Friday, May 17, 2019

उदर भरण

उदर भरण
=====================
विचारपूर्वक करावी निवड
निवडीलादेखील नाही सवड
दमले खांदे, वाहून कावड
शांत बसून खावी का खिचडी आणि पापड

नवर्याबायकोची भांडणं

कधी लोणच्याची आंबट फोड
तर कधी शिरा फारच गोड
प्रत्येक नवर्याला असते भारीच खोड
सतत गडबड, त्याने बायकोचा होतो हिरमोड
मग होणारच आदळाआपट, तोडफोड
हात जोडून करावीच लागते मग तडजोड
ती लटक्या रागाने म्हणते, चल हात सोड
यापुढे घे काळजी, जणू तळहातावर फोड
नवर्याबायकोच्या भांडणांना नाही कशाचीच तोड

Monday, May 06, 2019

बायको

मी मोत्यामागून मोती गुंफला
ओवला तिच्यासाठी मोत्यांचा हार
तिने क्षणामागून क्षण गुंफला


उभारला प्रेमाने आमचा संसार

चाळा : Incomplete

एक म्हातारा तंबाकू चोळीत चोळीत
चाळता चाळता शिळे वर्तमान पत्र
चाळा म्हणून जमूवून जनता एकत्र
चाळीस वर्षाचा अनुभव त्याचा सांगतसे चाळीत

तंबाकू चोळीत कि चोळीत तंबाकू
तंबाकू चोळीत केला त्यासी कोणी प्रश्न

पुष्पक विमान

त्यांचा चाले सतत सरकारनामा
त्यातून मेंदू माझा रिकामा
कधी ओलांडली मी परिसीमा
कळलेच नाही रे तुकारामा
तुला बरे मिळाले पुष्पक विमाना
करता करता रामा नामा
आम्ही जातो आमुच्या गावा
देऊन हाती फक्त विमा

मन

खंत
=====================
हेटाळणी फेटाळणी सतत
होउ लागलय सगळंच अळणी
जळी स्थळी पाषाणी
सतत सगळीकडे पाणचट पाणी

विनंती
=====================
कधीना कधी निपचित पडेलच देह
यात ना काही संदेह
त्याआधी तरी मनास मारू नकाहो
उद्वेगाने फोडतो हाच टाहो

रंगमंच

कधी खाल्ले लाडू
कधी खाल्ल्या वड्या
कधी खाल्ल्या खूप छड्या
काही ना काही सतत काड्या
लहानपणापासूनच आम्ही धडपड्या
सतत करतो काही ना काही काड्या
गरज पडल्यास पुरुषांनाही नेसवतो साड्या
पण मज्जा येते कि नाही गड्या 



Saturday, May 04, 2019

सूत्र

सूत्र
===================
वेचून घ्यावे क्षण अनुभवाचे
हेचि रहस्य क्षणभंगुर जीवनाचे
खळखळून हसणे, लक्षण परिपक्वतेचे
वायफळ वादविवाद, लक्षण मूर्खाचे

समय

समय
========================
ना पहिल्या वेळीची उत्कटता नको
ना शेवटच्या क्षांमधली ओढ नको
नकोच ते आठवणींचे शेवाळ
नकोच ते आठवणींचे शेवाळ
जगू जीवन एकदम मावळ
पुढे सरकत राहील आता फक्त काळ

पेय : जे आवडेल ते

चाकोरीच्या चौकटीत सगळेच होतात चारी हात चीत
उघड्या डोळ्याने जो तो बघतो गम्मत पडून निपचित
कानावर सतत निरर्थक बातचीत, समाजाची हिच रीत
कशाला जगायचं भीत भीत, मज्जा कर मस्त, पेय पीत पीत

उगाच

कधी केली अर्चना
कधी केली गर्जना
तर कधी नुसतीच शब्द रचना
अर्धवट विचारांना मुखपुस्तकात केले रवाना 

साचा

कधी चौकटीत बसण्याचा
कधी चौकटीत बसवायचा
चालू सतत खटाटाटोप
बसलं तर ठीक,
नाही तर दे मनसोक्त चोप
साचेबद्ध जीवन जगण्याचा
हाच खरा साचा 

Diverse Team -

विविध कलागुणसंपन्न आमचे पथक
नेटाने करीती परीश्रम अथक
घाळलेल्या घामाचे होतेच सार्थक
विचारपूर्वक कृती जात नाही निरर्थक

अंतरीक्ष

कसा तोडू मी हा पाश
होण्याआधी सत्यानाश
विचार करण्यासही न अवकाश
कुठे मांडू बस्तान, केवढे अमर्याद आकाश

घरदार

रात्रीच्या पहिल्या प्रहरी आळवत होती राग केदार

कुणी तरी अचानक ठोठावले दार

उघडले दार, हाती घेऊनी सुरी धारदार

बिलगली लगेच, बघून समोर प्रियकर दिलदार

Surprise | अनपेक्षित

घेतली हाती सुरी धार धार
सुरु झाले आडवे उभे, तिरपे तारपे सपासप वार
हळूहळू घावांचा आवेग उतरला
डोळे गच्च पाणावले
चिरलेला कांदा मिळाल्याने
मन तिचे सुखावले



शालेय घोकम पट्टी

पाठ होतय म्हणून पाठांतर
पाठांतर म्हणून विचारात नाही अंतर
पाठ (कणा) असुनही पोटाशिवाय नाही गत्यंतर
भूकपाठी पळतो निरंतर