Sunday, May 29, 2016

मार्ग खडतर, चाला अविरत
क्षूधेस विसावा, क्षणिक विरंगुळा
घातक कंटाळा, त्वरेने टाळा
नियम सफलतेचा, (याहूनी) नाही निराळा


Friday, May 27, 2016

H1B

चलते चलते पहूच गये बहोत दूर
ऐशोआराम के ख़ातिर बनबैठे मजदूर
जिंदगीके सुनहरे दिनों के खोकर
क्या ख़ाक निहारोगे अपना हूर

Xpress Yourself

जीवन जणू तुरंग
तुझ्यामूळेच भरतो त्यात रंग
का ऊभी चोरूनी अंग
ये मिठीत घट्ट, चल होऊ या दंग

अर्थ

शोधता जीवनात अर्थ 
वेळ दडवू नका निरर्थक 
ऊपभोगनिया क्षण हातचा
होई आयुष्य सार्थक

परदेशी

चिंता होती भविष्याची
साथ लाभली दैवाची
भेटली माणसे आपुलकीची
जरी थरली होती मी कास परदेशाची

व्यस्त

जो म्हणे मी फारच व्यस्त
समजावे तो फारच सुस्त
झोपतो ढाराढूर, जेवून मस्त
वेळ त्याचा फारच स्वस्त
भाव देऊ नये त्यासी जास्त

स्तक (Stuck)

कुणी लिहतं पुस्तक
तर कुणी धरून बसतं मस्तक
प्रत्यकेला जरी नसला हक्काचा हस्तक
तयारीत रहा नेहमी,
न जाणो नियती कधी देईल दारावर दस्तक

टक्कल

मित्राला पडलं टक्कल
लढविली त्याने न्यारीच शक्कल
म्हणला, आताशी कुठे येतेय अक्कल
करता करता चाणक्याची नक्कल