Friday, February 27, 2015

स्पष्टवक्तेपणा

व्यर्थ दडवू नकोस वेळ झगड्यात
ना बोलूस क्लिष्ट कोड्यात
काय आहे तुझ्या मनात
हळूच सांग माझ्या कानात

कर्म

आत्मनिंदेसारखी नाही चूक
ठरवा ध्येय, नेम धरा अचूक
करा प्रयत्न अविरत
न बसता कण्हत वा कुढत

Teenage pregnancy awareness

निष्पाप जिवांचा उडला थरकाप
ज़री नव्हते त्यांच्या मनात पाप
नकळतच झाले होते ते आई बाप
काय कविता हि,
वाचून झाला डोक्याला ताप