Saturday, June 29, 2013

बाळ्याची गोष्टं

एक होता वाघोबा
फोडीतसे तो नुसत्या डरकाळ्या
डरत नसे त्यासी म्हशी काळ्या
उदरनिर्वाह करीतसे तो खाऊन आळ्या
काल्पनिक गोष्टी असल्या,
सांगतो आमचा बाळ्या

चारा पाचोळ्या

उमजलच असं आहे कि कुणाला समजू नये
भाभडेपणाला या भोळसटपण समजू नये
भोळसटपणाला या बावळटपण समजू नये
बावळटपणाला या वेडसरपण समजू नये
अन  पाच ओळ्यांना, चारोळ्या समजू नये

कोमजलेल्या इच्छा

स्वखुशीने अवहेरली ईच्छापुर्तीच्या संधी
तेव्हापासून विसकटतच गेली जीवनाची घडी
तडजोडींची गळ्यात अडकवली बेडी
मर्यादांच्या खोल खंदकापलीकडे
मारता येइल का कधीतरी उडी?

Saturday, June 22, 2013

कश्मकश

मन म्हणतं हि तर छोटिशी ईच्छा
बुद्धि म्हणते हि तर हवस
मन म्हणतं करून टाक एखादा नवस
लवकरच येईल तो इच्छापूर्तिचा िदवस
बुद्धि म्हणते त्यापेक्षा आयुष्यभर तरस

Friday, June 21, 2013

अर्धवट

माझ्या आयुष्यात आता नाही माझीच वट
सगळ्याचीच मला वाटते आता कटकट
कधी कधी तर मीच रचतो माझ्या विरुद्ध कट
आणि करतो देखील तह, करून मान्य माझीच अट 

आयुष्यात माझ्या आता सगळच अर्धवट
वाटलं होता जगून संपवेन झटपट
खेळ मांडला जरी कुणीही 
पूर्ण केल्या शिवाय सोडणार नाही हा पट 
बिनबुडाच्या विचारांच असल्या
 करणार आहे मी कडेलोट 

Tuesday, June 18, 2013

प्रसंग अनुभवा, आठवणी टाळा

आहार नेहमीच असावा ताजा
तसेच प्रसंगही अनुभवावे तेव्हाचे तेव्हाच
शिळ्या अन्नाने जसे होते अजीर्ण
जुन्या आठवणी चाखुन
मनं होतं विदीर्ण आणि मेंदू अवकाळी जीर्ण

जुने प्रसंग, नवे अनुभव


गुलाबाचं फुल देताना
टोचला होता मला एक काटा
कळवळून रडता, घेतले तिने कवेत
स्पर्शास त्या मी काय वर्णावे
तरंगूच जणू मी लागलो हवेत  


आठवणींच्या असल्या जंगलात फिरताना
पुन्हा टोचला तोच काटा
स्मितहास्याने सहज सोसल्या त्याच वेदना
आवडत्या फुलांवर तिच्या, पडताच दृष्टी
पापण्यांचा बांध अश्रूंना आडवेना 

स्वच्छंदी स्वार्थी

आयुष्य जगावं असेल जशी मर्जी 
समजु नये त्यास खुदगर्जी 
फाटलं तर गाठावा उत्तम दर्जी 
लगेच शिवून राखावी मर्जी

Monday, June 17, 2013

वाटचाल

तुम्हाला काय करायला आवडतं?
आकांक्षांच्या पंखांनी उडणं
अपेक्क्षांच्या ओझ्याने बुडणं
कर्तव्याच्या पायाने जमिनीवर चालणं
तुम्हाला काय करायला आवडतं?


Sunday, June 16, 2013

फटकळ

परखड असावं पण परवडेल इतकच
समोरच्याला परसाखडल लागेल
इतक पण परखड असणं परवडणारं  नव्हे

Thursday, June 13, 2013

जागरणाचं जष्टिफीकेशन (Justification)

आयुष्य उरकण्यासाठी नसतं
ते उपभोगायचं असतं
नुसतच जगुन संपवा़़चं नसतं
आस्वद घेत घेत
कधी जागुन, तर कधी जागवुन
चवीने जगायचं असतं

हुंदका

अपरंपार दुःख माझे
खंदकात खोल पुरले
हुंदका अचानक एक नकळत निसटला  
थेट ढगात जाऊन पाऊसापरी कोसळला
चिंब भिजवून माझ्यासवे मातीला
सुगंध मोहक दरवळवु लागला
नव्याने मोहरून मनास माझ्या
पुरलेल्या दु:खात पुन्हा मिसळला

Tuesday, June 11, 2013

च ची (मनाच्या श्लोकांची) चारोळी

निष्क्रीयेतेला अपयशच येणार
प्रयत्नांना यशच येणार
लिहायला लागलं कि सुचाणारच
वाचायला लागलं कि समजणारच
करायला लागलं कि घडणारच
श्रमांना फळ हे मिळणारच


समिकरण

अन्न असलं जरी कितीही उत्कृष्ट
तरी पचनानंतर निचरा हा आवश्यकच
नातं  कितीहि जरी अतूट
निचऱ्याची शिवाय फारच बिकट
कुठच्याही उपभोगानंतर, भोग हे अटळच 

Monday, June 10, 2013

कवी ला बस्ती

एकदा केला मी पण
रोज करणार जबरदस्त कविता दोन
प्रयत्नांना आले नाही फारसे यश
शोधले मी मग कारण
संकल्पात झाली होती थोडी चूक
करू लागलो जबरदस्ती कविता दोन
करण्याएवजी जबरदस्त कविता दोन 

नाती गोती

नाती गोती
नाती कधी रक्ताची
तर नाती कधी मनाची 
नातीच नेतात गोत्यात 
तर कधी गोत्यातूनच जुळतात नाती
नाती करतात गुंता 
तर कधी सोडवतात तंटा 
गमती जमतीची असतात हि -
नाती गोती, नाती गोती 

नाती

उसवलं तर शिवता येतं
फाटलं तर ठिगळच लागतं
म्हणूनच फाटू द्यायचं नसतं
अन उसवणार नाही
असच शिवायचं असतं

ठिगळ

उसवलं म्हणजे फाटणं नव्हे
फाटणं म्हणजे उसवलं नव्हे
उसवलं तर शिवता येतं
फाटलं  तर ठिगळच लागतं 

अनुभूती : केल्याने होत आहे रे ….

आनंद टिकवावा लागतो
दुःखं भोगावं लागतं
ऎश्वर्य कमवावं लागतं
दारिद्र्य सहज कवटाळतं
कृतीनेच हव्याहाव्याश्या गोष्टी घडतात
निश्क्रीयतेनेच नकोश्या गोष्टी चिकटतात

Saturday, June 08, 2013

जीवनंमरणाचा प्रश्न

आता आठवुन सारं हसू येतं
कधी काळी याच गोष्टी साठी मी गदगदून रडलो होतो
साफ खोटं आहे हे,
आत्ता जरी आठवलं तरी गदगदून रडतो मी
अन माझंच माझ्यासमोर हसू होतं

Friday, June 07, 2013

प्रश्न

माझ्या आयुष्याची गोष्ट
मी पाहतोय की
मी सांगतोय कि
मी लिहितोय

गोष्टच ती
कधी गमतीदार आनंदी तर
कधी रटाळ, भयानक
गोष्टच ती … 

Thursday, June 06, 2013

अळणी आयुष्य

जगताना पाळाले अनेक नियम
मरताना शेवटी कळवला यम
म्हणाला अरे मारू  तरी मी कसा तुला
तू तर जगालाच नाहीस, मरणार तरी कसा
तोडतो आता मी माझाच नियम
जा जगून ये पुन्हा एकदा सोडून जरासा संयम 

स्वार्थी आत्महत्या

जगताना थोडं थोडं मरण्यापेक्षा
मरताना थोडंसं जगलेले काय वाईट?
वर्षानुवर्षे जगलो, जगणाऱ्याचे हाल वाईट
मेल्याने झाले का कधी मरणाऱ्याचे वाईट?

मृत्यु

मेंदू मंदावला
शरीर थंडावलं
मृत्युचं सुख
सावकाश उपभोगलं

Communication Gap

माझ्या मनातलं तिला कळेना
तिच्या ओठातलं मला कळेना
कळवळून विचारलं मग एकमेकांना
बहिरा मी कि मुकी तू?

स्वच्छंदी कवी

होता एक स्वयंघोषित कवी
करीतसे रोज एक कविता नवी
कधी शब्दरुपाने कल्पना फुलवी
तर कधी धुसमुसता त्रागा शमवी
कधी गमतीदार  परीक्षण ऐकवी
तर कधी उगाच यमकं जुळवुन फसवी

Wednesday, June 05, 2013

सल

मनातलं दुःख जितकं खोल
चेहऱ्यावरच हसु तितकंच  फोल
विचारांचा सांभाळायचा किती तोल
अरे मुक्या मना, तु मोकळ्या मनाने बोल

Sunday, June 02, 2013

आडमाप योगा

सकाळी उठताच जबरदस्त केला योगा
आता कंबरर्दुखीची फळं भोगा