Saturday, February 18, 2017

लुंगी

गाळलेल्या जागा भरा:
बांधा घट्ट लुंगी नाहीतर ....
सुटली लुंगी, दिसली .....
नेसली लुंगी, वाजली .....


Friday, February 17, 2017

सीना तानके, ताणून दे मस्त 
मेंदूला करु थोडं सुस्त 
अन् मनाला ठेवुया तंदुरुस्त 
फ्रस्ट्रेशन होईल क्षणात फस्त 

political campaigns

मुख्य सेनापती
==============
करा खूप जाहिराती
दाखवा त्यात थोड्या करामती 
बघणारेच मुळी मंदमती
मग कुणीही होतं  सेनापती 

शेतकरी मुंगेरीलाल

ऊसाच्या ऐवजी पेरला कापूस
पडेल मग भरपूर पाऊस
यंदा मिळणार मस्त हापूस
स्वप्नं  बघत बदलली कूस
तेवढ्यात चावली घरात घुसलेली घूस 

Sunday, February 12, 2017

भेसूर म्रुत्यू

Disclaimer - Dark - very very dark
=================
धावता धावता फूटला ऊर
रक्ताचा वाहंला पूर
गवसलाच नव्हता जीवनात सूर
क्षणात म्रुत्यू भेसूर

प्रेमाचा पूर

प्रेमाचा आला पूर
पुरेपूर भरला ऊर
गवसला असा छान सूर
भेसूर असूर पळाले दूर