Wednesday, June 14, 2017

गुरुमंत्र

कधी खावे लाडू 
कधी खाव्या वड्या
कधी खाव्या खूप छड्या
सतत कराव्या काही ना काही काड्या
मज्जा येईल गड्या
म्हणतो गुरुजी जाड्या 

Saturday, June 10, 2017

चहा प्रेम

चाय चाय चाय
मुक्तपणे घालतो साद
घ्या आस्वाद मनमुराद
न मांडता उच्छाद
आवडल्यास द्या दाद
नाही तर सोडा नाद 
प्या कॉफी, आणि व्हा बाद 

पिल्लू

हुंदडते, बागडते, सगळ्यांना हसवते
चिडते, रागावते,  सगळ्यांना रडवते
पळते, धावते, सगळ्यांना खेळवते
पिल्लू आमची सगळ्यांना आवडते   

Thursday, June 08, 2017

लबाड रोमियो

खोटच सांगतो खरं सांगत नाही
तुझ्यावाचून माझं पान हालत नाही
पान सोडून कशाचं व्यसन नाही
अन तुझ्याइतकं माझं कुणीच नाही
खोटं सांगतो, खरं सांगत नाही ....

Wednesday, June 07, 2017

एक होता उंदीर
त्याने बांधले मंदिर
मंदिरातला देव मांजर
पूजारी कुत्रा नेहमीच हजर

मांजराला हवा नैवेद्य उंदराचा
पुजाऱ्याला तोडायचा लचका मांजराचा
प्राण्यांच्या अन्न साखळीत, भक्त होता कच्चा
वर वर दिसला जरी लुच्चा, आतून होता तो सच्चा

श्रद्धा पडली खिळखिळीत
उंदीर, मांजर आणी कुत्रा; सगळ्यांचीच बसली दातखिळी 

रोडसाईड रोमियो न. २

फाटला खिसा; आटलं प्रेम
आजकालच्या तरुणींचा नाही काही नेम
म्हणत्यात- 
पूर्वीसारख भरत नाही पोट, खाऊन फक्त चार फुटाणे
खिरहि लागत नाही चविष्ट, नसतील त्यात जर बेदाणे
हे घे चाराणे, तूच खा चणे, मी शोधते नवा फास्टर फेणे

Tuesday, June 06, 2017

शंका

एकांतातल्या त्या उत्कट क्षणानंतर
आतुरतेने पाहता पाहता वाट,
कशी काय लागली आपली वाट
मी अजूनही पडलो आहे चाट

वाहता वाहता प्रेमाचे पाट
आटले कसे काय भरलेले ताट
ताटाखालचं बनून मांजर
दाखवायचे अजून किती गाजर 



Sunday, June 04, 2017

घाण्याचा बैलोबा

मोजकेच दिवस माझे
मोजण्यात किती खालावू
ज्योत मालवण्याआधी
अजून किती तेल ओतू?


दैनिक दैनंदिनी

दैनंदिनीने केले दीन
उत्चृंकलतेने (impulsive) आयुष्य सुखासीन
रोजची शिस्त, बनवते भिडस्त
थोडीशी बाळगून बेशिस्त
जगा होऊन मस्त
प्राणदेवतेचा राहिल का सतत वरदहस्त?

थोडक्यात

थोडी गंमत, थोडी चेष्टा
थोडा काम, थोडा आराम
थोडा थोडा, थोडं थोडं
थोडक्यातच मिळतो विराम

समय

रातकिड्यांची किरकिर
कोल्ह्यांची कोल्हेकुई
नवराबायकोंची भांडणे
तर काळ्याभोर रात्रीतलं चांदणे
जो समान स्थितप्रद्यतेने चालवतो 
तो समय, म्हणजेच काळ.

Thursday, June 01, 2017

जमाखर्च

गाईस पोसतो चारा
पंतंगास उडवितो वारा
निसर्गाचा खेळ न्यारा
रवीच चालवितो संसार सारा
तरी का बोबंलतो जमाखर्च मानवाचा?

रोग

प्रेमाचा आला होता योग
मग झाला रागाचा रोग
नियतेनेच दिला विचीत्र भोग
कुणास ठाऊक कसे येतात असे योग