Saturday, March 09, 2013

कर्मकांड

Disclaimer:  
उमजलं ते लिहिलं
हेतुपूर्वक नक्कीच नाही रचलं
भावना दुखवायचा नाही माझा कल
मी असंच आपलं
फक्त मत एक मांडलं

 ------------------------------------------

कुणास ठाऊक, कधी काळी
कुणी कोणास म्हंटले
बघा  मूर्तीतच देव
तेव्हापासुन धर्मांचा
समाजाला खूपच चढलाय  चेव

कुणास ठाऊक, कधी पासून
प्रत्येकजण स्वत:लाच अपरिचित
ओळखणारच  कसा तो
कुढल्या दगडात कुठचा देव
असला सारासार विचार बाजूला ठेव
वाढूदेत अन्धश्रध्येचे असेच पेव  

कुणास ठाऊक, कशी काय
कुणाला सुचली इतुकी कमाल युक्ती
म्हणे करा फक्त थोडी भक्ती
त्याजोडीला दक्षिणेची सक्ती
तरच मिळेल तुम्हाला  मुक्ती

कुणास ठाऊक,  कसं काय
पण घडतंय अघटीत
गंडवती मंडळी ठोकून थापा बिनभोबाट
सगळेच जाणार म्हणे  नरकात सुसाट
कुणी म्हणे, आत्म्यास लाभला तुरुंग शारीरिक
कर्मकांडातूनच म्हणे गवसेल काल्पनिक स्वर्गाची वाट 
कधी बंद होणार असले चर्हाट
केव्हाचे आलोय आता २१ व्या शतकात

No comments: