Saturday, December 09, 2017

बेधडक, दे धडक

गनिमत है जो मेरे फेफडे वफादार निकले
हर घडी सास लेकर, मुझे फिरभी जिंदा रखते है
बगावत तो मेरे धोकेबाज दिल ने की है
जो हरवक्त तुम्हारे लियेहि धडकता है

मंत्रमुग्ध

स्वप्नपरी तू, तूला वंदन
तूझ्यापरी चाले ह्रदयाचे स्पदंन
परीसस्पर्श तूझा, करी वनाचे नंदनवन
नंदनवनात कवटाळून मिठीत
करतो तूझे त्रिवार अभिनंदन

संगती

आकाशातून पडला थेंब
जमिनीत मुरला, वृक्षरुपी उरला
आकाशातून पडला थेंब
तळ्यात साठला, तृश्णेस कामी आला
आकाशातून पडला थेंब
गंगेत वाहला, मृतात्म्यास सद्गती देऊ लागला
आकाशातून पडला थेंब
समुद्रात मिळाला, रुद्ररूपी सुनामीने उलटला

कुणाचे ओझे, कुणाच्या खांद्यावर

समुद्रात मासे हजार
कोण बुडेल, कोण तरेल
या चिंतेने मी बेजार
चिंतनाचाच झालाय आजार

कलह

दडवली तोंडाची वाफ फुकट
डोक्यास सतत कटकट
कुणास वाटे वृत्ती तापट
कुणी म्हणे, मीच हलकट
तोडूनी सगळे पाश
जगता येईल का बिनबोभाट?

वणवा

आसमांत काळवंडला
सुर्योदय मवाळ, धडपडला वणव्याच्या चरणी
निसर्गाचा हा चमत्कार राहिल सदा स्मरणी
जणू वातावरणावरच झाली करणी
चला करूया पावसाची मनधरणी -
वरुणदेवा लवकर कर आकाशवाणी
बकाल वातावरणाची कर बोळवणी;
बरसूनी पाणी

९/११

रागासारखा नाही अजातशत्रू 
संगतीने त्याच्या दुःख झाले जिवलग मित्र 
राग, लोभ, द्वेष, हिंसा सर्वत्र 
शैतानानेच जणू रचले षडयंत्र
बनवून रागास मानवतेचा अजातशत्रू

पपई

शनिवारच्या सकाळी गजबजली मंडई
मंडईतून आणली भली मोठ्ठी पपई
पपई खाण्यास परसात पसरली चटई
खाता खाता सुस्तावली मंडळी, लगेच केली गाई गाई

भ्रमंती

प्रयत्नांची धरून कास
केला खूप प्रवास
वेगवेगळ्या अनुभवांची आस
बघतां बघतां गेला वेळ छकास

अनूभूती

प्रत्येक गोष्टींला असतो अंत
जाणतो जे, तोची महंत
अंतालाहि असतो अंत, 
त्यानंतरहि उरतो जो, तो अनंत
जाणतो जे तोची संत
जगा खुशाल, न ठेवतां काहि खंत
महत्त्वाच्या गोष्टींसाठी नेहमीच ऊसंत

गडबड गोंधळ

आतडी भरतां भरतां 
पिळवटली कातडी
जगण्यासाठी,
आयुष्याची झाली नासडी

Ground Rules!

मन:पटलावर ह्रुदय लिहिणारच
एकमेकांबद्दल गैरसमज दूर होणारच
कुठल्याही परीस्तिथीतून मार्ग निघणारच
खेळ खेळत रहा, मुलभूत नियम ठरलेलाच
सूर्यास्तानंतर, सुर्योदय हा होणारच

गम्मत

कल्पनेत मी गुंग, भरले मस्त रंग
वातावरण कुंद, दरवळला सुगंध मंद
थरारले अंग, क्षणात मी दंग
क्षणिक स्वानंद, नि:शुल्क छंद

बदमाश

इकडून तिकडे, तिकडून ईकडे
धांगड धिंगा, गडबळ गोंधळ
जणू अंगात शिरली हजार माकडे
चेहर्यावर तरी भाव भाबडे

Amendment

हा नाही खेळ ऊनपावसाचा 
जीव जातो मानवाचा 
चला फोडूया विषयाला वाचा 
वाचुनिया पुन्हा हक्क मानवाचा
जगण्याचा हक्क मूलभूत,
मग दुरुस्ती (Amendment) पहिली, दुसरी

वक्तव्य

मी तुझाच भक्त
करण्यास माझा भाव व्यक्त
धरले मी नक्त, 
नको होऊस ईतकी सक्त
मिठीत ये फक्त

अनुपस्थित मन

आपलं एकच डोकं
त्यात किती भोकं
भोकातून गळले विचार
सुसंगत नाही आचार


वचन

अजून खूप खूप धावायचे
धावता धावताच सोसायचे
सोसता सोसताच हसायचे
काहीही झाले तरी
हसतां हसताच मरायचे


मानवाची कल्पकता

भयाण रात्र, कजाग दिवस
त्यातून वखवखलेली हवस
काळी जादू, चेटकिण, राक्षस
हे सगळं साधण्यास
हैवानाचाही लागत असेल कस
पण, पण .....
माणूसमात्र साधतो हे क्षणात
मनात धरतो जेव्हा तो आकस

हसा चकटफू

अंगविक्षेप, शाब्दिक विनोद, 
संवादाची अचूक फेक
प्रत्येक समेवर पडणारच टाळी
हसा चकटफूची भारीच धमाल
हसून हसून दुखले गाल
प्रेकक्षकच काय, अहो खदाखदा हसत होती
भितींवरली अमेरीकन पाल

वेसण

सततीची कुरकूर 
शंकांचे उठले काहूर
वाढली मनाची हूरहूर
विचारांचे आसूर गाऊ लागले भेसूर


सुखी जोडपे

लग्ना आधीच घ्या खालील आणा भाका
कुणाच्या हातून घडल्या जरी कितीही चुका
मारा ऐकमेकांना बेदम, हाती घेऊन दंडूका
पण तोंडाचा वापर, फक्त घेण्यासाठी मुका
मतितार्थ: शब्द वापरा जपून, प्रेम करा भरपूर

भटकंती

चुकलो वाट, हरवली दिशा
वेगाने धावण्याची होती मस्त नशा
घावलो कितीही जरी
गुंडाळावाच लागणार होता गाशा
नव्याने बघावा म्हणतो नकाशा


शीतयुध्द

मनात सतत सल
शांततेचाही कोलाहल
ज्याचंत्याचं वेगवेगळ दल
सौजन्यशिलतेचा नाही कल

Being human

मेंदू, मणका, कवटी
यात वसते भूताटकी
जोडीला नसली जर माणुसकी

पहाटेचा यक्षप्रश्न

झाली लवकरच आज प्रभात
अजूनही चंद्रच तळपतोय नभात
कोरड पडली घशात
चहा करु मी कशात?

निश्चिंत

जन्मोजन्मीच्या आपल्या गाठी
जरी बुध्दि माझी नाठी
जादुचीच आहे तुझी मिठी
नक्कीच ओलांडणार या जन्मी साठी
न आणता कपाळावर एकही आठी