Saturday, September 02, 2017

नशाबंदी

बिडीचा धूर, शमवी मनातला काहूर
पेल्यातली दारू, थांबावी हृदयातली हुरहू
नशा कुठचाही,  बंद करी मेंदूची कुरकुर
स्वास्थ्याची कशाला करा चिंता
आपणच आपली जर रचतो चिता

टॅक्सी ड्राइवर

थोडी तंबाकु थोडा चुना
स्वस्थ ठेवी माझ्या मना
तोंडात भरला मस्त बोकणा
निवांत ऐकतो कोणाचाही ताणा बाणा 

ता ता थय्या

डोक्याला सतत चिंता
मनातला सुटेल कसा गुंता
आयुष्य म्हणजे जणू स्थानवेळेचा खलबत्ता
मन:शांती हिच खरी सुबत्त्ता