Thursday, March 28, 2019

मन आणि आत्मा

चंचल मनास भारीच चळ
मारून सुर गाठतं सागराचा तळ
करुन उड्डाण मंगळावर समोसे तळ
कधी कधी फक्त टंगळ मंगळ
कधी बसतं निवांत टाकून गळ
गळ टाकून ओढावून घेतं धोके अटळ
टाळण्यास तेच धोके शिताफीने काढतं मग पळ
सतत भिरभिरतं शोधण्यास जतिजळ
कधी करतं निर्धार, पोसू देह पिऊन फक्त जळ
तर कधी खा खा करून वाढवतं छातीत जळजळ
तळमळीने मांडून विचार मेंदूवरही चढवतं मळ
व्यायाम करवून वाढवतं शारिरीक बळ
शोधून श्वासोच्छासां मधला पळ
त्यास दाखवतं हा गमतीदार खेळ

कणखर मनसुबा

कधीच मानू नकोस हार
वाटलं तर घे हाती पहार
अविरत करत रहा प्रहार
दगडातही सापडेल, वाहते पाणी निरझर
भिजवून टाक वाळवंट सहार
मग पाषाणातला देवसुध्दा
अभिमानाने घालेल तुलाच हार

होळीचे गुपित

होळीचे पसरले रंग
खेळात या सारेच दंग
भागवतां हौस खुळी, पिता पिता भांग
प्रसवताहेत पेरलेल्या प्रेमाचे कंद
बघूया छुप्या जोडप्यांचे फुटते का बिंग

Retirement: American dream?

जमेल तसं जमव
कमी पडलं तर अजून कमव
साठीयेईपर्यंत साठ साठ साठव
विचार मग वेळ गेला कुठे,
ते म्हातारपणी फक्त आठव

Sunday, March 17, 2019

हैप्पी वूमन्स डे (belated)

=======================
म्हणे स्त्री पुरुष समान
नवरा बसतो मूग गिळून गुमान
बिचाऱ्याच्या कंठास नाही फुटत वाचा
रोज रोज जरी जोर जोरात घेते ती चावा
=======================
p.s. : चारोळ्यांचा वास्तवाशी संबंध असतोच असं नाही

ढकलगाडी

आजही सूर्य उगवला 
आजही तो मावळणार 
दिवसांचे रकाने किती काळ भरणार 
स्वतःची स्वप्ने कधी साकारणार?

मनात मांडे

कुठचा करावा प्रकल्प 
आहेत खुपच विकल्प
परसातच पेरु का तरु कल्प
मग साध्य होईल सगळंच,
जरी हाताशी अवधी अल्प

सुस्ती

मनास माझ्या नाही सवय चैतन्याची
करतो मग नशा तर्हेतर्हेची
कधी खातो कच्ची मिरची
तर कधी उघड बाटली दारुची
लागली टाळी ब्रह्मानंदी की
लिहीत बसतो बादलीतली सुची

सुमार नाटक

ईकडेतिकडे सतत भटक
त्यामुळेच नवनविन अनुभवांची लागली चटक
गुंतवून ठेऊच शकत नाही आता कुठचंच नाटक
ईतर जरी बघत असतील ते लाऊन टक

अर्चना

कधी केला खूप तप
तर कधी केला खूप तपास
देवा, तुझीच सतत लागली आस 
श्रद्धा, भक्ती, अन विज्ञानाचीही धरली कास
आता तरी करशील का जीवन परीक्षेत पास?
जाऊ दे,
प्रत्येकच आळवून आळवून देत असेल तुला त्रास
शेवटी साधकापासून लपता लपता
आता तुझीहि होत असेल कि दमछाक
कंटाळलास तू कधी तर
व्हाट्स ऍप वर फक्त एक मेसेज टाक
लगेच भेटेन, मग पिऊ एकत्र चहा झकास

Sleepwalking

दिवसामागून दिवस येतो
येतां येतां लगेच जातो
जाता जाता रात्रही जाते
रात्रीबरोबर झोपही जाते
तरुणाईतही मग वार्धक्य येते

येरे येरे पावसा

अबब, केवढा हा हिमवर्षाव
वरूण राजे आप जल्दी आजाव
बाहेर जाण्याचा प्रश्नच नाही
बर्फापाई झाला सगळीकडेच मज्जाव
P.S. post “येरे येरे पावसा” on your FB, वरुणराजाला FBवरुनच कळवू.

वार्तालाप

प्रियकर:
मी सरळ वाट नागमोडी
तू दिसतेस किती सुंदर, नेसताच साडी
तूझ्यासाठी चढिन लग्नाची घोडी
पण...
लग्नानंतरही राहिल का आपल्यात ईतकीच गोडी?
प्रियसी:
लोणचं मुरल्यावरच, स्वादिष्ट लागतात फोडी
माझ्याबरोबर राहशील,
तर देवही काढणार नाही खोडी
पण ...
आत्ता लागलीय भूक, भेळ खाऊ अजून थोडी

Dedicated to birds fighting the snow

निसर्गाने फुंकला शंख
थंडीचा मारला डंख
ऊसने घेऊन त्राण पाखरा
झेप घे रे पसरूनिया पंख

अनुभव

क्षणक्षण मोजून घेतले शिक्षण
तेहि पडले कमी, घेतले मग प्रशिक्षण
पण उपयोगी आले जे ज्ञान
मिळाले होते ते घेऊन अनुभव विलक्षण

वायफळ

काय चालवलाय पोरखेळ
चारचौघात शब्दांची नुसती भेळ
विषय, अर्थ, चर्चा, नाही कशाचाच मेळ
अर्धवट काहीतरी लिहून, वाचून घालवताय फुकट वेळ
सगळ्यांना माझ्यातर्फे मानाचे केळ

सावळा गोंधळ

अवतीभोवती मंडळी जमली भंपक
जबरदस्त चालू होती भंकस
सहनशीलतेचा लागला कस
गीता समजून मंडळी जेव्हा वाचू लागली चंपक

गारठा

वातावरण खुपच थंडं
निसर्गाने जणू केले बंडं
मुश्किल आहे उकडणही अंडं
लावत बसा लेप, उगाळून वेखंड

भूकेचे नोकर

मेंदूतली विद्वत्ता करते पोटातल्या भुकेची चाकर
करते नाना क्लृप्त्या, मिळविण्यास फक्त भाकर
नसावा गर्व, नसावी शरम, करावे फक्त काम
थोड्या फार फरकाने सगळेच भुकेचे नोकर

प्राण्यांचे प्राक्तन

लुकडा हत्ती, बुटका जिराफ
आळशी चित्ता, शांत माकड
सरळ वळवळणारा साप
या सगळ्यांनीच केले होते थोडे थोडे पाप

तल्ल्फ

पानाला लावला काथ आणी चूना
कच्ची सुपारी, वर असमंतारा
भाड मे गया सारा जमाना
खाताच पान, मौसम झाला सुहाना

मुकी चारोळी

कल्पनाच मुळी मोजक्या
त्यातून शब्द रचना मोडक्या
येती नाकी नऊ, करता यमकाच्या वजा बाक्या
कधीतरी बोलतील या चारोळ्या मुक्या

अनुभव

मला नाही कशाचंच वावडं
मन माझं भोळं भाबडं
मेंदू जणू रीकामं डबडं
गोळा करतो विविध अनुभव फक्त
न घेतां कुणाशीही वाकडं

अघोरी पाप

आलेला क्षण दे घालवून
सुर्य काय, उद्या येईलच परतून
बेदारकारपणे पुन्हा दे त्यास हाकलवून 
गेलेले दिवस मोज फक्त बसून

अहंकार

हे माझे ते तुझे
हे आपले ते परके
हा भेदभाव मुळी न उरला
अहंकार ज्याक्षणी

लब्बाड

विचारायला हव होतं मी का तू
या विचारात रोजच जातं दुध ऊतू
ऊतु गेलेले दूध आटवते
तुझ्या नावाने बांसुदी करून मटकावते

गदारोळ

जपतां जपतां फुटला भ्रमाचा भोपळा
भोपळ्यात होत्या शंकांच्या बिया
बिया रूजल्या खोलवर
आवळ्याच्या बदल्यात दिला होता कोहळा

वार्षिक योजना

वर्षात दिवस तीनशे पाशष्ट
दोनशेसाठ दिवस करा कष्ट
उरले एकशे पाच दिवस,
चाखा मेजवानी चविष्ट
वार्षिक योजना माझी विशिष्ट

सद् गती

समय येताच अंतिम
गळून पडला मुखवटा कृत्रिम
क्षणात उघडले डोळे, दूर झाला भ्रम
जीवनसंगीताची हि तर फक्त एक सम

Interior decoration / ट्रफिकजाम

एकेक करून संपवा घरकाम
जरी मोजावे लागले भरपूर दाम
आपल्याच घरातच मग ईश्के जाम
बाहेर होणे दो फिर ट्रफिकजाम
उसका अपणेको क्या काम?

व्रात्य व्रत

गोगलगाईने घेतलं व्रत
म्हणे चढणार सह्याद्री पर्वत 
न घेतां कुणाचंच मत
धावत पळतच गाठलं शिखर

पापभिरू

देवापुढे जोडले हात
बायकोपुढे पकडले कान
खालमानेने करतो काम
त्यातच आपलं समाधान

टोमणे

शब्दांचे मारतो टोमणे
खाता खाता चणे फुटाणे
इतरांच्या तालावर नकोच ते नाचणे
स्वत:चे असावे खणखणीत असे नाणे

जुगाड

धाड धाड करूया जुगाड
होणारच नाही काही गडबड
करतो आम्ही फक्त बडबड
तडफडत तडफडत जगण्याची धडपड

ढकलगाडी

काही तरी कसं तरी
ढकलू गाडी पुढे
आजचा दिवस जगून संपवू
पुढचं पुढं पाहून घेऊ

अलबत

गोष्ट सांगतो अलबत
महासागर कापित निघाले गलबत
गलबतांमध्ये खलाश्यांचे चालले खलबत
खलबत करतांना पित होते सरबत
सरबत पितानां झाले एकमत
रहावे धरून सगळ्यांना सोबत

चुक

लहानाचा हळू हळू झालो मोठा
मोठा होतांना चुकला एकदा काळजाचा ठोका
चुकलेल्या ठोक्यापाई घेतला तिचा मुका
मग काय होतंच गेल्या वारंवार चुका

Born to run

आलं मनांत, धावलो ऊनपावसात
धावता धावता आलं ध्यानात
चहात टाकायलां आलं नाही घरात
घासायची आहे भाकरीसाठीची परात
पसारा आठवताच ठोकली धुम जोरात
वाटतो तितका नाही दम आता उरात
आता ऊन असो का पाऊस
धावतो मनातल्या मनात

काहीही

तुम्हाला म्हणून सांगतो खरं खरं 
चहात मी टाकतच नव्हतो साखर
पण पिताच बेचव चहा
घश्यात फारच जाणवतसे खरखर

निरामय

अंगवळणी असावी व्यायामाची सवय
खाण्यापिण्यात करू नये हयगय
वाढूदेत मग कितीही वय
जीवन सदा राहिल निरामय


पोळी प्रपंच

भरडले जातात जात्यात गहू
त्रिवार तिंबली जाते कणिक
दाह भयानक, चटका क्षणिक
जळतेच पोळी नक्की
दिवास्वप्न पाहू पाहू

ठेच

खाचखळगे, धावपळ नुसती
लागली अचानक ठेच
न रडता, धावत रहा सतत
सुटतील सगळेच पेच

कबुली

रक्तापरी माझ्यात भिनलीस तु
कसा घालवू हा शिशिर ऋतु?
गारठलो कितीही, जाणवते ऊब
तुझ्यामुळेच मी बहरतो खुब

कबुली

रक्तापरी माझ्यात भिनलीस तु
कसा घालवू हा शिशिर ऋतु?
गारठलो कितीही, जाणवते ऊब
तुझ्यामुळेच मी बहरतो खुब

दिलफेक

न बोलतां कळले तुला
जे सांगायचे होते मला
स्वप्नातही तुच येतेस सदा
स्वातंत्र्यावर अशी आणतेस का गदा?

कर्तव्य

का बाळगावी उगाच भीती
मांडते साराच खेळ नियती
जीवनाशी आहे याक्षणी युती
निरपेक्षतेने करत रहा कृती

Immortal Mortality

वाटचाल सगळ्यांचीच बघण्यास अंत
अंताबद्दल ठेऊ नये खंत
चालत रहावे असेपर्यंत जिवंत
नाही सुखांतं किंवा दुःखांत - फक्त देहांत!

साचाळलेले

जीवन झाले खुपच संथ
कंटाळून गेलो करुन रवंथ
शोधावा म्हणतो नविन पंथ
चाळून नव्याने विविध ग्रंथ

Daylight savings

निसर्गानेच काळाला घातली गळ
थांब जरासा, सुरू झाली रे आज पानगळ
काळही थांबला मग, करत टंगळ मंगळ
घटीवत, पहाटेच आला रवी
क्षणार्धात सगळ्यांनी काढला पळ
झुगारून अंगातली मरगळ
नव्याने पुन्हा सुरु अविरत धावपळ

पण...

शाब्दिक घाव घण घण
मनपटलावर घोर व्रण
त्यातून खांद्यावर ओझे हजार मण
तुटतो जीव आतून, कण कण
तरी पण करू या पण
आजचा दिवसच खरा सण

खोडकर - it’s always day 1

नवी नवरी लाजरी गोजरी
आधीच कावरी बावरी
त्यातून थंडी बोचरी
कवेत आली येताच घरी

कुचकी उचकी

मारतसे मीच माझी फुशारकी
नाही कशाचीच मला बांधिलकी
मी पडलो जरी फारच एकाकी
तरी बरे लागते का सारखी उचकी?

Donation

Little dark but true in some cases. :
==
टाळूवरचे खाणार आम्ही लोणी
मागितलं तर देणारसुध्दा नाही आम्ही पाणी
दानशुरतेची आम्ही हक्काने वाजवणार पिपाणी
हिच खरी दुनियादारीची कहाणी

खा शीरा

स्वछंदाचे गुपित कळले जरा उशीरा
न ताणता मेंदूच्या शिरा
करावा मस्त शिरा
हाती लागताच रवा

अर्ध हळकुंड

गोष्टी खुपच खोट्यानाट्या
जणू पेन्सिलीच्या रेघोट्या
नाहीत तुमचे पापड पक्के
सध्याशी फक्त कच्च्या लाट्या
==================
Break out of limitations - happy dasara.

नशाबाज

मेंदुस देण्यास तरतरीत झटका
कधी खातो गुटका, कधी खेळतो मटका
मुक्ती मिळे दोन घटका
चैतन्यास माझ्या हवी वास्तव्यापासुन सुटका

TGIF: भरसटलेली प्रियसी & भरसटलेला प्रियकर

TGIF
=================
भरसटलेली प्रियसी
==================
त्यदिवशी तूच न हसतां गेलीस
सुखच माझं जणू ठेवलं ओलीस
रडून रडून शेवटी तूच भीजलीस
शेवटी तुच येऊन मला बिलगलीस
==================
भरसटलेला प्रियकर
==================
त्यदिवशी तू भूं भू भूकलास
सुखच माझं जणू घेऊन गेलास
रडून रडून शेवटी तूच भीजलास
शेवटी तुच येऊन मला बिलगलास

रक्ताभिसरण

भरताच ह्रदयात रक्त
क्षणात पसरवून देते
चालविण्यास देहास
रक्ताभिसरण हे लागतेच

घे भरारी

उडलेल्या पक्षांची पडली पिसे
बसल्या बसल्या त्यापरी आम्हीच सोडले ऊसासे
उडणारे गेले उडून
आम्ही राहिलो अडकून

प्रश्न

तिचा तिरपा कटाक्ष
तर कधी चोरटा स्पर्श
देतसे मना फारच हर्ष 
मंजुळ आवाज तिचा
लग्नानंतर का बरे वाटू लागला कर्कश?

एकटा

माझी अनुभूती माझ्यापाशी
माझं सुख माझ्यापाशी
माझं दुःख माझ्यापाशी
मीच नाही माझ्यापाशी

समजूत

पहा मी किती चतुर 
मीच मला होतो फितूर
सतत शमवतो मनातलं काहूर
न करता कुरबूर

द्विधा

पहा मी किती चतुर 
मीच मला होतो फितूर
शमवत नाही मनातलं काहूर
फाटूदेत ना हा ईवलासा ऊ

एकांत

नको तिटकारा, ना नको सोयरीक
एकलाच चालोरे, म्हणतो फकिर
सांभाळून घेईल तो,
त्यासी असेल आमुची फिकीर

द्वंद्व

मी नाहीच मुळी मोठा
मी फारच लहान 
मी आहे फक्त खोटा
स्वत:लाच म्हणतो महान

बांडगूळ

कण कण जमवून मी वाळू
बांधले होते छानसे वारुळ
भोवतालच्या मुंग्यामुंगळ्यांनाही देतसे गुळ
अचानकच सर्वच लागले खाऊ, बनूनी बांडगूळ 

भितभांडवल

भटजींनी केले दैवभितीचे भांडवल
पुढार्यांनी दैवत्वावर घडवली दंगल
देवस्थानं बांधण्यार्यांची मस्त चंगळ
देवापुढे मात्र समाज राहतो भोंगळ

बुध्दिजीवी

आम्ही म्हणे बुध्दिजीवी
करून फक्त अक्षर रचना
खुशाल देतो कुणासही शीवी
जतवून कोरड्या भावना

समिकरण

समिकरण जमवतां जमवतां 
समिकरण जमवतां जमवतां 
जीवन जाते संपून
घे जगून होऊनी मदमस्त
स्वत:चे श्वास देऊ नकोस कुणास
मोजूनी दाम स्वस्त
आयुष्याची असली जरी गोळाबेरीज शुन्य

BMC

खड्ड्यात शोधतोय रस्ते
उधारीच्या गाडीचे फेडतो हफ्ते
स्वप्नातच फक्त चघळतो थोडेसे पिस्ते
श्वासापरी आयुष्य झाले खुपच सस्ते

अबोला

खरं सांगवत नाही
खोटं बोलवत नाही
गप्प बसलो तरी
तुझ्यापासून काहीच लपत नाही

कंटाळा

कष्ट करून वाहिला घाम भळाभळा
उभ्या आयुष्याची झाली शाळा
तरी मेंदूला हवा सतत चाळा
रटाळ कामांना मारावा का टाळा
दिवस रेटायचा फारच आलाय कंटाळा

आंशिक आवारा, नवरा बिचारा

प्रेमापोटी तुझ्या पडत असे आजारी
नको नको त्या खातसे औषध गोळ्या
रात्रीबेरात्री नावाने तुझ्या मारतसे आरोळ्या
उंटावरून का होईना, हाकतसे खुप शेळ्या
त्या आठवणीही आता झाल्यात खुप शिळ्या
सध्या तुझ्यासाठी लिहीन फक्त ३-४ चारोळ्या
लटकवून खांद्यास पिशवी, जायचंय आता बाजारी

असंबध्द सत्य

ताक पाजून पाजून करठकास दिली ताकीद 
लवकर दे थकबाकी
नाहीतर या करांनीच ठोसे देईन नाकी
तो म्हटला मार बिनधास्त, पगार झाला खर्च
उरलच नाही काही बाकी

ताळ

अवतार जरी गचाळ
मी नाही वाचाळ
वृत्ती माझी जरी टवाळ
वर्तन माझे फारच मवाळ
स्वभावच मुळी माझा खट्याळ
नियम पाळणारच तरी काय- कप्पाळ!

कुपमंडूक

डुबुक डुबुक, मी कुपमंडूक
भागवण्यास तहानभुक
कुपातच मारतो ऊड्या
विसरून तहानभुक

पोखरण

सालोसे जो कठिन काम दुसरोने टाले
अटलजी वो आपने चुटकी मै कर डाले
स्वातंत्र्यके बाद पहिलीबार
सही मायने मे हिंदुस्थानीयोके होश संभले
पोखरण के आसमान जब गुंजने लगे

हिशोब

सतत करून आकडेमोड
करू नये स्वत:चाच हिरमोड
ओढता ओढता संसाराचे गाडे
जरी होत असेल कंबरतोड

उडणारे हत्ती

अंगणात बागडतात ससे
पाण्यात पोहतात मासे
आकाशात उडतात हत्ती
सगळे विचारती, असे कसे, असे कसे?

शिल्पकार

नियतीने देण्यापुर्वी दस्तक
स्वत:च लिहावे आयुष्याचे पुस्तक
होवून नतमस्तक 
सगळेच शेवटी त्याचे हस्तक

सारीपाट

का घ्यावा ताण तणाव, उगाच कटकट
जगून घे झटपट
नियती उधळेल क्षणात हा सारीपाट
करशील कितीही प्रयत्न आटोकाट
जपण्यास फुकटचा थाट

मुंबईकर

सतत धावते लोकल
त्यात प्रचंड कलकल
अनुभवण्यास मुंबईची खरी छलक
केला प्रवास, मी बनून स्वच्छंदी बालक