Thursday, August 20, 2015

दुष्काळ

दुष्काळ
=======================
उसवलेलं आकाश अन् फाटलेली जमीन
सांडलेला सागर अन् काळंडलेला चंद्र
आखुडलेली रात्र अन् लांबलेला दिवस
देवालासुद्धा असते हवस
पावसासाठी देखील मागतो तो नवस

fling

Once upon a time
I had a fling
Nothing mattered, Fun was Everything 
I can't find it anymore
Even if I searched it with Bing

भरारी

घेताच मी भरारी
तोडोनी पाश सारे
पडले आकाश अपूरे
वेचले अनेक तारे
स्वप्नं राहिले अधूरे
खंत हिच उरली उरी
जाणून हि व्यथा,
प्रयासाने घेतो पुन्हा उभारी

Tuesday, August 04, 2015

शब्दांबरोबर मस्ती

शब्दांबरोबर मस्ती
=============
रात्र अंधारी, घालत होतो गस्ती
घालवण्यास आलेली सुस्ती
म्हंटले करावी शब्दांबरोबर थोडी मस्ती
मस्ती करता करता शब्दांशी घेळलो कुस्ती
आणि रचली हि कविता जबरदस्ती
=============

शब्दांबरोबर मस्ती
=============
गस्ती घालतांना
घालवण्यास सुस्ती
खेळून शब्दांशी कुस्ती
रचली चारोळी जबरदस्ती