Tuesday, April 30, 2013

माकडाची श्रद्धा

एक होते माकड
देवालाच घातलं  त्याने साकड
म्हणाला तूच बंद कर अंधश्रद्धेचे भाकड
का लपतोस सारखा मूर्तीत बनून दगड ? 

Sunday, April 28, 2013

रविवारची धुणीभांडी


आजूबाजूला पडलीयेत दगड्धोंडी

सगळीकडूनच झालीये कोंडी
उत्तर सापडेना कुणाच्याच तोंडी
जीव येऊ लागलाय आता रडकुंडी

असावी अशी एक जादुचीच कांडी
अदृश्यच होऊन कामाला मारता येईल दांडी
कधीच घासावी लागू नयेत  न कुणाला भांडी
आनंदाने खाऊ फक्त उकडलेली उंडी

Sunday, April 21, 2013

शेणाचा सडा

ओलावाच पडला कोरडा
कळवून भोडला हंबरडा 

विश्वासाला गेला तडा
पापाचा भरला घडा 

Saturday, April 20, 2013

कधी कधी

कधी कधी एकटेपणाचा देखील एक आगळाच सहवास असतो
अन कधी कधी सहवासात पण वेगळाच एकटेपणा असतो
         कधी कधी दुराव्यातून सहवास वाढतो
         अन  कधी कधी सहवासामुळेच दुरावा  वाढतो
कधी कधी गप्पामध्ये एक उघड अबोला असतो
अन कधी कधी तर अबोला देखील खूप काही बोलून जातो
        कधी कधी भावना व्यक्त करण्यास महाकाव्यदेखील अपुर पडतं
       अन कधी कधी अपुरी कविता देखील पुरून उरेल इतकं देऊन जाते 


Saturday, April 13, 2013

टुमदार घर

असावं  असं एखादं  टुमदार घर
त्याभोवती रम्य परिसर
आल्हाददायी एखादी हवेची झुळूक
तर कधी  टिपटिप पावसाची सर

असावं  असं एखादं  टुमदार घर
क्लेशदायी आठवणींना पडावा विसर
क्षणोक्षणी देऊन नव्या अनुभवांना अवसर
भुतकाळाला देऊन नेहमी साक्ष,
वर्तमानात राहो सतत हजर

असावं  असं एखादं  टुमदार घर
रहावं खुशाल न करता काटकसर
न वाटावा कुणास मत्सर
प्रत्येकाच्याच जीवनात यावा असा बहार

 असावं  असं एखादं  टुमदार घर
वातावरण बाहेर कितीही सैरभैर
गर्दी वादळ अशक्य गोंगाट
झोप लागावी घेताच अंगावर चादर

असावं  असं एखादं  टुमदार घर
…. 

Monday, April 08, 2013

लपंडाव

मनात दडून बसलेल्या भावनांना
शब्द कधी कधी देतात अचानक धप्पा
छान रंगतात मग मस्त गप्पा
असतील ऐकणारे जरी अण्णा  किंवा अप्पा 

Empty Vase

रिकाम्या मनात रंगतो
निरोद्योगी भातुकलीचा किस्सा
रिकाम्या भांड्यातच करता येतो कि
चहा, बासुंदी, आणि मस्त मासोळीचा रस्सा

गोंधळ

मनात नव्हतं तर ओठांवर आलाच कसं
ओठांवर येण्याआथीच तिने ओळखलंच कसं
तिने ओळाखलं म्हणून, ते भिनू लागलं मनात
मनात आता ती , म्हणून तिचं  नाव सतत ओठात 

चर्चा

निरर्थक बडबडी मध्ये असतो का काही अर्थ
विचार असा करून संपर्क तोडल्यास होतो अनर्थ
बोलत रहावं , ऐकत  रहावं , जरी वाटलं  ते व्यर्थ
कधी अचानक मुद्दा महत्वाचा एकून चर्चा होते सार्थ