Saturday, March 29, 2014

स्त्री-पुरुष व्यवहार

स्त्री-पुरुष व्यवहार
=====================
स्त्रियांमुळे पुरुषांचा होतो संसार
रोज मिळतो पोटभर आहार
अन पडक्या भिंतीमध्येही सजत घर 
पुरुषांमुळे स्त्रियांचा भरतो बाजार
वावगे न वाटावे इतक्या सहजतेने
महालांमध्येहि घडतात अमानवी व्यवहार

संसाराचं समीकरण

बायकोने रात्री घातली कितीही हुज्जत
तिच्याच हाताच्या सकाळच्या चहाला न्यारीच लज्जत
संतुलानाने असल्या रहाते - संसारात गम्मत

Monday, March 24, 2014

वात्सल्याचं कर्ज

मनी फुकीचा गर्व
म्हणे कर्तुत्व जाज्वल्य
मोजुनिया दाम घेईन विकत सर्व
अनमोल जरी, फुकटच होते आई वडिलांचे वात्सल्य
करणार तरी कशी परतफेड, अपुरे पडले बुद्धीचे कौशल्य
आजन्म उरणार उरी हे कर्ज, सलती मनास हेची शल्य

Saturday, March 22, 2014

संवाद

कुणीच देईना प्रतिसाद
घातली जरी मी कळवळून साद
आप्तांनीदेखील सोडला माझा नाद
आयुष्यभराचे सगळेच वाद, 
घडले होते केवळ, न झाल्याने संवाद 

Thursday, March 20, 2014

प्रतारणा

अखेरचे तिचे बोल
ह्रदयात रुजले ते खोल
विसरण्यास ते प्रयत्न माझे
वारंवार ठरतात फोल




Sunday, March 16, 2014

दुखणी

वाढलेल्या वयाची दुखणी
शरीराची जरी सुडौल बांधणी
तरी जखडती त्वरित स्नायू
वाढताच वायु

चारोळ्यांचा प्रसार

मनात माझ्या काळोख अंधकार 
त्यात क्वचित चमकतात चांदण्या चार
िवचार, क्षणात होतात शंब्दाच्या घोडीवर स्वार
सुसंगततेच्या साखळीत अडकण्याआथीच 
हलकेच होतात ते मग पसार