Sunday, October 19, 2014

Tech Savy पीढीची मुलाखत

Tech Savy पीढीची मुलाखत
========
निसर्ग?
हो अनुभवलाय ना मी निसर्ग
सोफ्यावर बसून TV Channel बदलून
तर कधी मित्राच्या facebook फोटोला like  करून

गाणं?
हो. एकलय ना मी गाणं,
अगदी भीमसेन जोशींपासून तर Ketty  perry पर्यंत
सगळेच video बघतो मी Youtubeवरून

खेळ?
हो ना; सगळे खेळ खेळतो मी
Soccer म्हणजे FIFA २०१४ केला आहे install
क्रिकेट/tennis तर मी खेळतोच खेळतो आणि
कधी कधी Wii  वापरून boxing देखील खेळतो

गप्पा?
हो तर? गप्पं राहून ५००+ मित्रांशी गप्पा मारतो मी
त्या शिवाय का उगाच Whats चालू असतं सतत
imessage, viber, gtalk, email सगळे fwd  मन लावून वाचतो

शिक्षण?
netflix, crackle वरून फुरसत झाली कि झालीच माझं म्ब 
शिक्षणाची तर ऐशी तैंशी
तब्बल ८०० Course  ना enroll   केलाय corusera वर
आणि खान acedemy वर तर विचारायलाच नको
फारच झाला पश्चाताप तर ऐकतो Ted दादाच्या गप्पा

काम?
फुरसतच नसते हो
करमणूकच  चालू असते सारखी
इंटरनेटमुळे  ती संपतच नाही  
मग काम करणार कधी?


No comments: