Monday, May 29, 2017

मी

मी माझं माझाच, माझ्यात गुरफटत गेलो
आतल्या आतच अडकून गेलो
सुटकेचा मार्ग सापडेना
माझं मलाच एकवेना

#DinnerWithFriends

कभी कभी लगता है 
दोस्तोको छोड कर दुश्मानोंकोहि मिल आऊ
कम से कम दुश्मानोंके साथ लढ़ के मरुंगा 
कंबख्त हमारे दोस्त हि ऐसें है
खाना खिला खिला के हि मार देते

Container

वो कप हि क्या जीस मे चाय न पी
वो बर्तन हि क्या जीस मे सब्जी तरकारी न बनी
और वो दिल ही क्या जीस मे तुम न रही

वो रात

वो शाम हि क्या जो रंगीन ना हो
वो रात हि क्या जीसमे मशगुल ना हो
वो सुबहं हि क्या जीसके बाद 
एैसी शाम ना हो
और ; और ;
वो शाम हि क्या जीसके बाद
वैसी रात ना हो

वृक्षतोड

किती सुंदर हा निसर्ग
भूतलावर निर्मितो स्वर्ग
तोडूनी वृक्षवल्ली सर्व
मानवा करतो का तू फूकी गर्व?

रागाचा रोग

Disclaimer - Dark
==================
रागाचा रोग
==================
चिडचिडीची झाली सवय
वाढत जातय जसं वय
कुणाचीहि करत नाही मी गय
उरलेसुध्दा नाही पाप पुण्याचे भय

भटकंती

डोक्यावर नीलांबर 
चाकाखाली डांबर
असूदे कितीही अंतर
गाडी चालणार निरंतर

अर्धवट

वटवट करता करता
ती बोलली काहीतरी अर्धवट
पुर्ण, सविस्तर सांग 
म्हणण्याईतकी नव्हतीच माझी वट

दंगा

आम्ही करणार खूप दंगा
घेणार आता नियतीशीच पंगा
घोड्याशिवाय चालवणार टांगा
गोंधळ होण्या आधीच ईकडून तुम्ही पांगा

सुत

हसा, खेळा, न रडता मस्त जगा
जगण्यास कधीही देऊ नका दगा
जन्म पासून मृत्युचा एकच असतो धागा
करायचा नाही त्याचा गुंता
खुणगाठ एवढीच बांधा

कावड

काढून थोडीशी सवड
जोपासा आपली आपली आवड
कितीही भरली जरी कावड
तहानलेलेच राहिल मनीचं माकड

कामचुकार नवरा

कधी कधी पडतो विसर 
कधी कधी प्रयत्नात रहाते कसर
तर कधी ग्रहांचाच असतो असर
देऊन असली फुटकळ कारणे
 कामचुकार नवरा, करतो कामात काटकसर

अवकाशयात्रा

एकदा गेलो चंद्रावर
धरून सोंडेत मेणबत्ती
उड्या मारत होता तिथे हत्ती

सुखाचा सोर्स सोस

सोस सोस सोसलं 
सोसता सोसताच सोकोवलो
सोकावल्यानेच सुखावलो
सुखावल्यानेच पुन्हा सोसु लागलो

बटाटवड्यांचा शोध

जोशी वडेवाले, वेडावले
तेचतेच खाऊन कंटाळले
बेसनात कुचकरुन बटाटे, चमचमीत तळले
चटणीबरोबर पावात टाकून विकले

जोशी वडेवाले, वेडावले

पालक मेथी, कोबी फ्लॉवर
काहीतरी तर नविन कर
आग्रह धरताच असा
केले तिने बटाट्याचे वडे
ऊपाशीपोटाचे सुटले कोडे

Monday Blues

वर्तृळाची त्रिज्या धावली परीघापर्यंत
चौकटीच क्षेत्रफळ अवघडलं लांबी रूंदीत
दिवस अडकले पृथ्वीच्या घेरीत
अन् आयुष्य संपले हेलपाट्याच्या धकाधकीत

नंदी

देवळापुढे झुलणे, वृत्तीच छंदी
आनंदी असतो नंदी
जरी आजूबाजूस असेल मंदी

कुंडली

तुम पुकारते, हम तुरंत आते
तुम पकाते, हम जम के खाते
तूझे नी माझे असे घट्ट नाते
म्हटले होते पंचांग दाते

हक्काचं दु:ख

प्रत्येकालाच असतं स्वत:च असं एक दु:ख
म्हणून काही फार करू नये त्याच्याशी सख्य
सख्यात त्याच्या बसतो फक्त माणूस मख्ख
स्फूर्तीने धाव, अजून तर उरलयं आयुष्य अख्खं

Just for the heck of It.

Just for the heck of It. 
=================
पेटून उठला निखारा
वाहू लागताच वारा
जाळून स्वत:ला संपूर्ण 
धूरापरी टिकवू पहात होता अस्तित्व

DinnerWithFriends

कभी कभी लगता है 
दोस्तोको छोड कर दुश्मानोंकोहि मिल आऊ 
कम से कम दुश्मानोंके साथ लढ़ के मरुंगा 
कंबख्त हमारे दोस्त हि ऐसें  है 
खाना खिला खिला के हि मार देते 

Sunday, May 14, 2017

लोभ

अर्थार्जन व्हावे व्यर्थ
इतकेच करावे अर्थार्जन
अर्थाचा नंतर होतो अनर्थ
सतत डोळ्यासमोर असल्यास स्वार्थ

का-कू

केस लागले पिकू
कंबर लागली झुकू
ताठ पाठ, नको वाकू
सतत करतो का-कू

भूकेचे नोकर

मेंदूतली विद्वत्ता, पोटातल्या भुकेची चाकर
करते नाना क्लृप्त्या, मिळविण्यास भाकर
नसावा गर्व, नसावी शरम
सगळेच करता काम, मिळविण्यास गाकर

ऊचित?

रीकमटेकडं मन
आळसावलेलं शरीर
अजगरापरी पडलो निपचित
असलं जगणं आहे का ऊचित?

ऊसासा

कधी रडावे ढसाढसा, कधी खिदळून हसा
जमेल तसे सोसा, पण स्वत:ला पोसा
तुमच्यासाठी कुणीही टाकणारदेखील नाही 
फुकटचा ऊसासा

निर्झर

कुणीतरी कुणासाठी झूरत असतं
झुरतां झुरतां जगण्यासाठी
आतून आतून मरत असतं
यातनांतूंनच फूटतो पाझर
प्रेमाचा वाहतो झरा निर्झर

प्रार्थना

उकिरडे फुंकत, पीर पीर करीत
फिरण्याचा नाही माझा स्वभाव
उगीच करून करून काव काव
आणतही नाही मी नसता आव
विविध अनुभवांवर मारायचाय मला मस्त ताव
समजून घे देवा मला आणि लवकरच पाव
यापेक्षा जास्त तुलाही देऊ शकत नाही मी भाव

हाराकिरी १

ईतरांची मिळवावी मंजूरी
म्हणून हकनाक केली हूजूरी
स्वेच्छेने स्वछंदास मारुनी 
जीवंतपणीच केली मी हाराकिरी

हाराकिरी २

मिरवून वस्त्रे भरजरी
कोमजली मनातली मंजीरी
किती आळवू मी राग दरबारी
ईतरांची मिळवण्यास मंजूरी

हाराकिरी ३

कोत्या मनाची मजबूरी
मिळवण्यास ईतरांची मंजूरी
मारुनी स्वेच्छेने स्वछंदास 
हकनाक करतो हुजूरी

पुजारी

निष्काम भावनेने करतो सेवा
गुपचूप त्यातून चाखतो मेवा
अपरंपार महिमा तुझा देवा
पुजारी होतो गलेलठ्ठ
तरी समाज आपला मठ्ठच

घाणा

आसूरी जीव, करी कटकट
चंचल मन, लटक मटक
राकट शरीर, धडधाकट
बैलच तो घाण्याला जूंपिला
गाळी घाम खूप, आयुष्य तेलकट

अकल्पित

क्षणक्षण वेचून गुंफले 
क्षणात तोडूनी फेकले
फुलांचे होण्याआधी निर्माल्य
चुरगाळले मन, हेची शल्य

कल्पनाशक्ती

मोकाट सुटला सोडताच सैल
घाण्याचा नाही मी बैल
मनाचा माझा निराळाच डौल
बसल्या बसल्याच धावतो मैलोनमैल

चावट

मिळवला दाम
करूनी काम
देऊनहि दाम
मिळत नाही काम

गम्मत

शकलेच झाली मनाचे
मन बोलूच नाही शकले
शकलांचीच होतात फूले
कुणास म्हणावे आता परके
प्रेमानेच वागवतात सगळे

साबणाचे फूगे

वर्षा मागून गेली वर्षे
क्षणात पालटली अनेक युगे
तुलनेत आयुष्य आपले, जणू साबणाचे फूगे
कळले ईतूकेच जरी, जन्म सार्थकी लागे

वीज

फाटले आकाश
पडला प्रकाश
छायाचित्राची घटिका पकडण्यास
क्षणिकच होता अवकाश

पश्चाताप

चुकलं, मुकलं, हूकलं
आयुष्य न जगताच संपलं
असं कधी कुणास वाटू नये
म्हणून हातची संधी; हक्काचा वेळ
कधीच फुकट दडवू नये

भूकेचे नोकर

मेंदूतली विद्वत्ता, पोटातल्या भुकेची चाकर
करते नाना क्लृप्त्या, मिळविण्यास भाकर
नसावा गर्व, नसावी शरम
सगळेच करता काम, मिळविण्यास गाकर

Mother's Day special

आईचा दिवस ऐक
बाळाचाच क्षण प्रत्येक
आईला म्हणून happy Mother's डे
बाळा म्हणतो, लागली भूक - मम दे

(अंध)श्रद्धा

(अंध)श्रद्धा 
============================
कुणी म्हणे देव, कुणी म्हणे दगड 
कुणी अडकून घाले साकड
तर कुणी म्हणे, चल हट; मी नाही भाकड 
ज्यासी वाटेल त्याने तेच करावे 
हेच एक सत्य; बाकी सर्व फक्त व्यत्यय

चीर:तारुण्य

केस लागले पिकू
कंबर लागली झुकू
ताठ पाठ, नको वाकू
सतत करतो का-कू

झमेला

कैसा है ये झमेला
हर कोई है अकेला
जिसको  लगी है भूक
वही खायेंगा केला

अराजकता

शब्दांविना केली चारोळी, न जुळविता यमक
नियमांची दाखवण्यास निरर्थकता व्यर्थ
चौथी ओळी शून्य  

तुलना

तुझी ना माझी नाही तुलना
इतकं तुला का कल ना?
तू छोटा बाळा
मी घोडा काळा

Thursday, May 11, 2017

उनाड दिवस

उनाड दिवस
=====================
रवीच्या जोडीला आकाश निळे
हिरव्या पालवीवर सूर्यकिरण पिवळे
बागडून आनंदी, मलमली कांती सावळे
शिषीरच आवर्जून वसंतास आळवे

व्यर्थ

करूनी क्षणोक्षणी काम
कमवला खूप दाम
कामास न आला शेवटी दाम
मरूनी पडलो निपचित

जाणीव

काळ्याचे कालावधीत होतील केस पाढंरे
धडपडीत जगण्याच्या, फोडुनी ढोपरे
क्षणभंगूर अस्तीत्वाच्या जाणीवणेने;
नाकारतो नव्याने भरलेले कापरे