मी रुक्ष,
हातात रुद्राक्ष, तोंडात द्राक्ष
दारात वृक्ष, सगळ्यालाच साक्ष
हातात रुद्राक्ष, तोंडात द्राक्ष
दारात वृक्ष, सगळ्यालाच साक्ष
मी रुक्ष
समोर भक्ष, वृत्ती सापेक्ष
सतत दक्ष, गाठणार लक्ष
समोर भक्ष, वृत्ती सापेक्ष
सतत दक्ष, गाठणार लक्ष
मी रुक्ष
मी चाणाक्ष, राहतो निरपेक्ष
अपेक्षा, उपेक्षा फेटाळून
सगळ्यांवर ठेवतो लक्ष
मी चाणाक्ष, राहतो निरपेक्ष
अपेक्षा, उपेक्षा फेटाळून
सगळ्यांवर ठेवतो लक्ष
मी रुक्ष
हजारो पक्ष, मी नि:पक्ष
लढवितो निवडणूक
सगळ्यांचं माझ्याकडेच लक्ष
हजारो पक्ष, मी नि:पक्ष
लढवितो निवडणूक
सगळ्यांचं माझ्याकडेच लक्ष
मी रुक्ष
No comments:
Post a Comment