Saturday, April 13, 2013

टुमदार घर

असावं  असं एखादं  टुमदार घर
त्याभोवती रम्य परिसर
आल्हाददायी एखादी हवेची झुळूक
तर कधी  टिपटिप पावसाची सर

असावं  असं एखादं  टुमदार घर
क्लेशदायी आठवणींना पडावा विसर
क्षणोक्षणी देऊन नव्या अनुभवांना अवसर
भुतकाळाला देऊन नेहमी साक्ष,
वर्तमानात राहो सतत हजर

असावं  असं एखादं  टुमदार घर
रहावं खुशाल न करता काटकसर
न वाटावा कुणास मत्सर
प्रत्येकाच्याच जीवनात यावा असा बहार

 असावं  असं एखादं  टुमदार घर
वातावरण बाहेर कितीही सैरभैर
गर्दी वादळ अशक्य गोंगाट
झोप लागावी घेताच अंगावर चादर

असावं  असं एखादं  टुमदार घर
…. 

No comments: