Wednesday, May 29, 2013

चहाच्या कपातली वादळं

नवऱ्या बायकोचा स्वभाव लग्नातच मिळतो आंदण
घातले जरी मग कितीही विचारांचे कुंपण
अधूनमधून होणारच कि हो भांडण
तेच निरंतर संसाराचं वंगण

साठी बुद्धी नाठी

जगावं  फक्त स्वत:साठी
मरावं फक्त दुसऱ्यासाठी
कळेपर्यंत उलटून जाते साठी
म्हणूनच बुद्धी फारच नाठी

illusion

पत्त्याचा महाल, रचिला स्वप्नात
डोक्यात भरला राग, विसकटून टाकला क्षणात
इतके वर्ष जगलो फक्त भ्रमात
खरतर मी मरतच होतो रोज आरामात 

कपातली वादळ

सतत भांडण तंटा, डोक्याला कटकट
सगळेच असतात थोडेफार हेकट
मीच मांडलाय हा पट
तरी का होते उगाच - आदळआपट
परिस्तिथी होतेय फारच बिकट

 

Tuesday, May 28, 2013

(वेड्याचे) मनोगत

निशब्द: शांतता
बोलू लागली माझ्याशी अचानक
सगळ्यांचेच किस्से
मुकेपणीच ऐकवू लागली मला नाहक

तेव्हा पासून माझं छान चालु लागलं
आयुष्याच गुपितच जणू मला कळू लागलं
तर लोकं म्हणू लागले -
अरेरे! याला तर वेडच लागलं

सध्या मी गडबड गोंधळातही, शांत असतो
कारण मुकाटपणे मी फक्त ऐकत असतो


Thursday, May 23, 2013

असंबद्ध संबंध

मी चहा केला,  तर तिला हवी कॉफी
मी पोळ्या केल्या, तर तिला हवा भात
मी कविता केली, तर तिला हवा निबंध
अरे काही आहे का नाही धरबंध
कलात्मकतेचा नाही काहीच गंध

Wednesday, May 22, 2013

घराची आकांक्षा

अनेक आकाशगंगा
त्यातली एक सूर्यमाला
त्यात सुर्य अनेक

त्यातल्यातला एक सुर्य
त्याभोवती फिरती ग्रह अनेक

त्यातली एक पृथ्वी
त्यात देश अनेक

त्यातल्यात एक भारत
त्यात राज्य अनेक

त्यातल्यात एक महाराष्ट्र
त्यात  जिल्हे अनेक

त्यातल्यात एक पुणे
त्यात घरे अनेक

त्यातल्यात एक घर
एकच माझं घर, छोटंसं घर
त्यातच भरलं माझं उदर


प्राण्यांची ओळख

विंचवाची ऎट भारी
नांगी वर करतो घालून धाक चाव्याचा विषारी
सापाची ऎट भारी
पायाविना पोहचतो घरोघरी, असते दुधाची न्याहारी
खेकड्याची ऎट भारी
तिरप्या चाली ने चढतो कड्या कपारी
पालीची ऎट भारीभिंतीवर निपचित चिकटते, दिसताच आणते किळस भारी
मांजरीची ऎट भारी
आडवी येताच, अडले काम- करा नारायण हरी

जोडीदार

कुत्रीला आवडतो कुत्राच
मिळूनच फुंकतात उकिरडा

म्हशीला आवडतो रेडा
असला जरी तो काळा

तसच, तुला फक्त मीच
अन मलाही मला फक्त तूच




Junglee

सोडून जंगलाचे दुकान
निघालो मी Amazon च्या ढगात
गिऱ्हाइकांच्या थेट खिशात घालून हात
तपशील दाखवणार वेगवेगळ्या पावत्यात

Junglee.com  तात्पुरता टाटा!

बायकोची विनवणी

प्रिये, तुच माझी खरी गरज
सतत करेन तुझ्या नावाचा गजर
दिमतीला तुझ्या नेहमीच हजर
सेवेस राहीन अतिशय तत्पर



Saturday, May 18, 2013

कौटुंबिक पिसारा

एकट्याला एकटेपणाची सोबत असते
तरी तुझ्याच सहवासाची गरज भासते
आपल्या दोघात जरी तिसऱ्याची  होते फारच गर्दी
दोघांचेच तरी करू चारचौघे अन फुलवु पिसारे आनंदाचे

 

व्याभीचार कि कुटुंबवत्सलता

एकट्याला एकटेपणाची सोबत असते
तरी तुझ्याच सहवासाची गरज भासते 
आपल्या दोघात तिसऱ्याची  होईल फारच गर्दी
तसल्या तिसऱ्यापेक्षा, करू दोघांचेच चारचौघे
फुलवु आनंदाचे पिसारे

चले चलो

आयुष्यात सातत्य फक्त एकच
जन्मापासुन मृत्युकडे वाटचाल सतत
जरी तुम्ही रंगवली उज्ज्वल भविष्याची स्वप्ने अमाप
किंवा घुटमळलात दुखा:ने आठवणींच्या  चिखलात
ती वाटचाल ना घेते वेग ना मंदावत
का बघा मग वळून मागे?
वा करावी घाई जाण्याची पुढे? 

Friday, May 17, 2013

आनंदाची पोळी

तिच्याकडे बघताच डोळ्याचं फिटलं पारणं
तिच्यामुळेच आता मिळालं जगण्याचं कारण
प्रेमापोटी तिच्या माझं चालतं सतत जागरण
कधी देईल ती मला पोळी भरून आनंदाचं सारण



 

Sunday, May 12, 2013

रविवारची वामकुक्षी

मुग्धा माझी खरोखरच अन्नपूर्णातिच्याहाताचं जेवून मी बनतोय कुंभकर्णा

दुपारची झोप रात्रीचा त्रास

दुपारच्या झोपेने केले रात्रीच्या झोपेचे खोबरे
दुपारी काम करून रात्री झोपलेलेच बरे 

Saturday, May 11, 2013

स्वच्छंदि

जगात खरे नियम असतात फारच थोडे
अपेक्षांच्याच ओझ्याने दमतात सगळे घोडे
अपेक्षांच्या या साखळदंडास तोडावे कसे
न होता निर्दयी, निर्ढावलेला, बेदरकार

Friday, May 10, 2013

चाकोरी

विचारात तोचतोच पणा
कृतीतही  तोचतोच पणा
परीणामत: फलश्रुतीतही तोच तोच पणा

फुकट सल्ला क्र. ३

कल्पना असतात अनेक
विकल्प साकारण्याचे त्याहुनी अनेक
संकल्प करा फक्त एक
गुपित हेच यशाचे प्रत्येक

फुकटचा सल्ला क्र. २

अमर्याद विचारांना
मर्यादित कृतीची जोड देण्यापेक्षा 
मर्यादित विचारांना
अमर्याद कृतीची जोड जास्त फलदायी


 

ऋतूचक्र

अंगणातला गुलमोहर
वसंत येताच बहरतो
निसर्गाचे नियम
न चुकता पाळतो



सुखी नवरा


भेटताच तुला झालो मी संतुष्ट
उरलंच नाही, करण्यासारखं काही आता
उगाच करवतेस का काबाड कष्ट
प्रेमानेच होतो आहे मी धष्टपुष्ट

Bad apple

कधी कधी कळपात असतो एखादा घाणेरडा
वृत्ती कुत्सित, तर कधी संस्काराने तोकडा
ओळखावा पटकन स्वभाव भिकारडा
जाण्या आधीच विश्वासाला तडा

कलियुग

रंग बदलणारा, एकटाच नाही सरडा
सगळेच करू बघतात झेपेल तेवढा राडा
भरेल तेव्हा भरेल पापाचा भरला घडा
विश्वासालाच मारताय तडा

उंबरठा

               उरला नं आता कुठचाच उंबरठा
               सगळीच कडे पसलाय उकिरडा
 (प्रेमाचा) ओलावाच पडलाय आता कोरडा
               कळवून फोडला हंबरडा
 

निरीक्षण


कोणाच्या मनात काय
ते कधीच कुणाला कळत नाय
कधी कुणी वरून दिसत गरीब गाय 
तर कुणी असतं आतुनच भित्री गाय




Thursday, May 09, 2013

मुक्ती

जगताना केला इतका भांडणतंटा 
मेल्यावर तेरी सुटेल का हा गुंता
चितेवर देखील करितो हिच चिंता
मेल्या, पिंडास शिवेलच कसा कावळा

मेलेले उंदीर

कवीमन  झाले बेचैन, सैरभैर
क्षणात उतरविले शब्द गंभीर
मन आता कोलमडेल कधीही
नाही ते आता तितकेसे खंबीर
सगळेच मेले, पिपातले मेलेले उंदीर 

अर्धवट

माझी बेचैनी तिला समजेना
तिची चैन मला परवडेना
तिच्याविना आयुष्य गेले
काही केल्या पिंडास कावळा शिवेना

Wednesday, May 08, 2013

फुकट सल्ला क्र. १

शुल्लक कामे अनंत
काढा त्यातूनच उसंत
जगा आयुष्य निवांत
तरच खरे तुम्ही श्रीमंत 

Weekly special

Monday la मटकीची उसळ 
Tuesday ला तोंडल्याची भाजी 
Wednesday ला वडे 
Thursday ला थालीपीठ 
Friday ला फणसाचे गरे
Saturday ला सात्विक साधवरण भात
Sunday ला  सांजा 

Monday, May 06, 2013

मुक्त

मनाला सोडलं मोकळं
तर गेलं भरकन उडून
बांधून ठेवलं स्वतःजवळ
तर बसलं एकदमच रुसून

गुंता

तिच्या आठवणीत गुरफटत गेलो 
गुरफटता गुरफटत  आतल्याआतच फाटत गेलो
ठिगळाच्या कापडात आता पदरचच हरवून बसलो

Return to innocence

निरागसपणा सोडून म्होठं होणं म्हणजे मागासणच नव्हे का?
---------------------------------------------------------------------------------
जरी लहानपणी म्होठं व्हावं वाटायचं 
तरी म्होठेपणी लहान का व्हावं वाटतं ?

जितकं जितकं आयुष्य पुढे जात जातं
आठवणी तितक्या तितक्या मागे का जातात?



Saturday, May 04, 2013

चहा प्रेमी

दे दे मुझको एक कप चाय
प्रिये, धरतो मी तुझे पाय
पण please म्हणु  नकोस नाय
चहा सोडून मी पिणार तरी काय?

अभिव्यक्ती

जाणवलं म्हणून सुचलं
सुचलं म्हणून लिहिलं
लिहिलं म्हणून वाचलं
वाचलं म्हणून समजलं
समजलं  म्हणून जाणवलं
जाणवलं म्हणून जपलं
जपलं म्हणून आयुष्य संपलं तरी  प्रेम उरलं