Monday, May 25, 2015

वंचना

सांगू कसे मी तुला
मनात काय माझ्या
बघताच डोळ्यात तुझ्या
अडकतात शब्द गळ्यात माझ्या 

नियम

कांदा पोहे, व कांदा भजी
जोडीला आल्याचा चहा 
पाळशील हा नियम सदा 
जगशील हसत खदाखदा

दर्प

करू नका उन्माद
रहा सतत आबाद
लुटा आनंद मनमुराद
घेत आयुष्याचा आस्वाद

आठवण

आज आली पुन्हा तुझी आठवण
मन झाले सैरभैर
घडले होते असे काय गैर वर्तन
आजन्म करावासापारी भासते  है जीवन

दुष्काळ

उसवलेले आकाश अन फाटलेली जमीन
सांडलेला सागर अन काळवंडलेला चंद्र
आखुडलेली रात्र अन लांबलेला दिवस
देवालासुद्धा असते हवस
पावसासाठी देखील मागतो तो नवस 

व्यभिचार

शाररीक वासना, मनातली हवस
लांबवते रात्र, आखुडते दिवस 
शृंगारक्रीडेप्रती असला ठेवू नये व्यर्थ आकस 
क्रीडाच ती, फारफार तर देईल थोडीशी पिडा 
त्यासाठी संधी हाताची का सोडा?