Friday, April 06, 2018

बाणा


================
विजोड मोजे
त्यांवर फाटके जोडे
तुडवत वाटेतले दगड धोंडे
गाडले अटकेपार आम्ही झेंडे

चिरतारुण्य

हाडंही होऊ लागली ठिसूळ
साखरेऐवजी चहांत पडू लागला गुळ
बचळी सांभाळावी लागतेय, भरतां भरतां चूळ
कधी जाईल डोक्यातलं खुळ
सतत आपली चुळबुळ चुळबुळ

अंतर

दोन क्षणांमधलं अंतर
चालवी जीवन निरंतर
बाकी सगळं जंतर मंतर
कळलं कि लगेच छू मंतर

काटकसर


====================
अंधरूण पाहून जर पसरले पाय
तरच खाता येते दूधावरली साय
नाही तर दूधाची तहान ताकावर
अन् जीभ भाजली म्हणून
ताकावरही मारा फूंकर

खुशाल चेंडू

साकारण्यास स्वप्नास, पसरूनी पंख, घे आकाशी भरारी उंच
स्वयंरचित पात्राची भुमिकाच गाजवते आयुष्याचा रंगमंच
दिवसामागून दिवस ढकलून बनत नाही आत्मचरीत्राचा संच
जमेल ते अनुभव घे, भरेपर्यंत पोट टंच

अनुगच्छति प्रवाह

सद्सद्विवेकबुद्धीचा जाणवतो दाह
किती करावा म्हणतो मी उहापोह 
अनुगच्छति प्रवाह, आयुष्य होई सुखावह

गंमत

====================
दारू, मदीरा मद्य पीत पीत
वाचावे गद्य, लिहावे पद्य, तर गावे मंजूळ गीत
मी नाही कोणाला भीत
मनात आलं की, करतो लगेच प्रकाशित

केळ

घालवू कसा वेळ
माकडाला आयतेच मिळाले केळ
सगळंच वाटू लागलाय निव्वळ खेळ
कशाचाच लागत नाही ताळमेळ