Tuesday, March 28, 2017

साकडं

विचार करता करता 
देवापुढं घातलं साकड
शांत कर मनातलं माकड
घालवून दे वृत्ती भेकड

पिटूकली

सालस मुलगी तू
हास्य तूझे गोजीरवाणे
खळीचे स्मित, जणू बेदाणे
हळूच खातेस, मुठीत लपवलेले दाणे

LDR

स्पर्शास तुझ्या आसूसलेला
जीव माझा  कासावीस
दे पटकन एक virtual किस
करतो तुला मी फारच मीस

विरह

शब्द माझे पडले अशक्त
करण्यास भावना व्यक्त
प्रिये, सांगू कसे तुला मी
तुझाच मी खरा भक्त
घे मिठीत खट्ट, सोड हा हट्ट
विरहाच्या ह्या क्लेशातून, 
त्वरेन कर मला तू मुक्त

अार्जव

किंतू नव्हताच कधी मनात
वरले होतेस तू मला पहाताच
दूनियाच होती या भ्रमात
कि आपण दोघे नव्हतोच मुळा प्रेमात
तूझ्याविना व्यर्थ घालवला मी वेळ
जमवू या का नव्याने आपला मेळ?

मस्तानी

स्पर्शाने तू, मोक्षासी पोहचवलेस क्षणात
तेव्हाच कोंडले तुला ह्रदयाच्या खणात
मोडीत काढली स्वप्नांची दूनिया
मांडण्यास तुझ्या बरोबर वास्तविक संसार


कोलाहल

अस्वस्थता जीवनात संतत
धडधड चालवी ह्रदयात
धडामोडीत गेली अवधी हयात
नव्याने करू सूरुवात
उरलेल्या उतारवयात

व्यसनाधीन जोडपं

एकदा प्यायलो खूप ताडी
वेगाने चढलो शिडी
जरी उंच होती तिची माडी
नेसली होती तीने सुंदर साडी
चल लवकर, म्हणलो तिला
चल लवकर, म्हणलो तिला
नाहीतर सुटेल आगगाडी
थांब जरा, म्हणली ती मला
थांब जरा, म्हणली ती मला
काढ थोडीशीच कळ
शिलगावलीय मीनं आत्ताच गायछाप बिडी!!!

म्या दरडावून बोललो
धूम्रपान आपणाला आवडत नाय
म्या दरडावून बोललो
धूम्रपान आपणाला आवडत नाय
मद्यपानाचं काय ता बोल

ती म्हणली, मुर्दाड्या
एकट्यानंच ढोसलीस सगळी ताडी
शिडी न लावताच चढलास माडी
मला देऊन लु्ंगी,
स्वत:च नेसलीस साडी,
तेही न बांधता परकराची नाडी

कानाखाली काढून जाळ
क्षणात उतरवेन तूझी ताडी
तुझी नी माझी काही केल्या
शिजत नाही डाळ
पण दोघांचा मस्त जातोय काळ

आदर्श नवरा

दिवसभर काम करून बायको माझी थकली
देतो मी तिला वाफाळणारा चहा अन् चकली
प्रेमाची वेल आमची यामुळेच सतत बहरली
आयुष्याची वर्षानूवर्षे यातच भराभर सरली

कानमंत्र

लाववायचा नसेल नशिबाला टाळा
टाळा तुम्ही कंटाळा
सूत्र हेच सगळ्यांना लागू
असू दे तो गोरा किंवा काळा

समय

क्षणाचा महिमा अपरंपार
क्षणात क्षण होतो पसार
क्षणिक खेळ सारा,
कितीही मोठा जरी वैश्विक संसार
यातच दडलेय जीवनाचे सार

वार्षिक योजना

वर्षात दिवस तीनशे पाशष्ट
दोनशेसाठ दिवस करा कष्ट
उरले एकशे पाच दिवस,
चाखा मेजवानी चविष्ट
वार्षिक योजना माझी विशिष्ट 

तंबाखू

दुखत होती अक्कल दाढ
त्यामुळे लागत नव्हती झोप गाढ
कळवळवून केला डेंटीस्टचा धावा
टाळावयाचा असेल तुम्हास प्रसंग असा
थांबवा खाणे तंबाखु, गुटखा किंवा मावा

भ्रमिष्ट

अडकलोय मी (दूष्ट)चक्रात
होतो मी असल्या भ्रमात
खर तर मी आहे स्वर्गात
जाणवले हेच, डोळे उघडले ज्या क्षणात

गंमत

काय चालवलाय पोरखेळ
चारचौघात शब्दांची नुसती भेळ
विषय, अर्थ, चर्चा, नाही कशाचाच मेळ
अर्धवट काहीतरी लिहून, वाचून घालवताय फुकट वेळ
माझ्यातर्फे तूम्हा श्रोत्यास मानाचे केळ

Sunday, March 26, 2017

तुझी आठवण

तुझ्यासाठी मन माझं झूरतं 
झूरून झूरून, रोज मरतं
मरतां मरतां, 
तुझ्या आठवणींनी पून्हा उभारतं
झूरून मरण्यासाठी, नव्यानं जगतं

मातीमोल [Disclaimer - It's Dark]

केली ढोर मेहनत खुप
मोठा होता हव्यास
सगळ्यांवरचा उडतोय विश्वास
मोकळ्या हवेतही कोंडला श्वास

कसर

आठवणीत तिच्या भटकलो वणवण
ना तिला आली कधी माझी आठवण
ना मला पडला कधी तिचा विसर
नशिबात आमच्या होती हिच एक कसर

Focus

ध्येय गाठण्यास अवधी अल्प
करा कठोर संकल्प
धूत्कारून अवाजवी विकल्प
ध्येयाकडे अविरत वाटचाल तत्पर

रसमलाई

करू नका हकनाक दिरंगाई
मनसोक्त खा रसमलाई
त्यातच तुमची भलाई
मस्त कराल गाई गाई
न एेकता अंगाई

आदर्श नवरा

दिवसभर काम करून बायको माझी थकली
देतो मी तिला वाफाळणारा चहा अन् चकली
प्रेमाची वेल आमची यामुळेच सतत बहरली
आयुष्याची वर्षानूवर्षे यातच भराभर सरली

Sunday, March 12, 2017

कळवळा

 कळवळा
=======
ओळखीपुर्वी तू होतीस अनोळखी
मान्य मला
ओळखीनंतर का भासतेस अनोळखी
अमान्य मला

ओळख

सहवास आहे म्हणून ओळख
सहवास नाही म्हणून अनोळखी
नियम असले नाही मी पाळत,
सहवास नसला तरी ठेवतो मी ओळख

दिवास्वप्नाळू

आठवणी जुन्या, क्षणात नेई त्यास गावी
विचार नवे, क्षणात नेई त्यास परगावी
डोळे मिटताच, क्षणात दावी त्यास स्वप्ने नवी
कानाखाली काढून जाळ, त्यास वर्तमान दावी

मूल

मूल
============================
इतके दिवस दिली जबाबदारीला हूल
अडकलो पुरता आता,
लवकरच येणार आहे एक गोजिरवाणं छोटंसं फुल

दस्तक

मेंदू देतोय कवटी वर दस्तक
चारोळ्यांच्या गुन्ह्यात यमकच एक विनोदी हस्तक
वाचनात ठेवा सातत्य, उगढून मुख पुस्तक
विनंती हीच  न होता नतमस्तक

निघृण

श्वापदापरी घेतलास माझा बळी
देखवुनीया स्मितहास्याची खळी
मुकेच फोडतो मी किंकाळी
वाट पाहता तुझी वेळी अवेळी

ईराची दिवाळी

घरी दारी लावल्या दिवाळीच्या पणत्या
देवासमोर सुवासिक उदबत्या
ईराला औक्षण करण्यास
आल्या तिच्या मावश्या आणिक आत्या

अमानुषता

अमानुषता
=========================
एकामागून एक घडत जाताय गोष्टी भीषण
चोरी, खून बलात्कार तर कधी अपहरण
याच नक्की आहे तरी काय कारण?
देवालाच करावं का धरतीवर पाचारण 

विठू

रंग सावळा, रूप बावळा
स्वभाव कोवळा
विठू माझा भोळा

शेतकरी मुंगेरीलाल

ऊसाच्या ऐवजी पेरला कापूस
पडेल मग भरपूर पाऊस
यंदा मिळणार मस्त हापूस
स्वप्नं  बघत बदलली कूस
तेवढ्यात चावली घरात घुसलेली घूस

विरह

विरह
========
बायको जाता माहेरी,
बायको जाता माहेरी
विरहाने ग्रासले मला,
सावरले तिच्या आठवाणींनी  

फुटकळ कवी

ह्रुदयात जपलं तुला
शब्दाने गोंजारलं तुला
गप्पातच गुंतवलं तुला
बघतां बघतां ऊल्लु बनवलं तुला

मातीमोल

केली ढोर मेहनत खुप
मोठा होता हव्यास
सगळ्यांवरचा उडतोय विश्वास
मोकळ्या हवेतही कोंडला श्वास

Thursday, March 09, 2017

अनमोल

वेळेला नाही मोल
मोलासाठी देतो वेळ
जगरहाटीचा, अजबच सारा खेळ

सार

मेदूंतल्या मेंदूत कोमजले अव्यक्त विचार
निष्कीर्यतेपुढे होते ते लाचार
जीवनाचे जाणा हे मूलभूत सार
आयुष्यात विचारांपेक्षा महत्वाचा आचार

विमा

जेव्हापासून घालू लागलो पायजमा
उतरविला आयुष्याचा विमा
झाली चिंता दूर
लागते झोपं  छानं
न होता हुरहूर