Wednesday, December 21, 2016

नरकचतुर्दशी - लवकर उठा

नरकचतुर्दशी - लवकर उठा
••••••••••••••••••••••••••
जपलं आयुष्यभर ते संपले क्षणात
न जाणे कुढल्या होतो मी भ्रमात
रंगवलेली स्वप्ने, रात्रीच्या स्वप्नात
विरून गेली, साखरझोपेच्या नादात
जिंदगी के ये दो लम्हे
पहले लम्हे मे सास अंदर
दुसरे मे सास बाहर
बस जानलो ईतनाही
तो काबू मै रहेगा अंदरका बंदर

रात्रीची भूतं

मनपटलावर चालती चलचित्र 
डोळे मिटताच विचार विचीत्र 
भयाण शांतता सर्वत्र 
भस्कन भूंकलं काळं कूत्र

एकटा

मीच माझा बाप
मीच माझी माय
दूधाच रक्षण करी
दूधावरची साय
नाही कुणी भगीनी
नाही कूणी भ्राता
मित्रा, तूच तुझा त्राता

Monday, October 03, 2016

तुप-पोळी

लिहीली फक्त एक चारोळी
आळवण्यास भरवताना तुला तुप-पोळी
तु मुलगी खट्याळ किती, करतेस पळापळी
मिष्कील स्मितखळी, दिसतेस किती साधीभोळी

अर्धवट

जरी आहेत खिश्यात खूप नाणी
डोळ्यात टचकन आलं पाणी
आठवून ती जूनी कहाणी

Saturday, September 17, 2016

अतिरेक


कधीकाळी, मी होतो तिचा परमंभक्त
सहजतेने केले कित्येक नक्त
क्षणात फुटले हृदय, सांडले रक्त
मेंदूही झाला पूरता  रिक्त


गोष्ट मानसिक पिळवणूकीची
हमसून हमसून झाले खूप उद्रेक
अनावर भावना,करवती अतिरेक

आईने दिला जन्म
बापाने दिला भोग
ग्रहांचे विचित्रच असतात योग
कारावास आजन्म




प्रेम

झोप नाही डोळ्यात
भूक नाही पोटात
स्वर अडकले ओठात
पडलो जेव्हा प्रेमात

Monday, June 20, 2016

लग्न
================
अपुरा पडला शब्दसंचय
देता देता  तुझा परिचय
तोंडात कोंबून लग्नाचा लाडू
आयुष्यभराच चालू राहील चयपचय

Thursday, June 02, 2016

ब्रम्हराक्षस

बघून सूर्याचा छोटुसा कवडसा
छोटुसा घाबरट ससा,झाला वेडापिसा
धापा टाकत लपला तो कसाबसा
गम्मत बघून ती, गालातल्या गालात हसा

Wednesday, June 01, 2016

तडफड तडफड,
निकराने शेवटची फडफड
पारध्यास न फुटे पाझर
जगरहाटी निर्दय, वाहते निर्झर 
नकोत बंध, हवे संबंध
अबोल स्पर्श, मोहक सुगंध
स्वप्नात माझ्या तू बेधुंद
धुंदीत तुझ्या, तोडले सर्व र्निर्बंध

Sunday, May 29, 2016

मार्ग खडतर, चाला अविरत
क्षूधेस विसावा, क्षणिक विरंगुळा
घातक कंटाळा, त्वरेने टाळा
नियम सफलतेचा, (याहूनी) नाही निराळा


Friday, May 27, 2016

H1B

चलते चलते पहूच गये बहोत दूर
ऐशोआराम के ख़ातिर बनबैठे मजदूर
जिंदगीके सुनहरे दिनों के खोकर
क्या ख़ाक निहारोगे अपना हूर

Xpress Yourself

जीवन जणू तुरंग
तुझ्यामूळेच भरतो त्यात रंग
का ऊभी चोरूनी अंग
ये मिठीत घट्ट, चल होऊ या दंग

अर्थ

शोधता जीवनात अर्थ 
वेळ दडवू नका निरर्थक 
ऊपभोगनिया क्षण हातचा
होई आयुष्य सार्थक

परदेशी

चिंता होती भविष्याची
साथ लाभली दैवाची
भेटली माणसे आपुलकीची
जरी थरली होती मी कास परदेशाची

व्यस्त

जो म्हणे मी फारच व्यस्त
समजावे तो फारच सुस्त
झोपतो ढाराढूर, जेवून मस्त
वेळ त्याचा फारच स्वस्त
भाव देऊ नये त्यासी जास्त

स्तक (Stuck)

कुणी लिहतं पुस्तक
तर कुणी धरून बसतं मस्तक
प्रत्यकेला जरी नसला हक्काचा हस्तक
तयारीत रहा नेहमी,
न जाणो नियती कधी देईल दारावर दस्तक

टक्कल

मित्राला पडलं टक्कल
लढविली त्याने न्यारीच शक्कल
म्हणला, आताशी कुठे येतेय अक्कल
करता करता चाणक्याची नक्कल

Wednesday, April 13, 2016

अव्यक्त

अव्यक्त
==============
अविचाराने बोलून बसलो
अन विचार करून लिहलं, 
ते न कळवू शकलो-
मनारे का धरतोस माझ्याशीच इतूके वैर
वागतो का मी खरच इतके गैर?
शिक्षा माझीच मला,
जगतों जीवन होऊनी सैरभैर

चावट

चावट
=========
घेतली दारू, टाकली सुट्टी
दाराला लावली खिट्टी
तुझी नी माझी घट्ट गट्टी
बाकी सगळ्यांशी कट्टी

निश्चय

निश्चय
==================
मनातल्या मनात का होईना, किल्ले नक्की उभारु
स्वप्नात का होईना, हवं तसं आयुष्य साकारु
दिवसाच्या जबाबादार्या, कधी तरी नक्की झुगारु
मरतांनादेखील यमास, एकदातरी धूळ चारू

बोलतीबंद

Disclaimer : माझा वय्कतित अनुभव नाहीं। 
===========
बोलतीबंद
===========
असं कसं, असं कसं 
तो म्हणे, माझा ऐवढा मोठां हुद्दा
ऐकताच हे, घातला तिनं त्याला गुद्दा
न जाणून घेता त्याचा पूर्ण मुद्दा
क्षणात कळला त्याला तिचा हुद्दा

संवाद

उन्मादापाई झाला प्रमाद
क्षमस्व म्हणोनी, घालतो साद
विसरूनिया सगळे वाद
नव्याने चल करूया संवाद

खवचट

असशील बावळट, चालेल मला
असशील चावट, चालेल मला
असशील तापट, चालेल मला
असशील खवचट, चावेल तुला

खादाडि भटकंती

खादाडि भटकंती
-------------------
ईकडे जाऊ, तिकडे जाऊ
कुठे जाऊ नि काय खाऊ
गोंधळ घालतेय, मनातली माऊ