Sunday, October 26, 2014

योग

म्हटलं तर सगळंच घटिवत
म्हटलं तर सगळंच संजोग (योगायोग)
कळलं तर उपभोग
नाही तर नुसता भोग

Wednesday, October 22, 2014

ईराची प्रगती

मी म्हंटलं, गोड पोरगी आपली ईरा,  भारीच अवखळ
पाच महिन्यात - केलीय तिने प्रगती पुष्कळ

मुग्धा म्हणली - जोशी आता आवरा
कमी करा फुकटचा पसारा
गोड पोरगी आपली ईरा
रांगु लागलीय भराभरा

Tuesday, October 21, 2014

कलियुग

कलियुग आणि जुन्या गोष्टी
=============
आले आले आले कलियुग आले
एकत्र बसून पिताहेत खीर
कोल्हे आणि करकोचे

आले आले आले कलियुग आले
ससा आणि कासवाची झालीय मैत्री 
दोघेही धावतात जोरात 
लागताच मागे कुत्री 

आले आले आले कलियुग आले
एकत्रच रहातात चिमणी आणि कावळा 
दिमतीला त्यांच्या पांढरा शुभ्र बगळा

आले आले आले कलियुग आले
म्हातारी म्हणते,  चल रे भोपळ्या  टुणूक टुणूक  


भोपळ्यात नाही पेट्रोल 
म्हातारीला करा कुणी तरी कंट्रोल 

Monday, October 20, 2014

शिक्षण

शिक्षण
=========
अचानकच कोण जाणे कसं काय, येतो असा एखादा क्षण
अनुभवता अनुभवता जग, बदलतो तो दृष्टीकोण
जीवनात सुरु होते सगळ्याचेच सूक्ष्म निरीक्षण
निरपेक्ष बुद्धी करते परखड परीक्षण
पहेले पाढे पंचावन म्हंणून
सुरु करावे नव्याने शिक्षण 

निद्रानाश

स्वप्नातल्या विचारांनी केले मेंदूचे खोबरे
मध्य रात्रीच उठलो मग अचानक,
निद्रानाशाबरोबर झगडण्यापरी म्हंटले,
निवांत चहा प्यायलेलाच बरे

चहा प्रेमीला पडलेला प्रश्न

चहा प्रेमीला पडलेला प्रश्न
----------------------------------
चहातुल्य अमृत मिळेल का कुठे?
आणि मिळालं जरी, 
तरी चहा सोडून पिणार तरी ते कोण?

Sunday, October 19, 2014

Tech Savy पीढीची मुलाखत

Tech Savy पीढीची मुलाखत
========
निसर्ग?
हो अनुभवलाय ना मी निसर्ग
सोफ्यावर बसून TV Channel बदलून
तर कधी मित्राच्या facebook फोटोला like  करून

गाणं?
हो. एकलय ना मी गाणं,
अगदी भीमसेन जोशींपासून तर Ketty  perry पर्यंत
सगळेच video बघतो मी Youtubeवरून

खेळ?
हो ना; सगळे खेळ खेळतो मी
Soccer म्हणजे FIFA २०१४ केला आहे install
क्रिकेट/tennis तर मी खेळतोच खेळतो आणि
कधी कधी Wii  वापरून boxing देखील खेळतो

गप्पा?
हो तर? गप्पं राहून ५००+ मित्रांशी गप्पा मारतो मी
त्या शिवाय का उगाच Whats चालू असतं सतत
imessage, viber, gtalk, email सगळे fwd  मन लावून वाचतो

शिक्षण?
netflix, crackle वरून फुरसत झाली कि झालीच माझं म्ब 
शिक्षणाची तर ऐशी तैंशी
तब्बल ८०० Course  ना enroll   केलाय corusera वर
आणि खान acedemy वर तर विचारायलाच नको
फारच झाला पश्चाताप तर ऐकतो Ted दादाच्या गप्पा

काम?
फुरसतच नसते हो
करमणूकच  चालू असते सारखी
इंटरनेटमुळे  ती संपतच नाही  
मग काम करणार कधी?


Monday, October 13, 2014

कायकु

तु हि कायकु वाचली आहे का? - दोन ओळींची छोटी कविता । 
शांत मनाचे अशांत बोल, म्हणजे राग
अशांत मनाचे शांत बोल, म्हणजे कविता

ज़बरदस्ती

"भूल चूक द्यावी घ्यावी",
"चूक भूल द्यावी घ्यावी" 

चुकनहि मी भुलत नाही
भुललो कि मी चुकत नाही

Sunday, October 12, 2014

संगोपन

संगोपनाचे  तंत्र विचित्र,
मनी भरवी फारच धास्ती
वाचतो धडे पुस्तकी, जबरदस्ती
रागीट, तापट अतिशय कडक शिस्त
प्रेमळ, मृदू अघळपघळ मस्ती मस्त
अभ्यासू तरी काय, सतत दोघेही व्यस्त

ओळख

ओळख
=======
शकलेच झाली मनाचे
मन बोलूच नाही शकले
कोणास म्हणावे आपले
सगळेच भासू लागले परके
बुद्धीस न झेपली सत्याची पारख
क्षणात विसरलो स्वतःचीच ओळख
========================

खीर पिती एकत्र, कोल्हा अन करकोचे
न लागे त्यासी नाते रक्ताचे
ऋणानुबंधच ते,  जन्मांतरीचे
न भासे कुणीच परके
पटताच अंतरी ओळख  
न लगे त्यास बुद्धीची पारख 

हे कि ते

गेले ते दिवस
ज्या क्षणी गेले दिवस
केले होते ह्यासाठीच किती नवस
अजूनही करतो नवस
जाण्यास पुन्हा (हे) दिवस


अमानुष

श्वापदापरी घेतलास माझा बळी
दाखवुनीया स्मितहास्याची खळी
मुकेच फोडतो मी अजूनही किंकाळी
वाट पाहतो जेव्हा तुझी वेळी अवेळी