Monday, May 25, 2015

दुष्काळ

उसवलेले आकाश अन फाटलेली जमीन
सांडलेला सागर अन काळवंडलेला चंद्र
आखुडलेली रात्र अन लांबलेला दिवस
देवालासुद्धा असते हवस
पावसासाठी देखील मागतो तो नवस 

No comments: