Friday, January 06, 2017

त्राता

मीच माझा बाप
मीच माझी माय
दूधाच रक्षण करी
दूधावरची साय

नाही कुणी भगीनी
नाही कूणी भ्राता
मित्रा, तूच तुझा त्राता

सार

भूतकाळापरी वर्तमान खरा
विरहापरी सहवास बरा
काळाचा जाणूनी महिमा
जगता जगता मरा
किंवा मरतांनाहि जगा