Tuesday, June 11, 2019

मराठी बाणा

आमच्या महाराजांनी जिंकले गडावर गड
त्यांच गडावर रिकामटेकडे आम्ही, खातो कलिंगड
त्यांच्या भवानीचा गडगडाट अजूनही घुमतो संह्याद्रीच्या कड्याकपार्यात
त्याच लग्नाची तीच ती गोष्ट चालू असते सतत आमच्या घरच्या संह्याद्रि दूरदर्श्नात
त्यांच्या वाघनखांच्या लचक्यास अन् सय्यद बंडाच्या दाण पट्ट्यांस,
अजूनही थरकापतो थडग्यातला अफजल खान
आमच्या नाजूक पकडीतून पडतो सतत iPhone
अन् सुटलेल्या ढेरीमुळे चड्डीच्या पट्ट्याचं बक्कल लावता लावता लचकते आमचीच ताठ मान
महाराजांच्या नावावरुन अजून दहा शतकं तरी
करता येईल मस्त गर्व
त्यामुळे मराठी माणसां तू बैस निवांत, शतकानुशतकं
येतीलच महाराज कंटाळून पुन्हापरत
नव्याने साकारण्यास मराठी पर्व

No comments: