Monday, July 24, 2017

पाद

मला लागला तिचा नाद
घाताली मी तिला प्रेमळ  साद
अचानक घुमला नाद
सोडला होता तिने जोरात पाद
एवढाच काय झाला आमचा संवाद
त्यानंतर फक्त वाद, 

Sunday, July 23, 2017

परंपरा

केळाच्या पानावर जेवले केळवण
नवयुगलाला आहे पारंपारीक वळण
म्हणे आवर्जून पाळू सगळे सण
भरू ओटी, देऊन नारळाबरोबर जरीचा खण

Monday, July 17, 2017

स्त्रीशक्ती

कला कला ने घ्यायची कला
तू लवकरच शिकून घे रे बाला
अबला म्हणवणार्या सबला ललना
फार काळ न भुलणार तुला

तपास

करडा सरडा आणी वाकडा खेकडा
कंबोडियन कोंबड्यास विचारतात
मंगोलियन मुंगळा कसा असतो?
तो म्हटला, बंगाली बगळ्याला विचारतो
सालस सालमनला तो मंगळवारी मुंगळे पुरवतो

Sunday, July 16, 2017

वाटचाल


जन्मानंतर मृत्यू, नाही गत्यंतर
आनंदाने कापावे हे अंतर
विचाराने या झाले हृदयांतर
आता फक्त
जंतर मंतर, जंतर मंतर, जंतर मंतर 

कचरा

कधी काळी,
शेकडो खेकडे चालत होते वाकडे
मधूनच धावत होते करडे सरडे
घसे कोरडे, शीत पेयांने भरत नरडे
बघतां बघतां नर नार्यांनी
समुद्रकिनारी पसरविले ऊकिरडे

Sunday, July 09, 2017

तंटा

आमचं आपलं असच
सतत वटवट, जरी ज्ञान अर्धवट
वृत्ती खवचट, त्यांतून स्वभाव तापट
डोक्याला नुसती कटकट, सतत आदळआपट

Monday, July 03, 2017

कहाणी: राजा राणी

(needs more work)

राजाचं झालं लग्न
शृंगारकीडीच्या विचारात होता मग्न
अचानक चावले खूप डास
पलंगावर लावली मग त्याने  मच्छरदाणी खास
ठुमकत ठुमकत आली राणी
राजाच्या तोंडचं पळालं  पाणी
लगेच जाहीर केली त्याने आणीबाणी
राणी होती फारच गुणी 
राजापेक्षा जरा जास्तच शहाणी
राजाला म्हणाली, मी घासते भांडी तू  धु धुणी
हीच घर घरची कहाणी, हीच घर घरची कहाणी



राणी म्हंटली माझी नजर तिरकी
तुझ्याच भोवती घेईन गिरकी
जरी मी काणी, तुझ्यापेक्षा मी शहाणी
छप्पन काळामध्ये मी गुणी

===
राजाचं झालं लग्न
शृंगारकीडीच्या विचारात होता मग्न
अचानक चावले खूप डास
पलंगावर लावली मग त्याने  मच्छरदाणी खास
ठुमकत ठुमकत आली राणी
राजाच्या तोंडचं पळालं  पाणी
लगेच जाहीर केली त्याने आणीबाणी
हात जोडून म्हंटलं आता बास, आता बास
येतोय खूपच वास

सलाह

प्रकृतीका नियम है
जहा आनंद है, वहा दर्द भी है
जहा दर्द है, वहा ईलाज भी है
और जहा ईलाज है, वहा नाईलाज भी है
समझो, सहो और छोड दो, आनंद होगा

मी रुक्ष

मी रुक्ष,
हातात रुद्राक्ष, तोंडात द्राक्ष
दारात वृक्ष, सगळ्यालाच साक्ष
मी रुक्ष
समोर भक्ष, वृत्ती सापेक्ष
सतत दक्ष, गाठणार लक्ष
मी रुक्ष
मी चाणाक्ष, राहतो निरपेक्ष
अपेक्षा, उपेक्षा फेटाळून
सगळ्यांवर ठेवतो लक्ष
मी रुक्ष
हजारो पक्ष, मी नि:पक्ष
लढवितो निवडणूक
सगळ्यांचं माझ्याकडेच लक्ष
मी रुक्ष

पापी पेट

पापी पेट, पापी पेट 
पापी पेट भरनाही 
पूण्य का काम होता है
पूण्य कमानेके लिये 
मूरतपे दूध गवाना 
पाप का काम होता है

दलदल

कधी टाळले, कधी कवटाळले
कधी फेटाळले, कधी आळवले
विचार मनीचे तरी पिसाळले
चारोळीने शमवले

Ebb and flow

Ebb and flow; Ebb and flow
It's just a tide 
I am in for the ride 
Can't stay bide
It's me, it's me
No more snide
I have nothing to lose or hide
I am going to ride
Ebb or flow, it's just the tide
I am going to ride, I am going to ride....
Before they say - "He died"!!

Seashore Camping

आंबट हिरवी फोडलेली कैरी
त्यांवर लोणच्याचा मसाला भारी
जोडीला खरपूस भाजलेली भाकरी
खाऊया चवीने मस्त, समुद्रकिनारी

मौका

चलती का नाम गाडी
रूक गया वो अनाडी
मिला है मौका, मारले बाजी
सब करेंगे फिर हाजी हाजी

विजेता करंडक

करून मस्त करमणूक
कोहलीस देण्यास चषक
पाकिस्तानने धाडले ११ विदूषक
भारतच जिंकणार नाही काही शक
अंतिम सामना आहे निरर्थक

स्पष्टवक्तेपणा

एक होतं माकड
बोलतसे परखड
घुबडाला म्हटलं, "ए घुबड"
त्याच रात्री घुबडाने माकडाला मारली
काडकन झापड

चालता चालता

शरीराचं थांबवायचं असल्यास प्रसरण
चालून चालून धमण्यांच करावं आकुंचन 
वाढेल रक्ताभिसरण, थोपवेल मानसिक घसरण
शांत होईल डोक्यातलं विचारमंथन
दैनिक शतपावलीस पुरेसे नाही का ईतकेच समर्थन?

हत्ती आणी मुंगी

हत्तीने नेसली लुंगी
लुंगीत शिरली मुंगी
मुंगीने घेतला चावा
हत्ती केकाटला
धावा धावा, मला वाचवा

कुत्रा मांजराची मैत्री

एक होता कुत्रा, तो फारच भित्रा
मांजर म्हटल, मांजर म्हटलं
घाबरु नकोस मित्रा
दुनिया आहे, फक्त गमतीदार जत्रा

चर्हाट

मातीतूनी जन्मला
घूरापरी हवेत विरला
कूणी सगळाच पूरला
क्षणात सारा समाज विसरला
असली किर्ती कितीही अफाट
जरी बरेच पडले तुमच्यामुळे चाट
तुमच्या काळरात्रीनंतरहि
होईलच नवी पहाट
जगाचे चालेलच चर्हाट

भक्तियोग

दासबोध वाचला
पण बोध नाही काही झाला
रामनामाचा करूनी गजर
दरोडेखोर वाल्याचा वाल्मिकी झाला

धावपळ

धावपळ, धावपळ, उसंत नाही पळभर
प्रथमप्रहरी माकडापरी खातो केळ
हेलपाट्यामध्ये जातो खूप वेळ
अंतरीचा प्रकटताच कोलाहल
सासू म्हणे, हल ... हे फक्त मनाचे खेळ

कू कुच कू कू कुच कू

कू कुच कू कू कुच कू
माझ्या हाती लागलं धनुष्य
बाण कुठे कुठे मारू
कू कुच कू कू कुच कू
माझ्या हाती लागली हातोडी
खिळा कुठे कुठे ठोकू
कू कुच कू कू कुच कू
माझ्या हाती लागली कुदळ
खड्डा कुठे कुठे खोदू
कू कुच कू कू कुच कू
माझ्या हाती लागली दोरी
मी काय काय बांधू
कू कुच कू कू कुच कू
माझ्या हाती लागली सुरी
कांदा किती किलो कापू
कू कुच कू कू कुच कू
माझ्या हाती लागली शिडी
मी कुठे कुठे चढू
कू कुच कू कू कुच कू
माझ्या हाती लागलं पॅराशूट
उडी कुठून मारू
.......
कू कुच कू कू कुच कू
माकडाच्या हाती लागलं कोलीत
माकडाला बंद करा खोलीत

मांसाहारी मित्र

ठेमसी, तोंडली, भेंडी, दूधी, वांगी
भरवून भरवून मसालेदार भाजी
मांसाहारी मर्दाची वहिनीने तोडली नांगी
ईच्छाशक्ती तिची खरच फारच दांडगी
गवताची भाजीदेखील लागते आता त्याच्या अंगी

चहाप्रेमीची प्रेमळ बायको

लागताच माझी चाहूल
चहासाठी फुंकून फुंकून पेटवली चूल
कानातले हलत होते डूल, बखोटीत मुल
छोट्याश्या झोपडीतही
माझी राणी दिसत होती एकदम कूल
वाफळणार्या चहाबरोबर, दिली तिने मलाच हूल

sinister

monster is sinister
shut it in a canister
throw it away minister
or it will bring disaster

झुंज

साप वळवळला, मुंगुस कळवळला
मुंगसाने तोडला लचका, साप त्वेषाने फुत्कारला
जुंपली जीवघेणी झुंज, हादरणार जंगल एैकून गुंज
विजयाची किंवा शेवटची,जीवनाची लढत निकराची

द्वंद्व

मी खोटं बोलत नाही 
खरं सांगत नाही 
रात्री झोपत नाही 
दिवसा जागत नाही
जगता जगता मी मरत नाही
मरुन मरुन मी जगत नाही

Sunday, July 02, 2017

अर्धवट

शब्दांशी करून संगनमत, मांडतो मी माझं मत
खुल्या मनाने ऐकणाऱ्याचं करतो मी स्वागत
कुजक्या वृत्तीच्या लोकांची नाही धडगत
गुण्यागोविंदाने रहा एकत्र, ह्यावर करा एकमत
हिंदू मुसलमान शीख इसाई, धर्म ठेवा घरी
भारतीय नागरिक बाहेर

मतलबी समाजची नाही धडगत
मोदींच्या
अर्धवट

ऊन

बाहेर उन्हाचा चटका
घरी थंड पाण्याचा मटका 
निर्णय सोपा पिऊन पाणी
शांतपणे झोपा दोन घटका
संध्याकाळी खेळण्यास सटका

गणित

गणिताने शिकवला गुणाकार
गुणांना आला आकार
स्वप्ने झाली साकार
छपराखाली भिंत, भिंतीला दार
दारासमोर कार, सगळा गणिताचाच चमत्कार  

वटपौर्णमा

गालिगात्र होतात सगळेच 
यमाने पहाताच डोळे वटारून
जपलेलं आयुष्यभर आयुष्य
क्षणांत देतात झुगारून
असते एखादीच खमकी सावित्री
सत्यवानास आणते परत, यमास मारून मुटकून


धुप

मंडळात होती मंडळी खूप 
थोडीशीच होती कामाची 
जणू देवा पुढं ची धुप 
जळतानाही दरवळवतो सुगंध 
पसरवी आनंद; नसतानाही काही संबंध

राडा

उगाच का रडा, का उगाच रडवा
नाही त्यात काही गोडवा
कुणी कशास कुणास अडवा
ज्याला जे वाटेल ते त्याने घडवा