Friday, November 28, 2014

सैरभैर

शब्द होते फारच धारदार
वर्मीच बसला वार, मन झाले बेजार
जीव झाला सैरभैर
का ईतका वागलो मी गैर
कि घ्यावं  लागलं तिला माझ्याशीच वैर 

म्याऊ

मनी  माऊ, मनी  माऊ
तुझ्यासाठी गाणं गाऊ
हात माझा नको चाऊ
तुझ्यासाठी आणलाय खाऊ

Thursday, November 13, 2014

आजची शाळा

समजूतींचे घोटाळे टाळा
त्यासाठी संवादाचे नियम पाळा
त्यापेक्षा जिभेलाच घाला आळा
तरच आनंदात राहशील बाळा