Wednesday, April 13, 2016

अव्यक्त

अव्यक्त
==============
अविचाराने बोलून बसलो
अन विचार करून लिहलं, 
ते न कळवू शकलो-
मनारे का धरतोस माझ्याशीच इतूके वैर
वागतो का मी खरच इतके गैर?
शिक्षा माझीच मला,
जगतों जीवन होऊनी सैरभैर

चावट

चावट
=========
घेतली दारू, टाकली सुट्टी
दाराला लावली खिट्टी
तुझी नी माझी घट्ट गट्टी
बाकी सगळ्यांशी कट्टी

निश्चय

निश्चय
==================
मनातल्या मनात का होईना, किल्ले नक्की उभारु
स्वप्नात का होईना, हवं तसं आयुष्य साकारु
दिवसाच्या जबाबादार्या, कधी तरी नक्की झुगारु
मरतांनादेखील यमास, एकदातरी धूळ चारू

बोलतीबंद

Disclaimer : माझा वय्कतित अनुभव नाहीं। 
===========
बोलतीबंद
===========
असं कसं, असं कसं 
तो म्हणे, माझा ऐवढा मोठां हुद्दा
ऐकताच हे, घातला तिनं त्याला गुद्दा
न जाणून घेता त्याचा पूर्ण मुद्दा
क्षणात कळला त्याला तिचा हुद्दा

संवाद

उन्मादापाई झाला प्रमाद
क्षमस्व म्हणोनी, घालतो साद
विसरूनिया सगळे वाद
नव्याने चल करूया संवाद

खवचट

असशील बावळट, चालेल मला
असशील चावट, चालेल मला
असशील तापट, चालेल मला
असशील खवचट, चावेल तुला

खादाडि भटकंती

खादाडि भटकंती
-------------------
ईकडे जाऊ, तिकडे जाऊ
कुठे जाऊ नि काय खाऊ
गोंधळ घालतेय, मनातली माऊ