Monday, November 25, 2013

साद


कंटाळून घालतो आता शेवटचा वाद,
नको पुनःपुन्हा तेच संवाद
तुझ्या मिठीनेच,  झाले जीवन माझे  बरबाद
पर्वा नाही जरी समाजास वाटला हा घोर प्रमाद  
निघालो मी, निघ तू, राहू दोघेही आबाद
नव्याने जगण्यास, जीवनच घालतेय आपल्याला  साद

साद

कळवळून घालतोय प्रिये तुला साद
विसरून सगळे वाद
चल, नव्याने करूया संवाद
पाठीशी घाल सगळे प्रमाद
होण्याआधीच सगळं बरबाद
तुझ्या मिठीतच आहे,
माझं जीवन आबाद

Sunday, November 24, 2013

नेत्र वैद्यास (to all eye doctors & teachers)


नेत्र वैद्यास (to all eye doctors & teachers)
==============
दिलीस तू नवी दृष्टी
नव्याने भासवली तू हि शृष्टी
कल्पना विश्वापरी भासते
खरे विश्वहि  माझे
कळेचना फेडू  कसे काय,
ऋण हे  तुझे?

साद

साद
=====================
शब्दातून राहिल्या भावना अव्यक्त
संवादासाठी काढले मग हे चित्र
अबोल चित्रदेखील ठरलेच मुके
साकारण्यास विश्व हे माझे
(कल्पना) विश्वात या, तू येशील का?



======================
साद 
======================
शब्दातून राहिल्या भावना अव्यक्त 
संवादासाठी काढले मग हे चित्र 
अबोल चित्रहि पडले इतुके मुके 
तुझ्याविना भासते खरे विश्वही फिके  
आता तरी,  तू येशील का?
=======================

Friday, November 22, 2013

निशब्द

शब्द गेले सगळे सुट्टीवर,
नुसते विचार, करतील तरी काय काम
पहाटेच्या चहाचे आता, चुकवू कसे मी दाम ?

Saturday, November 09, 2013

कोड्यातली क्लृप्ती

शरीराची आसक्ती,
त्यांतून नियमांची सक्ती,
त्याहून वरताण, मनातली भक्ती,
करण्यास यावर मात, ज्यासी माहिती युक्ती
त्यासी कळेल हि उक्ती

बळी

एकाच्या आनंदासाठी, दुसऱ्याचा का जावा बळी?
बचैन करे मज असल्या विचारांची साखळी
दमलो विनवून निर्दयी समाजास वेळोवेळी
पोटतिडकीने शेवटीची फोडली मी किंचाळी