Saturday, August 10, 2013

विरह

लिहायचं असलं तुझ्यासाठी
फिरतात गरागरा चक्रं बुद्धीची
बंद झाकण हृदयाचे उघडते खाडकन, भावनांच्या उद्रेकाने
विचारांच्या बांधानेहि थांबत नाही, प्रेमाचा पाऊस
भर उन्हाळ्यातही मग गडगडतात विजा
अन क्षणिक विरहहि भासतो जणू निरंतर सजा
तुझ्याविना खरोखरच नाही कशातच मजा

हो कि नाही ?

नाही म्हणणं  सोपं नसतं
कधी कधी नाही म्हणता येत नाही
म्हणून हो म्हणणं  देखील अवघड असतं
हो हो म्हणता म्हणता,
नाही म्हणणं अधिक अवघड होऊन बसतं
नाही नाही म्हणता म्हणता,
हो म्हणणं  मात्र सोपं असतं
हो नाहीच्या द्वंद्वात,
मनाची कुचंबणा होऊ द्यायची नाही
काय करावं, कळतंय पण वळत नाही

Plan A किंवा Affair?


आयुष्यभराचा  असावा असा एकतरी मित्र 
रंगवलेली स्वप्नातली ती चित्र 
सहज साकारेल तो न होता गलीगात्र 
शोधते मी त्याला सर्वत्र 

Friday, August 09, 2013

वास्तव

ऐके दिवशी, म्हटलं घ्यावा जरा खऱ्या आनंदाचा शोध
Google केलं लगेच, Facebook status हि  केलं update
Bing करून सुद्धा सापडलं नाही, म्हणून वाढला अजूनच क्रोध
Baidu, Yahoo नंतर कंटाळून विचारलं Quora ला,
तरी उत्तराच्या नावाखाली page लोड झालं तेही कोरंच
लगेच बंद केला मग मी tablet computer अन smartphone
तळ्याकाठी मारला फेरफटका, घेऊन हातात  IceCream cone
अचानक झाला मला बोध, उगाचच चालु होता online  शोध

Wednesday, August 07, 2013

संवेदनशीलता

चुंबकाचा प्रभाव फक्त लोखंडावरच
विचारांचा प्रभाव फक्त संवेदनशील मनावरच
म्हटलं तर लोखंड सोन्याहून स्वस्त
पण उभ्या करतं वास्तु भारदस्त
संवेदनशील मन, म्हटलं तर कमकुवत
पण खऱ्या अर्थाने तेच घडवतं कमालीचं परिवर्तन
विचार करा, अन कठोरपणा एवजी संवेदनशीलतेला जपा

अनुभूती

अनुभूती
============================
निळं पाणी, काळे ढग, हिरवीगार वनराई,
तर  कधी बर्फाच्छादित पर्वत
दिसतं दृश्य सगळ्यांना एकच
तरी प्रत्येकाची अनुभूती मात्र भिन्न
कुणी होतं  खिन्न तर कुणी प्रसन्न

निर्धार

आपल्याच कल्पनांना आपणच गोंजारायचं
शब्दांना खेळवून, त्यांना कागदावर उतरवायचं
असंख्य कागदांच्या बोळ्यानंतर -
एखादं कागदी विमान उडवायचं
हे नाही तर ते, पण काही तेरी का होईना घडवायचं हे नक्की 

नवनिर्मिती

पेरतांना वाटलं हे प्रयत्न जाणार फोल
उगवलं तेव्हाच कळलं त्याचं मोल
प्रश्न पडायचा, जमीन चांगली का बीज?
दोघांच्या संगमाने, फळ मिळालं मात्र अनमोल

निवडुंग

निवडुंगच पेरला मी मनात 
काटे तर टोचणारच 
काट्यांच कर्तव्य ते 
त्यात निवडूंगाचा काय दोष
उमजता हे,
तत्क्षणी मावळला सगळा रोष

ओळख

अनोळखी व्यक्तींशी करावी ओळख, सोपं  असत
ओळखीच्या व्यक्तींची जपावी ओळख, अवघड असत

बायकोचा धाक

मेंदूला संरक्षण कवटीचं
हृदयाला संरक्षण बरगड्यांचं 
मनाला संरक्षण कशाचं? - प्रेमाचं! ।।१।।

कमळाला संरक्षण जाळ्याचं
गुलाबाला संरक्षण काट्याचं
प्रेमाला संरक्षण कशाचं? - धाकाचं! ।।२।।


संरक्षण - १

कमळाला संरक्षण जाळ्याचं
गुलाबाला संरक्षण काट्याचं   
मनाला संरक्षण कशाचं? - प्रेमाचं!

सुपीक मन

मनात पेरलं गेलं जरी दुःख
घाला प्रेमानं काळाचं खत 
आत्ता नाही तर नंतर,
सुखच उगवणार हेच माझं मत


affair की Plan B?

आयुष्यभराची असावि अशी सखी
दिसत:क्षणी पटावी ओळख जन्मांतरीची
विश्वास असावा मनी,
जरी झाहाला न सहवास या जन्मी
भेटू नक्कीच पुढच्या जन्मी 

प्रेम

मी ठरवलं  एकदा
लिहावं असं काहीतरी  प्रेमाबद्दल
कि वाचणारे वाचतील दोनदोनदा
अन अनुभवातील जे, ते हसतील खदाखदा

लिहिता लिहिता, माझंच मला समाजलं
अरे त्यात लिहायचं काय नि वाचायचं  काय
ह्या तर करायच्या गोष्टी

तेव्हापासून सोडला लिखाण-वाचनाचा नाद
करतो आता फक्त प्रेम मनमुराद




वर्तुळ

त्रीज्येला केले दुप्पट, मिळाला व्यास
त्रीज्येला जोडले दोन पाय,मिळाला परीघ
त्रिज्येच्या वर्गाला जोडला पाय, मिळालं  क्षेत्रफळ
समजलं तर वर्तुळ, नाही गेलंच बघा केरात मुसळ

एहम का एहसास

जब तक चलेगी  सास
होते रहेंगे अनेक एहसास
एहससो के परे भी है जिंदगी
महसूस करोगे वो जिंदगी
निकालातेही एहसासोसे "एहम"




ओळख

ओळख ठेवणं, सहज शक्य
ओळख पटणं शक्यतो शक्य
ओळख पटवणं शक्यतो अशक्य
फरक समजतासमजता  - येई वार्धक्य

संबंध

मनं जुळली तर,
निरंतर दुराव्याने देखील उरत नाही अंतर
मनंच जुळली नसतील तर
निरंतर सहवासात देखील, असतं एक निराळच अंतर 

मूढाचे गूढ

एक होता मूढ, त्याचे विचार फारच गूढ
त्याचे विचार फारच गूढ, म्हणून का होता तो मूढ
फारच विचार करण्यासाराखे आहे हे गूढ
विचार करा, नाही तर आपणही ठरू मूढ 

तेहतीस

तीस वर्षांच्या वाटचालीनंतर
एकदाचा गाठला टप्पा तीन वर्षांचा
तीस वर्षांपूर्वी इतर घ्यायचे  माझा गालगुच्चा
तीस वर्षांनंतर घेतो मी इतरांचा गालगुच्चा
थोडासा जरी असलो मी लुच्चा
मनाचा मी आहे सच्चा

परीवर्तन

शांत मनाच्या तळ्यात,
नकळतच टाकला ितनं दगड पाण्यात,
त्यातुन िनर्मील्या लहरी, 
क्षणात परीवर्तल्या लाटांत,
शंात तळ्या़चा अचानकच
झाला महासागर प्रशांत

Saturday, August 03, 2013

वार्धक्य

वार्धक्याचा तसा वयाशी फारसा सबंध नसतो
तेच विचार, त्याच कल्पना
शब्द तेच, शब्दरचना देखील तीच
तोच तोचपणालातलं नाविन्यदेखील तेच
नाविण्यापणातलं नाविन्यहि नाहीसं होऊ लागलं
त्याचक्षणी वार्धक्याला सुरुवात होते

भान

कधी येणार्ऱ्या क्षणांची वाट बघुन
तर कधी गेलेल्या क्षणांचा वीट येऊन
वर्तमानातला क्षण तेवढा जातो निसटून