Thursday, August 20, 2015

दुष्काळ

दुष्काळ
=======================
उसवलेलं आकाश अन् फाटलेली जमीन
सांडलेला सागर अन् काळंडलेला चंद्र
आखुडलेली रात्र अन् लांबलेला दिवस
देवालासुद्धा असते हवस
पावसासाठी देखील मागतो तो नवस

fling

Once upon a time
I had a fling
Nothing mattered, Fun was Everything 
I can't find it anymore
Even if I searched it with Bing

भरारी

घेताच मी भरारी
तोडोनी पाश सारे
पडले आकाश अपूरे
वेचले अनेक तारे
स्वप्नं राहिले अधूरे
खंत हिच उरली उरी
जाणून हि व्यथा,
प्रयासाने घेतो पुन्हा उभारी

Tuesday, August 04, 2015

शब्दांबरोबर मस्ती

शब्दांबरोबर मस्ती
=============
रात्र अंधारी, घालत होतो गस्ती
घालवण्यास आलेली सुस्ती
म्हंटले करावी शब्दांबरोबर थोडी मस्ती
मस्ती करता करता शब्दांशी घेळलो कुस्ती
आणि रचली हि कविता जबरदस्ती
=============

शब्दांबरोबर मस्ती
=============
गस्ती घालतांना
घालवण्यास सुस्ती
खेळून शब्दांशी कुस्ती
रचली चारोळी जबरदस्ती 

Wednesday, July 15, 2015

खुशाल

जगाल तेवढे जगाल
एकदिवस मराल
म्ह्नणून राहा खुशाल
जगण्यासाठी करून नका इतके हाल
कि जगता जगता मरण्यास व्हाल बहाल 

True story

व्यथा माझी
कथा तुझी
करमणूक श्रोत्यांची
संपत्ती निरमात्यांची

Monday, May 25, 2015

वंचना

सांगू कसे मी तुला
मनात काय माझ्या
बघताच डोळ्यात तुझ्या
अडकतात शब्द गळ्यात माझ्या 

नियम

कांदा पोहे, व कांदा भजी
जोडीला आल्याचा चहा 
पाळशील हा नियम सदा 
जगशील हसत खदाखदा

दर्प

करू नका उन्माद
रहा सतत आबाद
लुटा आनंद मनमुराद
घेत आयुष्याचा आस्वाद

आठवण

आज आली पुन्हा तुझी आठवण
मन झाले सैरभैर
घडले होते असे काय गैर वर्तन
आजन्म करावासापारी भासते  है जीवन

दुष्काळ

उसवलेले आकाश अन फाटलेली जमीन
सांडलेला सागर अन काळवंडलेला चंद्र
आखुडलेली रात्र अन लांबलेला दिवस
देवालासुद्धा असते हवस
पावसासाठी देखील मागतो तो नवस 

व्यभिचार

शाररीक वासना, मनातली हवस
लांबवते रात्र, आखुडते दिवस 
शृंगारक्रीडेप्रती असला ठेवू नये व्यर्थ आकस 
क्रीडाच ती, फारफार तर देईल थोडीशी पिडा 
त्यासाठी संधी हाताची का सोडा?

Wednesday, March 25, 2015

Breakfast

Breakfast
=================
Teddy bear, Teddy bear
Come here,
Let's eat together,
Bread and Butter

Saturday, March 21, 2015

आशिक़ी

प्रेमात तुझ्या पडलो मी पून्हा पाय घसरून
तुझ्याविना जगलो कसाबसा, क्षण प्रत्येक मोजून
गेली नाही वेळ अजून 
घे मिठीत मला पून्हा,
सगळा भूतकाळ विसरून

मद्यपान

हरपून सारे देहभान
केले मी ख़ूप मद्यपान
उडत गेला मानसन्मान 
अन हरपले सगळे देहभान

Sunday, March 01, 2015

भेंड्या

भेंड्या
===================
म्हणून मला मनकवड्या
उगाच नकोस लावूस शेंड्या
हवं  तर खेळू भेंड्या 
नाही तर चिरून ठेवू भेंड्या 
नाक वर करून भांडतोस काय गेंड्या  
काय आहे मनात तुझ्या
सांग  हळूच कानात माझ्या 

Friday, February 27, 2015

स्पष्टवक्तेपणा

व्यर्थ दडवू नकोस वेळ झगड्यात
ना बोलूस क्लिष्ट कोड्यात
काय आहे तुझ्या मनात
हळूच सांग माझ्या कानात

कर्म

आत्मनिंदेसारखी नाही चूक
ठरवा ध्येय, नेम धरा अचूक
करा प्रयत्न अविरत
न बसता कण्हत वा कुढत

Teenage pregnancy awareness

निष्पाप जिवांचा उडला थरकाप
ज़री नव्हते त्यांच्या मनात पाप
नकळतच झाले होते ते आई बाप
काय कविता हि,
वाचून झाला डोक्याला ताप

Saturday, January 24, 2015

वेड
---------------
घर ते काम, काम ते घर
सारखीच चालू असते नुसती वडवड
कधी थांबेल जगण्यासाठीची धडपड
न काही उसंत - न काही सवड
किती करावी गडबड
थांबवावी कशी मनाची बडबड
जवळ जवळ लागतच आलाय वेड
बघतो यावर सागंतो का काही टेड (Ted

वेड

वेड
===========
घर ते काम काम ते घर
घरी आल्यावर घरकाम
काम झाल्यावर घरी काम
काम थांबेल झाल्यावर घर
घर झाल्यावर होईल काम
ना काही काम ना काही आराम
बघता बघता म्हणावे लागेल हे राम 

वेड

वेड
======================
माझेच माझ्याशी उडू लागलेत खटके
मनास माझ्या मीच मारतो फटके
कधी शरीरास माझ्या देतो जोरात चटके
वेचताना मीच माझ्या चितेची लाकडे