गुलाबाचं फुल देताना
टोचला होता मला एक काटा
कळवळून रडता, घेतले तिने कवेत
स्पर्शास त्या मी काय वर्णावे
तरंगूच जणू मी लागलो हवेत
आठवणींच्या असल्या जंगलात फिरताना
पुन्हा टोचला तोच काटा
स्मितहास्याने सहज सोसल्या त्याच वेदना
आवडत्या फुलांवर तिच्या, पडताच दृष्टी
पापण्यांचा बांध अश्रूंना आडवेना
No comments:
Post a Comment