कलियुग आणि जुन्या गोष्टी
=============
आले आले आले कलियुग आले
एकत्र बसून पिताहेत खीर
कोल्हे आणि करकोचे
आले आले आले कलियुग आले
=============
आले आले आले कलियुग आले
एकत्र बसून पिताहेत खीर
कोल्हे आणि करकोचे
आले आले आले कलियुग आले
ससा आणि कासवाची झालीय मैत्री
दोघेही धावतात जोरात
लागताच मागे कुत्री
आले आले आले कलियुग आले
एकत्रच रहातात चिमणी आणि कावळा
दिमतीला त्यांच्या पांढरा शुभ्र बगळा
आले आले आले कलियुग आले
म्हातारी म्हणते, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक
भोपळ्यात नाही पेट्रोल
म्हातारीला करा कुणी तरी कंट्रोल
No comments:
Post a Comment