Saturday, January 24, 2015

वेड
---------------
घर ते काम, काम ते घर
सारखीच चालू असते नुसती वडवड
कधी थांबेल जगण्यासाठीची धडपड
न काही उसंत - न काही सवड
किती करावी गडबड
थांबवावी कशी मनाची बडबड
जवळ जवळ लागतच आलाय वेड
बघतो यावर सागंतो का काही टेड (Ted

वेड

वेड
===========
घर ते काम काम ते घर
घरी आल्यावर घरकाम
काम झाल्यावर घरी काम
काम थांबेल झाल्यावर घर
घर झाल्यावर होईल काम
ना काही काम ना काही आराम
बघता बघता म्हणावे लागेल हे राम 

वेड

वेड
======================
माझेच माझ्याशी उडू लागलेत खटके
मनास माझ्या मीच मारतो फटके
कधी शरीरास माझ्या देतो जोरात चटके
वेचताना मीच माझ्या चितेची लाकडे