Sunday, August 27, 2017

निशाचर

अंधाराचे आम्ही सोबती
मशालीसम भासते आम्हास उदबत्ती
घुबड आमुचे कुलदैवत
वटवाघूळास घालतो साकडे
निशाचरच आम्ही, सततच
काही ना काही वाकडे तिकडे
 

Friday, August 25, 2017

निवासातला प्रवास

तरुणाईत एकच ध्यास
असावा हक्काचा निवास
प्रत्येकाची हीच एक सतत आस
बघता बघता झाला विकास
खोपट्याइतका  का होईना छोटासा निवास
त्यात चहाच्या घुटक्या घेत निवांत वास
अचानक झाली जाणीव खास
जीवन आहे फक्त प्रवास
जाता जाता आपल्या हातात फक्त प्रयत्नांची कास
 


Sunday, August 20, 2017

वीस

तो होता कुबड्या खवीस
तिचं वय वीस एकवीस
तो म्हटला तूच मला हवीस
ती म्हटली, आधी मारून दाखव दंडबैठका वीस
त्याचा जीव कासावीस
ती म्हटली चल फूट ४२०

Saturday, August 19, 2017

निशा

आकाशात होते अनेक तारे
काळे ढग पुरून उरले
आसमंत पुरे काळवंडून टाकले
तप्त तारा- रवी उगवला
दुभंगून आसमंत प्रखर तळपला
फुसके ढग सारे; कोसळून पडले
बघे भिजूनि त्वरित पळाले

आठवण

तुझ्याबरोबरच्या प्रत्येक क्षणाची
करायला हवी होती साठवण
वणवण भटकूनहि मिळत नाही आता तसली आठवण
पडला पाऊस कि येते तुझीच आठवण
बदलली कूस कि येते तुझीच  आठवण
काहीही झालं कि तरी येते फक्त तुझीच आठवण
मला सांग आठवणींच्या ऐवजी, आठवणींच्या ऐवजी
तूच का नाही कधीच येत?



तुलना

जशी
लुकड्या हत्तीचीही सोंड सापापेक्षा जाड असते
जशी
बुटक्या जिराफाचीही उंची, उंच उंटापेक्षा जास्त असते
जशी
लंगड्या चित्त्यापुढे वेगवान गाढवाची गती कमीच असते
तशी
वैचारीक माणसापेक्षा माकडचाळे करणारी माकड जातच सुखी असते

dismay

Yet another day
Spent finding needle in the hay
Seeing the world in dismay
Longing to leave the bay
I have nothing more to say

Seattle Smog

बघा पटतोय का माझा दावा
एकवेळ जगण्यास नको हवा
पण चहा मात्र हवा

समाजकंटक

समाजकंटकांचा झालाय सुळसुळाट
त्यातून राजकारणी देतात पळवाट
सुरक्षिततेचा उगाच का घातलाय घाट
विमातळवराचा बघून फाफट पसारा
मी नेहमीचं पडतो चाट

मानसिक चपराक

भयाण शांतता कोकलू लागली अचानक
माझेच मत मलाच सांगत होती नाहक
भग्न मती झाली मग्न, वेळ गेला हकनाक
काल्पनिकतेला उरला नाही अस्तित्वाचा धाक

खुळ

चंचल मनाचे चावट खेळ
चटपटीत शरीर, त्यातून फुकट वेळ
तळ्यात मारली उडी, गाठला तळ
जलपरीला बघून ह्रदयात आली कळ

Monday, August 14, 2017

धावपळ

न काही दिशा ना काही मार्ग
उर फोडुनी आम्ही धावणार
धावता धावता मारणार 
मेल्यावर मात्र नक्कीच स्वर्ग गाठणार

Sunday, August 13, 2017

पेयांचे वर्गीकरण

हवा हवासा वाटतो तो चहा
पुन्हा पुन्हा प्यावासं वाटतं ते पन्हं
फिदीफिदी हसताना पितो ती काॅफी
गालातल्या गालात हसून चघळयाची ती टाॅफी
आणी खलबत करतांना प्यायचं ते सरबत

पोलिस, पोलशिण

तूच माझी खरी सखी
नकोस बांधू मज राखी
रंगेबीरंगी वृत्ती, दडवली गणवेशात खाकी
तुझ्याविणा उरतेच काय बाकी

बासुंदी

 बासुंदी
========================
दूध ताप ताप तापवलं
उकळी आल्यावर अजून थोडं उकळलं
करपण्याआधीच कमी केली आच
जाचातून असल्या जात जात
आटलेल्या दुधाची झाली बासुंदी 

उदासीन

Disclaimer: it's dark. 
=================
उदासीन
=================
नकार घंटा, घण घण घण
चिंतेचे ओझे हजार मण
करत नाही साजरा कुठलाच सण
आनंदाने वेचतो दु:खाचेच क्षण
क्षण क्षण मरतो, कण कण कण
नकार घंटा घण घण घण

Friday, August 11, 2017

शुक्रवारच्या शक्यता

कर थकले करून करून काम
नोकरीपरी सगळेच लाचार
आधीच थोड़ा पगार
त्यातून कर कापणार सरकार
वाढत्या महागाईने मध्यमवर्गीय गार
मूग गिळून गप्प बसणे, हेच का आपले संस्कार
चला भिनवू थोडी वृत्ती बेदरकार
पडूया चाकरीच्या चाकोरीतून बाहेर
हेरूनिया संधी, करुयाकी आपण थोड़ा व्यापार
आपल्या जीवनाला आपणच देऊ आकार
तरच होतील स्वप्ने साकार

Thursday, August 10, 2017

ताक

तिला आवडत नाही ताक
पिताच थोडंसं, वाहू लागतं नाक
शेंबड्या सर्दीचा सतत धाक

Sunday, August 06, 2017

पक्षी

कबूतर पोपट कावळा चिमणी
सगळण्यांनाच लागतो दाणा पाणी
माणसाचाची वृत्ती माणूसघाणी
वृक्षतोड करून निमार्ण करते आणीबाणी 

आफत

जब थोडी थी फुरसत, प्यार किया था बहोत
लाजवाब थी वो, दिखाती थी करामत
जगाती थी ऐसी चाहत, पर हमेशा लाती थी आफत


Saturday, August 05, 2017

चारोळी

लिहावी एखादी चारोळी
म्हणून लिहिलं ओळ पहिली
ओशाळणून तिला देवाला वाहिली
लिहिता लिहिताच झाली चारोळी