Thursday, April 20, 2017

टकटक

दारांवर हलकीशी  टकटक
वाटू लागली कटकट
थोडक्यात बोलून सटासट
मैत्री तुटते पटापट   

अराजकता

शब्दांविना केली चारोळी, न जुळविता यमक 
नियमांची दाखवण्यास निरर्थकता व्यर्थ 
चौथी ओळ शून्य

विश्व परीक्रमा

सागराच्या जोडीस समीर
नौकेने सोडला तत्काळ तीर
रवीच्या किरणाने भेदला तिमीर
मानवाचा जन्म तुझा
तू बिनधास्त जगभर फिर

विहंग

उडाला ऊंच विहंग
बाळबोध स्पर्धेस त्याच्या, उडविला पतंग
सोडली ढिल खुप, चक्रिचा मांजा झाला तंग
पसरून पंख त्याने, क्षणार्थात गाठले शिखर उत्तुंग
बघून भरारी त्याची झालो मी दंग

Tuesday, April 11, 2017

घाण्याचा बैल

दास असल्याने मन भारीच उदास
वरवरुन ऐशौआरामाचा आभास
अंतरी दांडगे दु:ख; 
बळेच पाडतो पार कर्तव्य
ठेवूनी वृत्ती मख्ख

आभास

मनात एकच आस
वाट पाहिली रोखून श्वास
मला सारखा होतोय भास
कि ती आहे जवळपास
पण तो आहे फक्त आभास

तरलता

संजीवनी चाऊन चाऊन चघळली
पण परीस्थिती तरी चिघळली
पूर्वीसारखी ती कधीच नाही खिदळली
हवेत तरंगणारी मती, जमीनीवर क्षणात आदळली

उदासीनता

आकांक्षा व्यतिरिक्त 
जीवन भासे फारच रिक्त
त्यातून वायफळ गोष्टींवर मन आसक्त
शरीर राहिलच तरी कसे सशक्त?

प्रसन्नता

प्रसन्नता
==========
चविष्ट अन्न
मन प्रसन्न
जीवन संपन्न

निश्चय

या तनात किती यातना
का मनात तरी कामना
जिद्दीने करेन सामना
बघत राहिल सारा जमाना

व्यर्थ

दिवसभराची वणवण
त्यातून रात्रीचे जागरण

डोक्याला फुकट तणतण
निरर्थक अनुभवांची साठवणं




Saturday, April 08, 2017

संसार

कुंडली जुळताच
मिळाली आयुष्याला कलाटणी
फावडा, कुदळ आणि पोळपाट लाटणी
कामांची करुनी  अशी वाटणी
चवीने खातो कांदा, भाकरी आणि चटणी
सुखी संसाराची हि एक धाटणी (मांडणी)

Saturday, April 01, 2017

Workaholics

महत्वाकांक्षी वृत्ती
कशी काय घेणार निवृत्ती?
धनापेक्षा कामाचीच आसक्ती
वेडी वृत्तीच करते स्वत:वर सक्ती

दैनंदिनी

पुन्हा उगवला सूर्य
साखरझोपेच्या मोडीचे घडले कृत्य क्रौर्य 
नव्याने गोळा केले उरी धैर्य
धडाधडीच्या दैनंदिनीत दाखवण्यास शौर्य