Tuesday, February 13, 2018

ओलेचिंब

अनुभवले पावसाळ्यामागून पावसाळे अनेक
न घेतां एकही छत्री
भिजून, भिजून होईल सर्दी
नाही असली वृत्ती भित्री
भिजलीतरी सुकणार नक्की
हि नेहमीच असते पक्की खात्री
बरी होणारं सर्दी
खाऊ लागताच संत्री

चला थंडीची उडवूया टर

शनिवारच्या संध्याकाळी कोण पडली होती थंडी
मी घातला लोकरीचा मस्त स्वेटर
केला चहा ऐक लिटर
रिक्षावाल्याला म्हटलं टाक मिटर
तडक गाठ थिएटर
Watching movie, is certainly better
Than seating at home and सोलिंग मटर

तोकडा

शब्दसंग्रह मोडका तोडका
त्यातून जीव भाबडा
भावना व्यक्त करत करतां
मेंदूचा पडतो तुकडा

सर्दी

सर्दी खोकला, गोष्ट सोपी
हळद घालून दूध पी
छाती, पाठीवर Vick’s चोपी
घालून माकड टोपी
लवकरच जा झोपी

Anniversary special

जरी लग्नाला झाली वर्षे आठ
कधीच फिरवली नाहिस तू माझ्याकडे पाठ
असेच प्रेमाने सतत टेक ओठांवर ओठ
सुखात जातील तुझ्यामुळेच, पुढंली वर्षे साठ
दोघे मिळूनी सांगू मग सगळ्यांना, करून मान ताठ
लग्नाची खरोखरच असते पक्की गाठ

कपटी कागद

कागदांचेच आहेत हे कपटे
का करावे त्यासाठी कपट
नका बाळगू वृत्ती तापट
कागदांच्या कपट्यांसाठीतरी
उडूवू नये कोणाबरोबरच खटके

कागदांचे कपटे

कागदाची केली होडी, सोडली पाण्यात 
मजा आली थोडी
कागदाचं केलं विमान, उडवले हवेत
गेला अजून काहि काळ मजेत
कागदावर असच लिहून काहीतरी
खर्चून मी हक्काचे माझे कागद, छापले मीच माझे पुस्तक
चिंता नाहि आता, जरी काळाने दिली दारावर माझ्या दस्तक

सुट्टी

यंदाच्या सुट्ट्यांचा मस्त आहे बेत
काहींनी करावी कागदाची होडी, सोडावी पाण्यात
काहिंनी करावी कागदाची विमाने, उडवावे हवेत
ओरेगॅमीमध्ये वाटू लागेल गोडी, वेळ जाईल मजेत

निश्चय

चला करूया निग्रह
वर्तनात नको पुन्हा पुर्वग्रह
आपोआपच फिरतील ग्रह
यापुढे, फक्त चांगल्या क्षणांचाच (आठवणींचाच) करूया संग्रह

भेळ

भेळेचा बेत ऐकून सगळ्यांनाच येतो चेव
आंबटगोड चटणी, जोडीला चुरमुरे, तिखट शेव
कांदा, टमाटा, कोथिंबीर बारीक चिरून ठेव
जमलं तर ठिक, नाही तर
तयार भेळेच्या पाकिंटांच फूटलय कि पेव

अपूरे

मोकळ्या हवेतहि आता गुदमरतो जीव
माझीच मला येऊ लागली कीव

हिंसक प्रतारणा

कवटाळणारी प्रियसी तू
कवटाळता कवटाळता
का बरे लागलीस टाळू?
टाळके माझे लागले सणकू
मी माझाच मला अजून कितीदा भोसकू?

बेईमान

जरी मी कितीही दूर
आठवणींनी तुझ्या भरून येतो ऊर
हाक दे फक्त, हाक दे फक्त
येणार नाहीच, पण “ओ” देईन जरुर

आधुनिक जिवनशैली

दुभंगलेल्या मनात भंगलेले विचार
सतत चाकोरीबध्द दैनंदिन व्यवहार
जोडीला सुमार आहार
आजारी नाही पडणार
तर अजून काय होणार?

निसर्ग

नकोस मानवा रचू फुकट अवडंबर
जिथे, फाटताच डोक्यावरचे अंबर
वसुंधरेचीहि तुटते कंबर
बाळग वृत्ती थोडी सोंबर (somber)
निसर्ग क्षणात फासेल तोंडावर डांबर

तात्कळवणारा हव्यास

वाट पहातो घेऊनिया तळहातावर घेऊन शीर
हे नियती, अजून किती करशील उशीर
धरतां धरतां धीर, चाखण्यास खीर
जीभ होऊ लागली बधीर

मराठी भाषेतली गम्मत

==============
१) वाचा , चावा
२) कान , नाक
३) जीभ , भजी
५) चेव , वेच
६) चव , वच
७) चाट, टाच
८) कूच , चूक
९) चेप , पेच
१०) चार, रचा
११) पाट, टाप
१२) तवा, वात
१३) ....
==============

बाणा

विजोड मोजे
त्यांवर फाटके जोडे
तुडवत वाटेतले दगड धोंडे
गाडले अटकेपार आम्ही झेंडे

वावटळ

आधीच वृत्ती टवाळ
त्यात उठते वैचारीक वावटळ
जोडीला सतत शारिरीक धावपळ
कधी वाटते
बसल्या बसल्या फाटल्या चड्डीला लावावे ठिगळ
तर कधी वाटते
व्यामशाळेत जाऊन वाढवावे बळ
का सोडून सगळं
घेऊन माश्याचा गळ,
गाठावा थेट महासागराचाच तळ
अचानक डोक्यात भारीच खुळ
म्हणे वाजवत बसु मंजूळ शीळ
चुळबूळ तर कधी खळबळ
जोपर्यंत धमन्यात वाहते रक्त सळसळ
मनाला राहील सतत काही ना काही चळ