाला उडवण्यासाठी
सुरुवातीला लागतो  संधीचा वारा

नंतर द्या ढील परिश्रमांच्या मांज्याला,
सोडून सैल फिरकी चिकाटीची

 

Saturday, March 09, 2013

सात्विक वृत्ती

आत्म्यास तुरुंग शारीरिक
मनास तुरुंग भावनिक
बुद्धीस तुरुंग वैचारिक
शरीरास तुरुंग भौतिक

केलीत जरी  पापं
ठेवा वृत्ती सात्विक

समजलं तर मार्मिक
नाहीतर फक्त गम्मत शाब्दिक  

बकरा

जोशींनी सोडला फर्मना
लवकर आता आवरा
वीकेंड पडतोय अपुरा
गलांडेनि केलाय सपशेल बकरा 

कर्मकांड

Disclaimer:  
उमजलं ते लिहिलं
हेतुपूर्वक नक्कीच नाही रचलं
भावना दुखवायचा नाही माझा कल
मी असंच आपलं
फक्त मत एक मांडलं

 ------------------------------------------

कुणास ठाऊक, कधी काळी
कुणी कोणास म्हंटले
बघा  मूर्तीतच देव
तेव्हापासुन धर्मांचा
समाजाला खूपच चढलाय  चेव

कुणास ठाऊक, कधी पासून
प्रत्येकजण स्वत:लाच अपरिचित
ओळखणारच  कसा तो
कुढल्या दगडात कुठचा देव
असला सारासार विचार बाजूला ठेव
वाढूदेत अन्धश्रध्येचे असेच पेव  

कुणास ठाऊक, कशी काय
कुणाला सुचली इतुकी कमाल युक्ती
म्हणे करा फक्त थोडी भक्ती
त्याजोडीला दक्षिणेची सक्ती
तरच मिळेल तुम्हाला  मुक्ती

कुणास ठाऊक,  कसं काय
पण घडतंय अघटीत
गंडवती मंडळी ठोकून थापा बिनभोबाट
सगळेच जाणार म्हणे  नरकात सुसाट
कुणी म्हणे, आत्म्यास लाभला तुरुंग शारीरिक
कर्मकांडातूनच म्हणे गवसेल काल्पनिक स्वर्गाची वाट 
कधी बंद होणार असले चर्हाट
केव्हाचे आलोय आता २१ व्या शतकात

माहेरचा आहेर

सासूच्या माझ्या नाव चंदा
साठी ओलांडली तरी
सतत करायचा असतो तिला काम धंदा

शाम माझा सासरा
भारतात, करून सोय गाडीची
केला त्यांनी चिंतेचा निचरा

नचिकेत माझा साळा
अजून तो आहे लहान बाळा

मुग्धाच्या माझ्या मस्त आहे माहेर
हाच माझा लग्नातला अनमोल आहे

जोशी-गलांडे गम्मत

प्रतिभा माझी आई
प्रभाकर माझे पिता
आर्शिर्वादाने त्यांच्या
सुरवात करतो आता ॥१ ॥

यमके जळवून रचण्यासाठी चारोळी
प्रसन्न देऊ लागला शब्दांना बळी
वाचुन दिपाची उत्तेजनार्थ
पाचोळी प्रसन्नची खुलली कळी
शुक्रवारच्या संध्याकाळी ||२॥ 

सुप्त श्रोत्यांनी फोडावी मस्त आरोळी
फेसबुकवर चला आता काढूया
शब्दांनीच रांगोळी 
रोज पितांना चहा सकाळी ॥ ३॥

==================

दिपा  गलांडे ची कविता

प्रतिभा तुमच्या कणा कणात,
सुचवी काव्य क्षणा क्षणात
असाल जरी संभ्रमात,
शोधताय अर्थ संसारात
गारठलात seattle च्या गारव्यात,
पण सांगताय गम्य व्यायामात
बघताय काय प्रतीबिम्बात,
सुर्य तो दिसणार कधी आपल्या आकाशात?
म्हणताय अडकलात काळाच्या प्रवासात,
तरीही आसक्ती तुम्हास आरंभीच्या क्षणात
कविवर्य, इतकेच राहूद्या लक्षात,
अडकू नका फार यमकात.

Friday, March 08, 2013

दारुड्याचं मनोगत

सोडल्या पासून अल्कोहोल 
आयुष्यात पडलंय  मोठ्ठं  होल
मस्त जरी असला माहोल
वाटतं एकदम फोल







Wednesday, March 06, 2013

थोडा गरम, थोडा नरम


काही थोडं, काही जास्त
घ्यावी मजा मस्त
आहे श्वास जोपर्यंत
बघा वाटतंय का तुम्हाला हे रास्त




ऐश्वर्या आणि अभिषेक


ऐश्वर्या म्हणली अभिषेक ला
असरे काय करतोस राजा
थोडी केली मी मजा
उगाच करू नको गाजावाजा
शेवटी तुझ्याशीच तर केलं लग्न
वाजवून सलमानचा बॅंड बाजा


Tuesday, March 05, 2013

अमान्य

सटवीने कोरलं म्हणून स्वीकारायचं
समाजाने अवहेरलं  म्हणून न्युनगंडास जोपासायचं
प्रेमाने सिंचलं नाही म्हणून तारुण्यातच कोमेजायाचं 
शरीराने खचलं  म्हणून मनाने ढासळायचं
मान्य नाही!

काळाचा प्रवास

काळाच्या प्रवासात क्षणांचं चलन लागतं
भविष्याकडे नेहमी वर्तमानातुनच जावं  लागतं
त्यासाठी भूतकाळाचं ओझं बाळगायचं  कारण नसतं
वर्तमानात्याला कर्तव्यदक्ष्येतेच भान फक्त पुरेसं  असतं


वटपौर्णिमा - सातच्या आत घरात

वडा भोवती बांधून फेरे सात
मी नाही पळून जात
नवऱ्यालाच घालीन पेकाटात लात
आला नाही जर तो सातच्या आत घरात

पुन्ह:च्य आरंभ

जित्याची खोड मेल्याशिवाय नाही जात
असा फक्त समजच आहे समाजात
करा नव्याने पुन्हा: सुरुवात टाकून जुनी कात
आयुष्य संपायच्या आत

संभ्रमित पुरुष

स्त्री म्हणते टाकू नका माझ्यावर डोरे
तीच स्त्री बांधते वडाभोवती दोरे
स्त्री सुरवातीला करते खूपच नखरे
मग वंशवृधीसाठी तीच बांधते गंडेदोरे
असं का? पुरुषमंडळी संभ्रमून विचारे  

थंडी

गुबगुबीत थंडीत झोपाल
तर होतील गाल गुबगुबीत
कडकडीत थंडीत कराल व्यायाम
तर व्हाल तुम्ही शिडशिडीत

व्यायाम

लुसलुशीत कोवळ्या थंडीत
गुरफटून झोपलो पांघरुणात
दणकून केला मग व्यायाम
त्यावेळी पडलेल्या स्वप्नात


सुप्रभात

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात
आला सुर्य निळ्या आकाशात
दिवसांमागून रात्र, रात्रीमागून दिवस
चालते चक्र निरंतर
कामावाचून नाही गत्यंतर  

Monday, March 04, 2013

सूर्यप्रकाश

काळ्या ढगांमध्येच दडलेले असतं  निळं आकाश,
क्षणात पालटतं सगळं,
पडताच रवीचा प्रकाश
वाट पहा सावकाश
न होता हताश

Sunday, March 03, 2013

प्रतारणा


रक्त वाहे आता भळभळा
जीव माझा कळवळला
वेदनेने विवहळले न कधी तन
प्रतारणेने पार तुटले मन

वेडा मी, कि खुळी तू


वेडा मी, कि खुळी तू
-------------------------
वेडा वाटे मी तुजला
का तर म्हणे, जपे मी हृदयात तुजला
हृदयात त्याच  भोसकलास सुरा तू
प्रेमळ प्रतिमेस तुझ्या तडा दिलास तू
हुदयास माझ्या दु:खाने फोडवलास हंबरडा तू
असे हे विचत्र घडवलेस का तू
वेडा मी, कि खुळी तू

प्रेमाची उसळं

माझे मनं तुझ्याविना घुटमळं
शंका घेशी का तू, जरी मन माझे निर्मळं
वाट बघ थोडीशी अजून अंमळं
कळेल तुजला, प्रेमात माझ्या नाही भेसळं
प्रेमाने भरवशील तूच, मला मटकीची उसळं

रविवारची चारोळी

रविवारच्या सकाळी
प्रसन्न झाला रवी
चारोळ्या लिहून प्रसन्न
होऊ पाहतो आहे कवी 

Seattle madhala प्रेम

प्रेम असावं  जणु Mount Rainier
निस्तब्ध, निश्चल, शाश्वत
दुरूनही दिसावा उठून

प्रेम असावं  जणु  Snoqualmie Falls
चंचल, अवखळ, स्वच्छंदी,
सातत्याने वाहणारं , पुढे जाणारं,

 प्रेम असावं  जणु Space Needle
 निष्कारण, निरुपयोगी, 
 तरीही निरंतर अस्तित्व देणारं 

Saturday, March 02, 2013

निसर्ग

उन्हा तान्हात,
तर कधी, मुसळधार पावसात
नदी नाल्यात,
तर कधी, प्रशांत महासागरात
खोल दरीत,
तर कधी, उंच कपाऱ्यात
निष्प्राण भंगलेल्या मातीत
तर कधी, हिरव्यागार शेतात
निस्तब्ध तलावात
तर कधी, बेभान वावटळात
काळोख्या रात्रीत, अंधुक चंद्र प्रकाशात
तर कधी, पहिल्या प्रहरी तांबड्या सुर्य प्रकाशात

ज्याची प्रचीती येते, ते म्हणजे निसर्ग  

Friday, March 01, 2013

वाशी ची सासू

माझे सासंर वाशी
तरी आज मी उपाशी
कारण भाजीत पडली माशी
सासू म्हणाली खा पोळी तुपाशी
आता नाही मी  उपाशी
   

फलाहार

फलाहार
रोज खा संत्र
शरीरातील चालतील यंत्र
रोज खा सफरचंद
वैद्याकडे जाणे  बंद
रोज खा केळ
कंबर धरायची येणार नाही वेळ
रोज खा चिकु
तारुण्य राखाल केस जरी लागले पिकु
रोज खा ऊस
पाठीत भरणार नाही कुस
रोज खा काळी (black) लाल (Ras) बेरी
पडणार नाही कधीच आजारी
रोज खा निळी (blue) बेरी
तल्लख राहील स्मरणशक्ती गाठली जरी शंभरी 

प्रतिबिंब - डोक्याला shot

प्रतिबिंबास रागावतो मी
              प्रतिबिंबच रागावते मला
प्रतिबिंबास चिडवतो मी
              प्रतिबिंबच चिडवते मला
प्रतिबिंबास हसवतो मी
              प्रतिबिंबच हसवते मला

प्रतिबिंबानेच सोडले मला
            सोडवेना तरी प्रतिबिंब मला

स्वच्छंदी

स्वच्छंदी मनं माझे,
शुध्दीत असलो जरी
धुंदीत जगतो मी
बेधुंद होऊन आयुष्य
भोगतो मी 

Thursday, February 28, 2013

संसाराचं रोपटं

पूर्वी वाटायचं खूप एकटं
जिद्दीने करून खटपट
स्वतःचं असं मग बांधलं एक खोपटं
त्यात लावलं संसाराचं रोपटं

मग वाटू लागलं खूपच दुकटं
जिद्दीने पुन्हा करू लागलो खटपट
उंचावरल्या त्या खोपटयातच
व्हायचं होतं पटकन दुप्पट

आयुष्य गेले खूपच झटपट
करून खूप खटपट
झालोय आता चौपट
उरलेल्या मध्ये नो कटकट

 

मैत्री

एक होता काळाकुळीत मुंगळा
त्याचा मित्र पांढराशुभ्र बगळा
मैत्रीचा त्यांच्या थाटाच निराळा
स्तंभित झाला समाज सगळा

Monday, February 25, 2013

बर्फ़च्छादित डोंगर

श्वेतवर्णी  बर्फ जणु
फेसच साबणाचा,
फासला डोंगरांनी,
सूर्यकिरणाने न्हाहून निघताना


सुंदरसे ते डोंगर बर्फ़च्छादित पैलतीरी
करिती मज मंत्रमुग्ध पडताच ते नजरेवरी


निसर्गाराणीच्या  अंबाड्यातील पिनच जणू
धरतीवर अवतरीली बनुनी Space  Needle


दृश्य असले दिसते मजल कधी कधी
काढला मी सकाळी थोडासाच जरी अवधी 

शी -- काहीतरीच काय?

चहा झाला
कॉफी झाली
अजून कशी
शी नाही आली

Monday feeling

आठवड्यातले पाच दिवस
जणू व्यवहारी तुरुंगाचेच खांब
सोमवार ते शुक्रवार
काळ असतो खूपच लांब 

पेय गुणकारी

सकाळचा चहा आणतो तरतरी
दुपारची कॉफी आणते सुरसुरी 
रात्रीचे मद्य आणते उसनी हुशारी
अन सगळच नेउन विकते बाजरी

Import - Export

ईकडून तिकडे, तिकडून ईकडे
ईकडचं तिकडे, तिकडचं ईकडे
शेंगरु मेलं हेलपाट्या पाई 
आता 
ईकडचं ईकडेच, तिकडचं तिकडेच 

Saturday, February 23, 2013

हळहळ

मनात चिंतेची मळमळ
डोक्यात  विचारांची खळखळ
त्यातुन जगण्याची धावपळ
आयुष्य संपले असेच वायफळ

वेळीच दाबली असती संयमाची कळ
अंगी संचारले असते नव्याने बळ
उपयोग काय करुन व्यर्थ कळकळ

चितेवर उरली फक्त हिच  हळहळ

Friday, February 22, 2013

कुत्र्याची टांग

आला दिवस गेला दिवस
कुणाला कशाचा पत्ता नाय
जणु कुत्राच धार मारतो
करून वर पाय

शब्दांची टोळवाटोळवी

विचारांच्या गर्तातेत गुंतला कवी
मग फुटणारच कशी तोंडून ओवी
प्रयत्नपूर्वक केले त्याने खूप श्बदांना प्राचारण
पण सगळ्यांकडूनच झाली त्याची टोळवाटोळवी 

Thursday, February 21, 2013

असं का?

मांजराच गोड पिलु  होतं मोठेपणी खेळकर मांजर
कुत्र्याच गोड पिलु  होतं मोठेपणी राखणदार कुत्रा
गाईच गोड पिलु  होतं मोठेपणी नांगराचा बैल
माणसाच गोड पिलु  होतं मोठेपणी हौशी कवी

वाचलं  होता असं , पण मग कधी कधी

त्याच मांजराच गोड पिलु  होतं मोठेपणी विचकारणारा बोका
त्याच कुत्र्याच गोड पिलु  होतं मोठेपणी चावणारा कुत्रा
त्याच गाईच गोड पिलु  होतं मोठेपणी झोपणारा बैलोबा
त्याच माणसाच गोड पिलु  होतं मोठेपणी छद्मी माणूसघाणा
असं का?

नैपुण्यं

नैपुण्यं
टिकवलं  तर टिकतं  तारुण्यं
स्वीकारलं  तर चिकटतं दारुण्यं
नाकारलं  तर लगेच मरतं कारुण्यं
हेच तर आहे जगण्याचं नैपुण्यं 

Saturday, February 16, 2013

भांग

भाऊ, गोष्टं सांग  गोष्टं सांग
म्हणाले सगळे पिऊन भांग
मी म्हणालो लगेच  --
तुमच्या नानाची टांग,
थोडी अजून ओत कि रे भांग 

PhD

PhD , PhD ...आधी वाटलं काय ताप आहे
जवळून अनुभवलं नि कळलं, हे तर खरोखरीच तप आहे

सागर आणि सरिता

सागर आणि सरिता

सागर म्हणाला सरितेला,
तू म्हणजे मीच,
मिठाव्यातिरिक्त तू मिठास,
मिठाने गरग्गट्ट मी  खारट

सरिता म्हणाली सागरास,
चले ऐ,  कितीरे तू चावट
समजलास काय मला बावळट
वाट बघत बैस, ठेवतेच तुला मी ताटकळत

विरह : मनाचे श्लोक

थोडीशी गम्मत शब्दांची :  
~~~

बायको जाता माहेरी,
विरहाने ग्रासले मला,
सावरले तिच्या आठवणींनी ।।१।।
~~~
दिवस मोकळा, मोकळा दिवस आहे । तुझ्याविना मी करू काय त्याचे ।।
दिवसांहुनी मोकळी रात्र आहे। तुझ्याविना ती व्यर्थ जाहे ।।`।।

साधना - ॐ नाम: शिवाय।।

शरीराच्या वासना
कुचंबलेल्या  भावना
मृत्युपरी  वेदना
भोगाव्याच लागतील
केली जरी कितीही साधना

Friday, February 15, 2013

मीठ - चावट

सहवास असतो मिठापरी,
     नसला तर जीवन अळणी,
         चवी पुरर्ताच केला तर बुचकट  
             योग्य केला तर आवडता चावट
                     अती झाला तर खुपच खारट



जुनी मैत्रीण

भेटली अचानक मैत्रीण जुनी
क्षणात स्मरल्या साऱ्या  आठवणी
कॉलेज-कट्ट्याच्या गप्पा तरुणपणी
देऊन गेल्या अवसान म्हातारपणी

वेगळं वेगळं

आमच्याकडे असच असतं
ह्याचं नि आमचं सगळं वेगळं वेगळं असतं

तिला पहायचाय शिणेमा
मला पहायचयं नाटक
का करा कटकट
काढलं टिकिट झटपट

ती चाखणार चटकदार पॉपकॉर्न 
मी गिळणार तैलोंकित वडे
ती मंग म्हणणार आमचे हे फारच जाडे
मंग मी म्हणणार चल gym मध्ये जाऊ ना गडे

मज्जा


इथे जाऊ कि तिथे जाऊ
खेळच नाही का हा सगळा चिऊ काऊ
कशाला करा मग इतुका बाऊ
खाऊ पिऊ नि मज्जा करू

चाबुक

चाबुक

इथे तिथे , जाऊ कुठे
घर कुठे मला न ठाऊक
उगाच होतो मग मी भाऊक
फटकरताच तिने चाबुक
वागतो मग मी ठेवून बुद्धी शाबुक





Sunday, February 03, 2013

इन मीन तीन


लग्न होऊन झाली वर्षे  
                 इन मीन तीन 
बायकोच्या कृपेने,
      संसाराचा मस्त बसलांय सीन 

चहा

चहाचा कप झाला जरी रिक्त,
तरी मन नाही ना विरक्त 
मागतं मग ते होऊन आसक्त 
थोडा अजून, थोडा अजून..

आधुनिक सुविचार

  1. वातवरणात पसरलं दाट धुकं,वाफाळणाऱ्या चहा पुढे पडलं ते अगदीच फिकं
  2. स्वपरीक्षणांविना आयुष्य म्हणजे अनुभवांचे निरर्थक भक्षण
  3. दुष्ट चक्रातून बाहेर पडण्यास  करावेच लागतील कष्ट
  4. जोडलेलं तोडायचे नसल्यास तडजोडच केलेली बरी
  5. लष्कराच्या भाकऱ्या भाजता भाजता हक्काच्या पोळ्या करपून गेल्या 
  6. सहज उपभोगला तर तो संभोग, नाही तर आयुष्यभराचा नुसताच भोग 
  7. नसेल निरोध तर करा विरोध
  8. नसेल निरोध तर करा विरोध, असेल निरोध तर का करा विरोध?
  9. करू नकोस विरोध, आणलाय कि मी आज निरोध
  10. मिळवायचे असेल जर रात्रीच्या झोपेच सुख, करा दिवसा काम, विसरून तहान भूक 
  11. बालपणीच्या आठवणी तुटपुंज्या, फक्त आठवतात दिवाळीच्या करंज्या
  12. दुपारच्या झोपेने होते रात्रीच्या झोपेचे खोबरे, दुपारी काम करून रात्रीच झोपलेलेच बरे
  13. भाऊगर्दीत वाटतं अचानक एकटं, सापडला नाही जर एखादं हक्काचं  खोपटं 
  14. आळसावलेली सकाळ अन् बुरसटले विचार, सोडून द्या दोन्ही होण्यापुर्वी जीवनाची संध्याकाळ
  15. असेल खरोखरच मौजेची आस,तर धरा मेहनतीच कास
  16. दुध आणि गरम गरम ओट , खा सकाळी भरेपर्यंत पोट
  17. उज्वल भविष्याकडे वाटचालीचा मार्ग वर्तमानातुच सुरु होतो, टाकताच भूतकाळाची कात
  18. टाका भिडल्यावर जर टिकवून ठेवायचे असेल्यास टिका टाळावी
  19. चहाच्या कपातली वादळ शमता क्षणात, ओतताच अमृततुल्य चहा कपात
  20. बाळसं  असे पर्यंतच शोभतो आळस
  21. एकटेपणाचाहि एक सहवास असतो, सहवासातहि एक एकटेपणा असतो 
  22. हि वाटं दूर जाते पण हि  वाटचाल जवळ नेते 
  23.  Starbucks मध्ये शिरला बोका त्याला पाहिजे white chocolate (mocha) मोका
  24.  Facebook वरची मैत्री, म्हणजे पाऊस विना छत्री
  25. एका रात्रीची मजा आणि आयुष्यभराची सजा
  26. जीवनाची गोळाबेरीज असते शुन्यच, म्हणतो चाणाक्ष चाणक्य
  27. नारी जर असती खरोखरीच अबला,
  28. वाजवू शकली असती का ती नवऱ्याच्या डोक्यावर तबला? 
  29. डोक्याचा होण्याआधीच विस्फोट , घ्या लवकरच तुम्ही घटस्फोट 
  30. खिशात नोटांची जेवठी  मोठी गड्डी, तितकीच छोटी मैन्त्रिणीची चड्डी 
  31. सुटली लुंगी, दिसली ढुंगी
  32. बांध लुंगी, नाहीतर दिसेल ढुंगी 
  33. शिवभक्त होण्यासाठी उपवासाबरोबर सोमरस पण पचवायला हवा असं म्हणणं आहे का  तुझं? 
  34. संदर्भासहित स्पष्टीकरण करा - तो हात चोळीत गेला 
  35. नवीन म्हण: असेल हौस तर काय करील पाऊस
  36. नारी जर असती खरोखरीच अबला, 
    वाजवू शकली असती का ती नवऱ्याच्या डोक्यावर तबला?