Monday, June 20, 2016

लग्न
================
अपुरा पडला शब्दसंचय
देता देता  तुझा परिचय
तोंडात कोंबून लग्नाचा लाडू
आयुष्यभराच चालू राहील चयपचय

Thursday, June 02, 2016

ब्रम्हराक्षस

बघून सूर्याचा छोटुसा कवडसा
छोटुसा घाबरट ससा,झाला वेडापिसा
धापा टाकत लपला तो कसाबसा
गम्मत बघून ती, गालातल्या गालात हसा

Wednesday, June 01, 2016

तडफड तडफड,
निकराने शेवटची फडफड
पारध्यास न फुटे पाझर
जगरहाटी निर्दय, वाहते निर्झर 
नकोत बंध, हवे संबंध
अबोल स्पर्श, मोहक सुगंध
स्वप्नात माझ्या तू बेधुंद
धुंदीत तुझ्या, तोडले सर्व र्निर्बंध