Thursday, March 28, 2019

मन आणि आत्मा

चंचल मनास भारीच चळ
मारून सुर गाठतं सागराचा तळ
करुन उड्डाण मंगळावर समोसे तळ
कधी कधी फक्त टंगळ मंगळ
कधी बसतं निवांत टाकून गळ
गळ टाकून ओढावून घेतं धोके अटळ
टाळण्यास तेच धोके शिताफीने काढतं मग पळ
सतत भिरभिरतं शोधण्यास जतिजळ
कधी करतं निर्धार, पोसू देह पिऊन फक्त जळ
तर कधी खा खा करून वाढवतं छातीत जळजळ
तळमळीने मांडून विचार मेंदूवरही चढवतं मळ
व्यायाम करवून वाढवतं शारिरीक बळ
शोधून श्वासोच्छासां मधला पळ
त्यास दाखवतं हा गमतीदार खेळ

No comments: